
25-May-2019
नाशिक जिल्ह्यासाठीMCO हॉस्पिटल,पंचवटी..... पुढील दोन वर्षासाठी मान्यता...
नाशिक :- सिजीएमटी महाराष्ट्र सर्कल पत्र क्रमांक No.AA-II/Med Faci/Raigad/२०१४/26 dated -23/05/2019 Noनुसार नाशिक जिल्ह्यासाठी आरटी ओ च्या मागे.पंचवटी ,नाशिक येथील “नामको चारीटेबल ट्रस्ट” प्लॉट न.३०/१ /बी /I) या हॉस्पिटलला पुढील दोन वर्षासाठी (नाशिक जिल्ह्यातील कर्मचार्री) म्हणजे ३१/०३/२०२१ पर्यंत मान्यता देण्यात आली आहे..
सोबत मान्यता पत्र पहा
View File
22-May-2019
बिझनेस एरियामध्ये एसएसए(SSA)चे एकत्रीकरण – या संबधी बीएसएनएलईयूने जीएम (रेस्ट.), बीएसएनएल सोबत केली चर्चा....
व्यवसाय क्षेत्रातील एसएसएचे एकत्रीकरण प्रक्रिया अनेक मंडळांमध्ये होत आहे, जेथे ती अद्याप पूर्ण झाली नाही. व्यवसाय क्षेत्रातील एसएसएच्या एकत्रीकरणाच्या परिणामी, लेखा आणि नियोजन कार्यकलाप व्यवसायाच्या क्षेत्राच्या मुख्य परिसरांवर केंद्रीकृत केले जाणार आहे.. तमिळनाडु आणि कर्नाटक मंडळांच्या नेत्यांनी या समस्येशी निगडित सीएचक्यूच्या लक्षात काही मुद्दे आणून दिले आहेत. कॉमरेड पी. अभीमन्यु , जीएस, यांनी आज कॉरपोरेट ऑफिसमध्ये श्री मनीष कुमार, जीएम (रेस्ट.) यांच्याशी विस्तृत चर्चा केली . या चर्चेत, जीएम (रेस्टग.) ने कळविले की, 7 किंवा 8 मंडळांशिवाय, हे काम आधीपासूनच पूर्ण झाले आहे. महासचिवांनी खालील मुद्दे उंचावले आहेत: -
१ व्यवसाय क्षेत्रामध्ये या एकत्रीकरणाच्या परिणामस्वरूप,गैर-कार्यकारी अधिकार्यांना त्यांच्या वर्तमान एसएसएमधून हस्तांतरित करणे आवश्यक नाही.
२. खाते हस्तांतरण करण्यापूर्वी अतिरिक्त वर्कलोड तपासून आणि मुख्य कार्यालयातील नियोजन करून व क्रियाकलाप करून योग्य व्यवस्था केली पाहिजे.
३. सध्याच्या एसएसए स्तरावर अस्तित्त्वात असलेल्या जिल्हा संघटनांची स्थिती पुढे तसेच चालू ठेवण्यात यावी .
४. सध्याच्या एसएसए स्तरावर स्थानिक परिषदे(LCMव इतर कमिट्या)चे कामकाज पूर्वीप्रमाणे चालूच राहिले पाहिजे. जीएम (रेस्टग.) यांनी या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आश्वासन दिले.
[तारीख: 21 - मे -2019]
13-May-2019
रायगड जिल्ह्यासाठी पानसिया(PANACEA) हॉस्पिटल पनवेल,....पुढील दोन वर्षासाठी मान्यता.
सिजीएमटी महाराष्ट्र सर्कल पत्र क्रमांक No.AA-II/Med Faci/Raigad/2013/43 dated -10/05/2019 Noनुसार रायगड जिल्ह्यासाठी नवीन पनवेल येथील,”Pancea Hospital New Panwel” प्लॉट न.१०५/१०६ सेक्टर ८ पूर्व पनवेल (नवी मुंबई) या हॉस्पिटलला पुढील दोन वर्षासाठी म्हणजे ३१/०३/२०२१ पर्यंत मान्यता मिळाली.
सोबत मान्यता पत्र पहा
View File
29-Apr-2019
“बीएसएनएल बचावो ...देश बचावो “ या मोहिमेनुसार १मे(कामगार दिवस ) या दिवशी सर्कल आणि जिल्हा स्तरावर '' रॅली ”आयोजित करून जनजागृती करा ...
