26-Aug-2019

Time Table for Verification in Vidarbh and Marathvada.प्रचाराचे वेळापत्रक

सोबत विदर्भ व मराठवाडा  प्रचाराचे वेळापत्रक 

View File

24-Aug-2019

बुलढाणा प्रचार सभा

कॉ.भालचंद्र माने सहाय्यक परिमंडळ सचिव सभेला संबोधित करताना ...

22-Aug-2019

बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ तर्फे (Membar Verification) प्रचारासाठी जळगाव येथे सभा ...........

जळगाव येथे प्रचारासाठी सभा घेण्यात आली ,कॉ.भालचंद्र माने , महाराष्ट सहाय्यक सचिव,कॉ.पुरोषत्तम गेडाम ,माजी सर्कल सचिव,कॉ.हुसेन लेबर सचिव यांनी मार्गदर्शन केले..

कॉ.निलेश काळे  जिल्हा सचिव यांनी सभेचे अंत्यंत छान नियोजन केले.जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सभेस हजर होते.

20-Aug-2019

सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत आणण्याची शक्यता - उद्या 21.08.2019 रोजी भोजन वेळेत देशभरात घोषणा देवून निषेध करा.

एयूएबीला विश्वसनीयरित्या समजले  आहे की बीएसएनएल संचालक मंडळाची बैठक उद्या दिनांक २८/०८/२०१९ रोजी होणार आहे, ज्यामध्ये ते बीएसएनएल कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय ६0 वरून ५८ पर्यंत कमी करण्यासाठी मान्यता देणार आहेत. आम्ही याविषयी अनेकवेळा सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत कमी करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविषयी चर्चा केली असून हे केंद्रीय मंत्रिमंडळाने सन २००० मध्ये दिलेल्या वचनबद्धतेमध्ये लिहिले आहे कि  बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत केन्द्र शासनाचे सर्व नियम लागू राहतील. हे लक्षात घेता आम्हाला बीएसएनएल बोर्डाच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत कमी करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करावा लागेल. म्हणून एयूएबीने उद्या बीएसएनएलच्या संपूर्ण कार्यकारी अधिकारी आणि नॉन-एक्झिक्युटिव्हस यांना निषेध करण्यासाठी उद्या दुपारी जेवणाच्य वेळात सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला पाहिजे.

त्यासाठी सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करावे

20-Aug-2019

बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ तर्फे “ विदर्भ व मराठवाडा ”च्या ८ व्या सत्यपण (Membar Verification) प्रचारासाठी कार्यक्रम जाहीर ..

दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी मेंबर व्हेरिफिकेशन साठी मतदान होत आहे. त्या साठी महाराष्ट्र परिमंडळ तर्फे प्रत्येक जिल्ह्यात प्रचारासाठी परिमंडळ कार्यकारणी सदस्याची टीम तयार करण्यात आली असून त्यांना वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विदर्भ विभागासाठी:- कॉ.भालचंद्र माने,सह सचिव,कॉ.पुरोषोत्तम गेडाम माजी सर्कल सचिव,व जिल्हा सचिव रायगड,कॉ.निलेश काळे,जिल्हा सचिव जळगाव व कॉ.यसूफ हुसेन, जनरल सेक्रेटरी लेबर फेडरेशन

मराठवाडा विभागासाठी :-कॉ.आप्पासाहेब गागरे,अध्यक्ष, कॉ.विठ्ठलराव औटी,सहसचिव,व कॉ.संदीप गुलुंजकर उपाध्यक्ष, महाराष्ट्र सर्कल.

कोकण, मुंबई व पश्चिम महाराष्ट्र विभाग:-कॉ.नागेशकुमार नलावडे,सर्कल सचिव,कॉ.गणेश हिंगे,कोषाध्यक्ष ,कॉ.कौतिक बस्ते,जिल्हासचिव कल्याण,कॉ.अतुल वाटावे,सहसचिव.महाराष्ट्र परिमंडळ. तसेच कॉ.अन्मेष मित्रा,अध्यक्ष सिएच्क्यू ,कॉ.जॉन वर्गीस सहाय्यक महासचिव हे प्रमुख वक्ते म्हणून हजर राहणार आहेत.

त्यापैकी विदर्भ व मराठवाड्याचे सभांचे वेळापत्रक संबधित जिल्हासचिव व इतर कार्यकर्त्यांना अगोदर माहितीसाठी व त्या प्रमाणे सभेचे आयोजन करण्यासाठी देत आहोत.

