
29-Nov-2018
एक डिसेंबर रोजी AUAB चे सर्व महासचिव ३ डिसेंबर च्या संपाच्या परीसवांदासाठी मुंबईत .....हजारोच्या संख्येने उपस्थित रहा..

या पूर्वीच सूचित केल्याप्रमाणे दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी कॉ.पी.अभिमन्यू महासचिव बीएसएनएल इयु ,कॉ. चंदेश्वर सिंग,महासचिव एनएफटीई तसेच महासचिव AIBSNLEA,व SNEA मुंबई सर्कल ऑफिसमध्ये ३ डिसेंबर पासूनच्या बेमुदत संपाच्या परीसवांदासाठी येत आहेत.
AUAB महाराष्ट्र परिमंडळ व सर्कल ऑफिस शाखा मुंबई तर्फे विनंती करण्यात येते कि सर्व जिल्ह्यातील AUAB च्या जिल्हासचिवानी आपल्या प्रमुख पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना या परीसवांदात सहभागी करावे.
27-Nov-2018
कॉ.पी.अभिमन्यू GS परीसवांदासाठी १ डिसेंबर रोजी मुंबईत .....हजारोनी उपस्थित रहा...
कॉमरेड्स,
आल यूनियन्स एंड एसोसिएशन ऑफ BSNL (AUAB) CHQ नई दिल्लीच्या निर्णयानुसार दिनांक ०३ डिसेंबर २०१८ पासून देशव्यापी बेमुदत संप यशस्वी करण्यासाठी सीएचक्यूचे नेते प्रत्येक सर्कल मध्ये दौरा करतील .त्या नुसार कॉम पी अभिमन्यु GS (महासचिव, बीएसएनएलयुई) हे दिनाक 1.12.2018 रोजी दुपारी १.३० वाजता AUAB च्या परिसवादासाठी मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत्त.
या परीसवांदा साठी मुंबई आणि मुंबईच्या शेजारच्या सर्व जिल्ह्यातील AUAB चे जिल्हासचिव,परिमंडळ सदस्य व सक्रीय कार्यकर्त्यांनी हजर राहायचे आहे.तरी सर्वाना विनंती करण्यात येते कि जास्तीत जास्त संख्येने हजर राहून या परीसवांदात भाग घेवून कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा. .
या कार्यक्रमाची जेवणाची व इतर व्यवस्था मुंबई सर्कल युनियनद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी आपली नावे मुंबई जिल्ह्याचे कार्यकर्ते कॉ.आयुब खान (मो.न- ९८६९२५०७८६) यांच्याकडे देण्यात यावी जेणेकरून जेवण्याची चांगली व्यवस्था करण्यात येईल.
धन्यवाद ...इन्कलाब जिंदाबाद ,,,,हम सब एक है !!!
कॉ.नागेशकुमार नलावडे समन्वयक AUAB महाराष्ट्र परिमंडल.
25-Nov-2018
१००% संपात सहभागी व्हा......AUAB ची जिल्हास्तरावर बैठका घ्या...
सर्व जिल्हासचिव,
कॉम्रेड,
सर्वांनी आपापल्या जिल्ह्यात सर्व संघटना व असोशियनची बैठक घेवून खालील बाबीवर चर्चा ताबडतोब करण्यात यावी व जागुर्ती करण्यात यावी.
देश पातळीवर पुकारलेल्या 3 डिसेंबरच्या संपामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचे आहे. आज सामील होऊन जर संप यशस्वी केला तरच हे सरकार आपली दखल घेईल. अन्यथा बीएसएनएल कंपनीबरोबर आपल्या सुद्धा देशोधडीला लावतील. आज तुम्ही विचार करत असाल की संपात सामील झालो तर माझा पगार कपात होईल मग मी का सामील होऊ?... परिणामाची पर्वा करू नका... अन्यथा पुढील पगार पेन्शन सुद्धा हे सरकार आपल्याला देणार नाही. त्यामुळे आपकी एकजूट दाखवणे गरजेचे आहे BSNL कंपनी ग्रामीण भागात सेवा देते, जिथे आपली कंपनी तोट्यात चालली आहे, तरी सरकारला आपली काळजी नाही. आज आपला कर्मचारी अधिकारी वर्ग उन्हातान्हात काम करतोय लोकांना सेवा देतोय पण सरकारला त्याची कदर नाही म्हणूनच सर्वाना विंनती आहे. आज आपण १००टक्के संपात सामील होऊन हा संप यशस्वी करूया व आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण करून या सरकारला आपली एकजूट दखावू या. तरी कोणीही ही रजेवर जाऊ नये पगार कपात झाला तरी चालेल आज आपण लढा दिला तरच सरकार आपला विचार करतील. अन्यथा पुढे आपल्याला पुढील काळात पेन्शन आणि पगारही देणार नाहीत. त्यामुळे सर्वानी सामील व्हा एकजूट दाखवा अन्यथा आपल्या कंपनीचे खाजगीकरण होण्यापासून कोणीहि अडवू शकणार नाही. या सरकारला हीच वेळ आहे.... आज नाही... तर पुन्हा कधीच नाही....!