बीएसएनएलईयूच्या (CHQ) अखिल भारतीय केंद्र मंडळाने सूचना केली आहे यावर्षी १मे (कामगार दिवस) या दिवशी सर्व परिमंडळ आणि जिल्हा पातळीवर '' ' रॅली “आयोजित करून बीएसएनएल बचावो ...देश बचावो हि मोहीम राबविण्यात यावी.
या बाबत अगोदर सर्वांना सूचित केले गेले आहे. तरी पुन्हा एकदा, सीएचक्यूच्या सांगण्यावरून मेळावा / रॅलीचे यशस्वीरित्या आयोजित करण्याचे मंडळ आणि जिल्हा सचिवांना आवाहन करण्यात येत आहे.
सदर रिपोर्ट व फोटो पाठविण्यात यावेत.
---------कॉ.नागेशकुमार नलावडे ,सर्कल सेक्रेटरी
29-Apr-2019
मेंबर वेरीफीकेषण स्थगतीला (8 व्या सदस्यता पडताळणी) बीएसएनएलईयू आणि एनएफटीई केला विरोध..... अधिसूचना वेळेत काढण्याची मागणी करण्यात आली....
बीएसएनएलई आणि एनएफटीई या दोन मान्यताप्राप्त संघटनांनी संयुक्तपणे बीएसएनएलमधील 8 वां सदस्यता पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. ६ महिन्यांच्या कालावधीसाठी 8 वी सदस्यता पडताळणी स्थगित करण्यासाठी व्यवस्थापनेने पत्र दिले होते. बीएसएनएलईयू आणि एनएफटीई या दोन्ही संघटनेने सदस्यता पडताळणीसाठी कोणतीही स्थगिती न देता ताबडतोब सदस्यता पडताळणीसाठी वेळेवर अधिसूचना जारी केली पाहिजे अशी मागणी केली आहे.[तारीखः 26 - एप्रिल - 201 9]
सोबत पत्र पहा
View File
16-Mar-2019
बीएसएनएलईयूचे कॉरपोरेट ऑफिसच्या सर्कल युनियनवर शिस्तबंधाची कार्यवाही....बॉडी विसर्जित केली... - अखिल भारतीय केंद्रीय कार्यकारणीने शिस्तबद्धतेचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल निर्णय घेतला ..
बीएसएनएलईयू, कॉर्पोरेट ऑफिस मधील संपूर्ण सर्कल युनियनने दिनांक १८/०२/२०१९ पासून झालेल्या ३ दिवसाच्या स्ट्राइकमध्ये सहभागी झाले नाहीत. तसेच दिनांक ०८ आणि ०९ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या २ दिवसांच्या सामान्य स्ट्राइकमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला नाही. हे उच्च निकायंच्या निर्णयांचे गंभीर उल्लंघन असून संघटनेच्या घटनेमध्ये बसत नाही.म्हणून आज दिनांक 15.03.2019 रोजी बीएसएनएलईयूच्या अखिल भारतीय केंद्राच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. अखेरीस, अखिल भारतीय केंद्राने बीएसएनएलईयूच्या कॉर्पोरेट ऑफिस सर्कल युनियनला विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. पुढे, बैठकीने मंडळाचे पुनर्गठन करण्यासाठी महासचिवांना अधिकृत केले आहे..
20-Feb-2019
तीन दिवसाचा संपाला उत्तम प्रतिसाद ..त्यानंतर .२०/०२/२०१९ रोजी झालेल्या AUAB बैठकीचे काही निर्णय....
3 दिवसांच्या स्ट्राइकचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि भविष्यकाळाच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज एयुएबीची आज बैठक आयोजित करण्यात आली. एयूएबीच्या सर्व घटकांचे सरचिटणीस / वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले. या बैठकीत संपूर्ण कार्यवाहक(अधिकारी ) आणि गैर-कार्यकारी(कर्मचारी)संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.या सर्वांनी अंत्यंत मेहनत घेवून 3 दिवसांचा संप यशस्वी करून एक ऐतिहासिक घडवला. हा स्ट्राइक प्रभावीपणे आयोजित करण्यासाठी परिमंडळाने आणि जिल्हा पातळीवरील एयूएबी कार्यकर्त्यांचे खास अभिनंदन केले. या पुढेही मागण्यांची पुर्तता करण्यासाठी व पुढील चळवळ चालू ठेवण्यासाठी कृतीचा पुढील कार्यक्रम अंमलात आणण्याची विनंती करण्यात येत आहे.
१) सभोवतालच्या परीमंडळांमधून कर्मचारी व अधिकारी एकत्रित करून दि.०६/०३/२०१९ रोजी पंतप्रधान कार्यलयावर मोर्चा आयोजित करणे.