सर्व संबधित जिल्हासचिव व शाखा सचिवांना विनंती सदर सभा यशस्वी करण्यासाठी आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना माहिती देवून जास्तीत जास्त कर्मचारी सभेसाठी हजर राहण्यासाठी प्रयत्न करावेत

आपला विश्वासू ...कॉ.नागेशकुमार नलावडे.सर्कल सचिव.महाराष्ट्र परिमंडळ

12-Aug-2019

महाराष्ट्र आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस - सेवा सुरू ठेवण्यासाठी बीएसएनएलईयूने सीएमडी बीएसएनएलला जादा निधी जमा करण्याची विनंती केली.

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये सांगली,कोल्हापूर,सातारा (कराड) या जिल्ह्यात  मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी अनेक एक्चेंजमध्ये  घुसले आहे. तसेच केरळ,कर्नाटक मध्येहि पूरग्रस्त परस्थिती झाली आहे, सांगली आणि कोहलापूर येथील आमच्या एक्सचेंजमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही तीव्र परिणाम झाला आहे.

तसेच  न थांबलेल्या पावसामुळे केरळमधील बर्‍याच भागात वीज सेवा खंडित झाली आहे. डिझेल विकत घेण्यासाठी व आपल्या  सेवा चालू ठेवण्यासाठी भारी खर्च केला जात आहे. बीएसएनएलच्या सेवा खंडित होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र आणि केरळ मंडळांमध्ये तातडीने निधी जमा करण्याची मागणी सीएमडी बीएसएनएलला   कॉम.पी.अभीमन्यू ,महासचिव यांनी केली आहे.

05-Aug-2019

पुणे--बीएसएनएलइयु संघटनेचे कॉ.पी.अभिमन्यू,महासचिव व कॉ.जॉन वर्गीस उप महासचिव यांच्या उपस्थितीत पुणे येथे महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी बैठक(CWC) संपन्न.

                  महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बेठक (Circle Working Committee Meeting)    दिनांक २८ जुलै २०१९ रोजी पुणे  येथे,बीएसएनएलईयुचे जनरल सेक्रेटरी कॉ. पी.अभिमन्यू व सह जनरल सेक्रेटरी कॉ.जॉन वर्गीस यांच्या उपस्थितीत उल्हासमय वातावरणात पार पडली.अध्यक्षस्थानी कॉ.आप्पासाहेब गागरे,परिमंडळ अध्यक्ष होते.  

        या वेळी कॉ.पी.अभिमन्यू,जनरल सेक्रेटरी यांनी बीएसएनएलइयु या संघटनेद्वारे कर्मचार्याबरोबर बीएसएनएल कंपनीच्या हितासाठी काय काय प्रयत्न केले यावर प्रकाश टाकला.

तसेच बीएसएनएल कंपनीची स्थापना,वेळोवेळी खाजगीकरणाचा प्रयत्न, ट्रेड युनियनचे अधिकार काढून घेण्याचा सरकारचा प्रयत्न, तिसरे वेतन करारासाठी दिरंगाई व त्यासाठी संघर्षाच्या दिशा ,व्ही.आर.एस.,कर्मचार्यांची कपात,कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतिचे वय ६० वरून ५८ करणे,बीएसएनएल व एम.टी.एन.एलचे एकत्रीकरण अशा अनेक गोष्टीचा उल्लेख करून त्यांनी सरकारी धोरणावर प्रहार केला व यासाठी संघटनेने कर्मचारी विरोधी सरकारला कसे नाकाम केले याचा उल्लेख केला. कॉ.अभिमन्यू यांनी हेही संगितले कि  नीति आयोगच्या  सिफारिशिनुसार 17 पीएसयू बंद करणे किंवा 22 पीएसयूज मध्ये सरकारची भागीदारी 51% च्या कमी करून  स्ट्रेटेजिक सेल च्या  माध्यमातून निजीकरण करणे किंवा  बीएसएनएल मध्ये  सब्सिडियरी टॉवर कंपनी बनविण्याच्या नीतीला   विरोध करण्यासाठी संयुक्त मोर्चाने दिलेला लढे/ संघर्ष कसे केले याची विस्तृत माहितिचे पुनरवलोकन केले.