२) दि.28.02.2019 रोजी सर्व खासदारांना मेमोरँडम सादर करण्यात यावेत.
३.)माननीय पंतप्रधानांना व कम्युनिकेशन्स राज्यमंत्री यांना ट्विटरवर सन्देश पाठविण्यात यावेत.
४) आपल्या सर्व सहकार्यांद्वारे जेथे शक्य असेल तेथे मा.दळणवळण राज्य मंर्त्री यांची भेट घेवून निवेदने देण्यात यावेत.
11-Feb-2019
१ लाख ७० हजार बीएसएनएल कर्मचा-यांचे कुटुंब अंधारात...- AUAB ने दि.१५/०२/२०१९ रोजी "कौटुंबिक सदस्यांसह रॅली" आयोजित करणार...
[तारीख:11 - फेब्रुवारी-201 9] एक लाख सत्तर हजार बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे भविष्य काळोखात आहे. सरकार बीएसएनएल कंपनी संपविण्याची प्रयत्न करत आहे. सरकारला वाटते कि बीएसएनएलने रिलायन्स जियोच्या बरोबरीने स्पर्धा करू नये म्हणून बीएसएनएलला 4 जी स्पेक्ट्रमसाठी परवानगी देत नाहीत. बीएसएनएलने रिकाम्या जागेतून (रिक्त जमिनीतून) कमाई करण्यास परवानगी मागितली आहे परंतु ती परवानगी देत नाहीत. एकीकडे बीएसएनएलने बँक कर्ज घ्यावे असे सरकारला वाटत नाही परंतु दुसरीकडे रिलायन्स जियोसह खाजगी दूरसंचार कंपन्या लाखो कोटी रुपयांना सरकारी बँकांकडून कर्ज घेत आहेत. सरकार मोठ्या दिमाखाने सांगते कि कामगारांच्या कुटुंबांना तृप्त करण्यासाठी ते सर्वकाही करत आहेत, परंतु हे लक्षात येते कि येत्या काळात बीएसएनएल कंपनीतील कर्मचार्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही.
हे सरकारला नीती आयोगानुसार कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीची वय 60 ते 58 पर्यंत कमी करायची घाई करत आहे.यातून कर्मचार्यांमध्ये दहशत निर्माण करत आहेत आणि त्याद्वारे त्यांना व्हीआरएस घेण्यास भाग पाडून घरी जाण्यास उद्युक्त करत आहेत.
मा. मोदी सरकारच्या मते, रिलायन्स जिओ ही सरकारी कंपनी आहे म्हणून त्यांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि बीएसएनएल कंपनी खाजगी समजून मोडीत काढत आहे. या सरकारच्या आदेशावरून भारतीय रेल्वेने बीएसएनएलचे कनेक्शन बंद करून रिलायन्स जियोकडून कनेक्शन घेतले आहे. या निर्णयाच्या मागे कोण आहे? आम्ही हे अन्याय करू देणार नाही. कॉमरेडस,चला आता आपण उभे राहू या ! आणि बीएसएनएल संपुष्टात आणणाऱ्या सरकारच्या षड्यंत्राशी लढू या !!. हि महान बीएसएनएल कंपनी भारतातील सामान्य जनतेची (लोक) आहे. ते खरे आमचे मालक आहेत. त्यासाठी आपण देशाच्या लोकांकडे जाऊ आणि बीएसएनएल वाचवण्यासाठी त्यांचे समर्थन घेऊ. शेवटी ते जिंकणारे लोक आहेत. AUAB ने कर्मचार्यांना १५/०२/२०१९ रोजी "कौटुंबिक सदस्यांसह रॅलीज" आयोजित करण्याची विनंती केली आहे. बीएसएनएलईयू परीमंडळ आणि जिल्हा संघटनांना कळविते कि अशा रॅलींना ऐतिहासिक यश मिळवण्यासाठी सर्व पावले उचलण्यात यावीत. तरी बीएसएनएलईयूसहित सर्व संघटना व असोशियनच्या प्रत्येक कर्मचार्यांनी १५ फेब्रूवारी २०१९ रोजी त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणण्यास लाज वाटू देवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
तरी सर्व जिल्हासचिव व परिमंडळ पदाधिकार्यांनी वरील आदेशाचे पालन सर्व जिल्हा स्तरावर एकजुटीने करण्यात यावे हि नम्र विनंती.
हीच ती वेळ ...एकत्रित होवू या ! ...लढा देवू या !! ....आणि जिंकू या !!!
कामगार एकजुटीचा विजय असो !!!!
08-Feb-2019
मुंबई ---- बीएसएनएलइयु संघटनेची सर्कल ऑफिस सांताक्रूझ मुंबई येथे महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी तातडी बैठक संपन्न.

महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बैठक (Circle Working Committee Meeting) दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ रोजी पणजी (गोवा) येथे,कॉ.आप्पासाहेब गागरे यांच्या अध्यक्षतेखाली व बीएसएनएलईयुचे अखिल भारतीय उपाध्यक्ष व परिमंडळ सचिव कॉ.नागेशकुमार नलावडे यांच्या उपस्थितीत पार पडली .
कॉ.नागेशजी नलावडे , महाराष्ट्र परिमंडळ सचिव –सी एच क्यू च्या आदेशानुसार ताबडतोब तातडीची परिमंडळ कार्यकारणी बैठक दि.६ फेब्रुवारी ला घेण्यात यावी व दिनांक १८ फेबु ते २० फेब्रु २०१९ च्या संपाविषयी चर्चा करण्यता यावी. विशेषकरून बैठकीमध्ये AUAB ला आपल्या मागण्या बाबत मा. संचार मंत्री व डी ओ टी यांनी जे आश्वासन दिले मात्र पाळले नाही त्या मुळे संप करणे हाच एकाच पर्याय आहे व त्यासाठी संप यशस्वी करणे भाग आहे,नीती आयोगाने केलेल्या शिफारसी त्यावर सरकारची नीती व AUAB नी दिलेले आदेश यावर सर्व कार्यकारणीमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी व तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य सभासदापर्यंत हि माहिती पोहोचविण्याच्या उद्देषाने आजची सी डब्लू सी घेण्यात येत आहे.
बीएसएनएल कंपनीची आर्थिक परस्थिती दिवसोन्दिवस खूपच वाईट होत चालली आहे.अनेक कारणे आहेत त्या मध्ये महत्वाचे १).आऊटसोर्सिंग चा वाढलेलें खर्चाचे प्रमाण ,नको तेथे आऊटसोर्सिंग करून खर्च वाढविलेला आहे.
२.)ओ.एफ.सी.साठीचा मेन्टनस खर्च.अनेक ठिकाणी बोगस बिले तयार करून खर्च्र वाढविला जातो.
३) गरज नसताना अनेक साधनसामुग्रीच्या खरेदी करून वापरत न आणता नुसते टेंडर काढून बिले खर्ची टाकले.
बीएसएनएल कंपनी केंद्र सरकारच्या अखीरीत्यामध्ये असून सुद्धा सरकार कंपनी संपविण्याचे काम करत आहे.आर्थिक मदत करण्याचा करार असताना सुद्धा मदत करावयाची सोडून कर्ज घेण्यास अडथळे आणत आहे , शिवाय नितीआयोगाच्या शिफारसी अमलात आणण्याचा विचारही करत आहे.नीती आयोगानुसार सेवानिवृतीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे.त्या बाबत व तिसरे वेतन कसे असावे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात यावी अशी विनंती सभेला सचिवानी केली
ज्या जिल्हा सचिवानी त्यांच्या जिल्ह्याचे जिल्हाअधिवेशन पार पाडले नसतील तर त्यांनी सर्कल अधिवेशनच्या अगोदर घेण्यात यावीत.
महाराष्ट्र सर्कल मध्ये आपल्या संघटनेचे ९००० पेक्षा जास्त सभासद असून आपली जबाबदारी संप यशस्वी करण्याची जबाबदारी जास्त असल्याने आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कंपनीच्या साधनसामुग्रीच्या किंमतीचा विचार केला तर कंपनी तोट्यात येवू शकत नाही.परंतु सरकार फक्त ल्यांड जरी कंपनीला हस्तातारींत केली तरी आपण तोट्यात राहू शकत नाही शिवाय पेन्शन वर्गणी प्रत्यक्ष मूळवेतनावर घेतले तर आपणास डीओटी कडून २००० हजर करोड येणे आहे.[VA1]
.