                आपली बीएसएनएल कंपनीही सार्वजनिक कंपनी म्हणून काम करते.आपणास इतर खाजगी कंपन्याशी स्पर्धा करून बाजारात टिकून राहण्यसाठी खूप खडतर प्रयत्न करावे लागत आहे.कंपनीकडे अनेक पेमेंट करण्यासाठी पैसे नाहीत,अनेक दिवसापासून देनेकरांचे व लेबरचे पेमेंट न झाल्यामुळे कंपनीची  प्रगती व कामे  ठप्प झाले आहेत.कंपनीसाठी ४ जी स्पेक्ट्रम दिला जात नाही.खाजगी कंपनीना सरकार कर्ज देते परंतु बीएसएनएलला मात्र देत नाही.  व त्याच बरोबर कंपनीला नफ्याकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आपली सरकारी कंपनी असल्याने सरकारच्या आदेशानुसार अनेक योजना अंतर्गत शहराबरोबर ग्रामीण भागातील ग्राहकांना सुविधा द्यावी लागते. आपणाला  माहित आहे कि गेल्या काही वर्षापासून आपल्या कंपनीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अपुरे कर्मचारी,अपुरी साधनसामुग्री,अपुरे फंड,अनेक योजना वेळेत न राबविणे इत्यादी कारणामुळे कंपनी अनेक वर्षे तोट्यात गेली. इच्छा असतानाहि आपण ग्राहकांना समाधानकारक सेवा या कारणामुळे देवू शकलो नाही.तरीपण आशा परस्थितीत सयुंक्त मार्चेच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यास भाग पाडून व  कर्मचार्यांनी  जास्तीत जास्त मेहनत घेवून कंपनीला गेल्या दोन वर्षापासून नफ्याकडे नेत आहेत.कर्मचारी ग्राहकांच्या सुविधेबरोबर कंपनीने ज्या योजना बाजारात आणल्या त्यांचे विपणन(मार्केटिंग) करून कंपनीला ग्राहकाबरोबर महसूल मिळवून दिला पाहिजे .आपल्याला या परस्थितीतही कंपनी वाचविण्यासाठी  या पेक्षाही जास्त जोमाने काम करून कंपनी नफ्याकडे नेण्यासाठी  प्रयत्न करावे  लागणार आहे.संघटनेने केलेल्या  कामाबाबत मराठी पत्रके काढून मूळ सभासदांपर्यंत जातील याची काळजी घेतल्यास संघटना बळकट होईल.व येत्या व्हेरिफिकेशनसाठी मदत होईल.  

 

 

कॉ.नागेशजी नलावडे , महाराष्ट्र परिमंडळ सचिव - मागील अधिवेशनाच्या परिमंडळ कार्यकारणी बेठकी चा अहवाल वृतांत परिमंडळ सचिव कॉ.नागेशजी नलावडे यांनी सभेत वाचून दाखविण्यात आला.सदर अहवाल सभेत सर्वांनी एकमताने मंजूर केला.

तसेच कॉ.नागेशजी नलावडे ,परिमंडळ सचिव यांनी  1.1.2017 पासून लागू असणाऱ्या  वेज रिवीजन आपणास संघटना मिळवून देणार आहे व ते मिळणार आहेच.आजच्या परस्थितीत बीएसएनएल कंपनी वाचविण्यासाठी संघटनेपुढे मोठे आव्हान आहे.

हे सरकार खाजगीकरण कडे झुकलेले आहे.पोस्ट,रेल्वे असणारे सरकारी खाते सुद्धा तोट्यात दाखवून खाजगीकरण  करत आहे.ओ एन जी सी मध्ये पेट्रोल फिल्टर साठी ५०-६०  प्लांट साठी टेंडर मागितले होते पैकी फक्त ९० % रिलायन्स कंपनीला दिले.       

 येत्या सप्टेंबर मध्ये व्हेरिफिकेशन होत आहे त्यामुळे आपल्या संघटनेमुळे बीएसएनएल आजपर्यंत आहे,व यापुढेही राहील तेव्हा हि संघटना एक नंबर वर रहाणे गरजेची आहे.महाराष्ट्राने आजपर्यंत जास्त मतदान दिले आहे यावेळीही आपणास आपल्या सहकार्याने एक नंबरची मते देण्यासाठी  सर्व जिल्हा सचिवांनी आपापल्या जिल्ह्यातील सर्व शाखा सचिवांना  सविस्तर माहिती देवुन मतदान  करण्यासाठी प्रत्येक सभासद्पर्यंत पोहोचले पाहिजे.

 

 या बैठकीला सहाय्यक महासचिव कॉ.जॉन वर्गीस हजर राहून मार्गदर्शन केले.त्याच बरोबर महाराष्ट्र परिमंडळ सहाय्यक सचिव कॉ.भालचंद्र माने,कॉ.विठ्ठल औटी, कॉ,अतुल वाटवे,कॉ.गुलाब काळे,कॉ.गणेश हिंगे,उप्पाध्यक्ष,कॉ.मिश्रां,कॉ.कुलकर्णी,परभणी.कॉ.गुळुंजकर,कॉ.वरगुडे,यांनीही सभेला मार्गदर्शन केले

         जिल्हा अहवाल  त्या नंतर कॉ.संजय नागणे,जिल्हासचिव,धुळे, कॉ.पाटील,जिल्हासचिव,नाशिक,  कॉ.कौतिक बस्ते.जिल्हासचिव,कल्याण,  कॉ.खंडागळे जिल्हासचिव,लातूर,  कॉ.निलेश काळे,जिल्हा सचिव,जळगाव, कॉ.जकाती ,जिल्हा सचिव पुणे कॉ,,कदम,कोल्हापूर, कॉ.सूर्यवंशी ,परभणी, ,कॉ.पाटील पी.आर.रत्नागिरी,कॉ.लाल शेख ,अहमदनगर, कॉ.सुभेदार जिल्हा सचिव सातारा, .कॉ.केकरे , सर्कल ऑफिस मुबई ,तसेचजिल्हासचिव,कॉ.पंचम गायकवाड अध्यक्ष नागपूर,यवतमाळ,अकोला,बुलढाणा,अमरावती,