खालील जिल्हा सचिव व महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी सदस्य यांनी त्यांचे वरील विषय म्हणजे नितीआयोगाच्या नुसार सेवानिवूर्तीचे वय , व्ही आर इस,व तिसरे वेतन करार याबाबीवर अभिप्राय व सूचना मांडण्यात आल्या. --- त्या मध्ये कॉ.अजय फडके,सह सचिव सर्कल ऑफिस मुंबई ,कॉ.नरेश कुंभारे जिल्हा सचिव नागपूर,कॉ.मिलिंद पळसुले,संघटन सचिव ,सांगली ,कॉ.चाटे ,अध्यक्ष,जिल्हासचिव कॉ.खंडागळे लातूर,कॉ. एस.बी.सूर्यवंशी परभणी,कॉ.पुरोषात्तम गेडाम,रायगड जिल्हा सचिव ,कॉ.कुबेर जालना, कॉ.वाघमारे जिल्हासचिव औरंगाबाद जिल्हा कॉ.,सौ.साधना महाडिक संघटक सचिव मुंबई,,कॉ.कोंडाळवाडे,जिल्हा सचिव नांदेड,,कॉ.गणेश वाघाटे,सिंधदुर्ग ,कॉ.मधु चांदोरकर मुंबई ,कॉ.संजय नागणे,जिल्हासचिव,धुळे, जिल्हासचिव कॉ.लहाने नाशिक, कॉ.कौतिक बस्ते.जिल्हासचिव,कल्याण, कॉ.निलेश काळे,जिल्हा सचिव,जळगाव, कॉ.संदीप गुळून्जकर ,सर्कल उपाध्यक्ष ,कॉ.माने ,सह सचिव महाराष्ट्र सर्कल अहमदनगर, .कॉ.विजय बेळगावकर जिल्हा सचिव गोवा,कॉ.अमिता नाईक,सिसिएम ,कॉ.गुलाब काळे,कॉ.अतुल वाटवे व कॉ.विठ्ठलराव औटी ,सह सचिव महाराष्ट्र परिमंडळ,.कॉ.गुळुंजकर ,कॉ.वरगुडे उपाध्यक्ष म.परिमंडळ ,तसेच कॉ.दामले जिल्हासचिव, यवतमाळ ,अकोला,बुलढाणा,अमरावती,कॉ.पाखरे बीड, रवी बाविस्कर कॉ,बिडकर जिल्ह् सचिव, डब्लू,टी.पी.,डब्लू टी.आर.सर्कल ऑफिस,सिव्हील/इलेक्ट्रिकल विंग यांनी त्यांच्या जिल्ह्यांच्यावतीने विचार मांडले.
सर्वांनी येत्या १८ ते २० फेब्रुवारी २०१९ रोजी होणारा संप त्यांच्या जिल्ह्यात इतर auab च्या नेत्यांच्या व कार्माच्र्यांच्या सहकार्याने १०० % यशस्वी करण्यात येईल असे सांगण्यात आले.
त्यावर शेवटी कॉ.नलावडे परिमंडळ सचिव यांनी सविस्तर विचार मांडले व सांगितले कि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हि संघटना या पुढेही कर्मचार्यांच्या समस्याबरोबर बी एस एन एल कंपनीसाठी लढणार आहे.
अखेर परिमंडळ कोशाध्यक्ष कॉ.गणेश हिंगे हे म्हणाले कि अंत्यंत कमी वेळेत कॉ.नलावडे परिमंडळ सचिव यांनी आमच्या मुंबई सर्कल शाखेवर हि कार्यकारणी बैठक घेण्याची जबाबदारी टाकली व सदर जबाबदारी आम्ही मुंबई शाखेच्या मोलाच्या सहकार्याने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.काही कमी वाटले तर सांभाळून घ्यावे असे सांगितले.
शेवटी कॉ.नागेशकुमार नलावडे परिमंडळ सचिव यांनी सर्व प्रतिनिधी,सर्व जिल्हा सचिव,सर्व परिमंडळ कार्यकारणी व मुंबई सर्कल शाखेचे सर्व कोम्ब्रेड ज्यांनी हि सी.डब्लू.सी.कमी कालावधीत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले असे कॉ.गणेश हिंगे कॉ.माने कॉ.केकरे जिल्हा सचिव मुंबई सर्कल ऑफिस व त्यांची सर्व टीम यांचे विषेश आभार मानून अधिवेशन समाप्त करण्यात आले.
, फाईल औटी-२५/वेबसाईट सर्कल/२०१९
01-Feb-2019
महाराष्ट्र सर्कल वर्किंग कमिटी (CWC) साठी स्पेशल रजेबाबताचे पत्र .....

बुधवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०१९ रोजी होणारया बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ कमिटीच्या बैठकिला स्पेशल रजेबाबतचे पत्र सोबत देत आहोत. सोबत पत्र पहा