कॉ.वाघचौरे,औरंगाबाद, ,कॉ.योगेश बोरुडे भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली,कॉ.कुबेर,जालना,रत्नागिरी,कॉ.बोडस,सांगली, कॉ.गणेश वाघाते,सिंधदुर्ग,सोलापूर कॉ.पठाण ,वर्धा,कॉ.कोंडाळवाडे,नांदेड,

कॉ.राजेश श्रीवास्तव,डब्लू,टी.पी.,डब्लू टी.आर.सर्कल ऑफिस,कॉ.चांदोरकर,सिव्हील/इलेक्ट्रिकल विंग यांनी त्यांच्या जिल्ह्यांचा अहवाल व समस्या सभागुहासमोर मांडल्या.त्याची नोंद इतिवृतांतामध्ये घेण्यात आली  व नंतर त्यावर शेवटी कॉ.नलावडे परिमंडळ सचिव यांनी सविस्तर उत्तरे दिले व सांगितले कि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हि संघटना या पुढेही कर्मचार्यांच्या समस्याबरोबर बी एस एन एल कंपनीसाठी लढणार आहे.

                    इतिवृतांत संपूर्ण अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सर्व नेत्याने मांडलेले विचार व समस्या याचा इतिवृतांत लिहून काढण्यात आलेला आहे. या इतिवृतातच्या आधारे परिमंडळ शाखा संघटनेच्या पातळीवर कार्यवाही करेल.  

                  शेवटी   सर्व प्रतिनिधी,सर्व जिल्हा सचिव,सर्व परिमंडळ कार्यकारणी व पुणे   जिल्ह्याचे सर्व कोम्ब्रेड ज्यांनी हे सी.डब्लू.सी. यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले असे कॉ.जकाती  व कॉ.गुळून्जकर  यांची सर्व टीम यांचे विषेश आभार मानून अधिवेशन समाप्त करण्यात आले.

 

20-Jul-2019

पुणे CWC साठी स्पेशल रजेबाबत पत्र...

15-Jul-2019

दिनांक २८ जुलै २०१९ रोजी पुणे येथे “महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी”(CWC)ची बैठक...

    बीएसएनएलइयु महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी(CWC)ची बैठक सोबतच्या नोटीस नुसार रविवार दिनांक-२८ जुलै २०१९ रोजी Emerald Multipurpose Hall S. No. 15, Behind Mercedes Benz show room, Near Vibghyor International  school, Mhalunge Pune – 411045  या ठिकाणी संपन्न होत आहे.

           तरी सर्व  कार्यकारणी सदस्यांना (जिल्हा सचिव व महाराष्ट्र परिमंडळ सदस्य) विनंती करण्यात येते कि बैठकीसाठी दिनांक २८ जुलै २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता वरील ठिकाणी वेळेत हजर रहाणे.

              बैठकीची नोटीस सोबत जोडली आहे.

       -----कॉ.नागेशकुमार नलावडे.सर्कल सेक्रेटरी.महाराष्ट्र सर्कल.

  नोटीस येथे पहा  

View File

03-Jul-2019

बीएसएनएल आणि एमटीएनएल मधील व्हीआरएस लागू करण्यासाठी आणि सेवानिवृत्ती वय 60 वरून 58 पर्यंत कमी करण्याचा सरकारचा प्रस्ताव……….

टाईम्स ऑफ इंडियाने असे म्हटले आहे की, डीओटी बीएसएनएल आणि एमटीएनएल मधील व्हीआरएसच्या अंमलबजावणीसाठी कॅबिनेटने  नोट तयार केली  आहे त्यामध्ये  बीएसएनएल आणि एमटीएनएल कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय 60 वरून  58 पर्यंत कमी करण्याचे ठरविले  आहे.  वेतन खर्च कमी करण्यासाठी बीएसएनएल कर्मचार्यांची संख्या  कमी करणे. याशिवाय, बीएसएनएल आणि एमटीएनएलला 4 जी स्पेक्ट्रम देखील देण्यात येणार आहे.   बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या जमिनी, टॉवर्स आणि ऑप्टिकल फायबर याद्वारे  कमाई करण्याचा विचार करीत आहे. अहवालानुसार सरकार बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद करू इच्छित नाही कारण त्यामुळे  सरकारला 1.2 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे.  

 

 

Important Link

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.