चला आपण सर्व संपामध्ये सामील होऊ या !!!
कामगार एकजुटीचा विजय असो !
हम सब एक है !!
इन्क्लब झिंदाबाद !!!
हमारी युनियन हमारी ताकद !!!!
आपला विश्वासू
कॉ. नागेशकुमार नलावडे,सर्कल सचिव
19-Nov-2018
“ BSNLEU MH वेबसाइट ” शी संबंधित ....
(ड्राफ्ट- कॉ.हिंगे,मुंबई,)---जुलै २०१८ मधील गोवा येथील CWC मीटिंग मध्ये झालेल्या निर्णयानुसार आपण आपली महाराष्ट्र परिमंडळ सघटनेची वेबसाइट कॉम. विठ्ठलराव औटी असि.सर्कल सेक्रेटरी आणि कॉम जॉन वर्गीस, AGS नवी दिल्ली / CCM सचिव मुंबई यांच्या मौलिक सहकार्याने नुतनीकरण करून अपडेट केली जात आहे.
सध्या सर्व घडामोडी मराठी भाषेत भाषांतर करुण कॉम.औटी वेळोवेळी अपडेट करत आहेत.
आपली वेबसाईट जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी,आपले संघटने विषयी संघटक विचार व आपल्या जिल्ह्याची माहिती इतर जिल्ह्याला सुद्धा कळण्यासाठी हे माध्यम उत्कृष्ट आहे, तरी एखादया जिल्हा सचिव,पदाधिकारी किंवा सक्रिय कार्यकर्त्यांकड़े काही महत्वपूर्ण माहिती/फोटो असेल व ती वेबसाइट वर टाकायची असेल तर ख़ालील व्हाट्स-अप क्रमांक किंवा e mail द्वारे पाठवावी.
त्या महितीची शहा निशा करून ती वेबसाइटवर टाकण्यात येईल.मात्र माहिती देणाऱ्या पदाधिकार्यांनी / कार्यकर्त्यांने आपले नाव व सघटनेमधील पदनाम नमूद करावे.
तसेच आपली महाराष्ट्र वेबसाईट सभासदाबरोबर इतर कर्मचार्यापर्यंत कशी जास्तीत जास्त पोहोचेल या साठी प्रयत्न करावेत.
Whatsapp NoNo. 9422220466 / E- mail vitthal.auti61@gmail.com
कॉ.नागेशकुमार नलावड़े, परिमंडल सचिव.
19-Nov-2018
०१ डिसेंबर चा महाराष्ट्र बीएसएनएल वर्किंग वुमेन कोआरडीनेशन कमिटीचा मुंबई मधील कार्यक्रम संपामुळे पुढे ढकलला....त्या बाबतचे निवेदन.
(Draft from Com.Ganeshji Hinge ,Mumbai)
महत्वपूर्ण: मै कॉम रेवती आधाव, समन्वयक BSNL WWCC, महाराष्ट्र परिमंडल आपको निवेदन करती हु कि आप सभी जानते है कि दिनांक 1.12.18 को मुंबई में BSNL वर्किंग उमेन कोआर्डिनेशन कमिटी का कार्यक्रम संपन्न होने वाला था 1 जिस सभाके मुख्य वक्ता अपने संघटनके नेता महासचिव कॉम पी अभिमन्यूजी थे 1 लेकिन अचानक दि.3 दिसंबर २०१८ से अनिश्चित हड़ताल के कारण वो इस कार्यक्रम में हिस्सा नही ले पाएंगे 1. इसलिए अपने परिमंडल सचिव कॉम नलवाड़ेजी के अनुमती से इस कार्यक्रम को रद्द किया जाता है और अगली तिथि आल इंडिया कांफ्रेंस होने के बाद जल्द से जल्द घोषित की जाएगी.1 इस दौरान जिल्हा सचिव एवंम सक्रिय महिला कार्यकर्ता को हुई असुविधा के लिए मुझे खेद है1 और आशा करती हूं कि आनेवाला कार्यक्रम आपके सभी के सहयोग से सफल करेगें 1 एक बार आप सभी को क्रांतिकारी लाल सलाम1 धन्यवाद !!!
आपकी सहयोगी .... कॉम रेवती आधाव, समन्वयक BSNL WWCC, महाराष्ट्र परिमंडल.
16-Nov-2018
बेमुदत संपाची नोटीस सीएमडी ना जारी .....दि.०३ डिसेंबर २०१८ पासून बेमुदत संप...
AUAB चे चेअरमन कॉ.चंदेश्वर व निमंत्रक कॉ.अभिमन्यू सह सर्व संघटना व असोशियनच्या महासचिवांच्या सहीचे दिनांक.०३/१२/२०१८ पासून बेमुदत संपाविषयीची नोटीस मा.चेअरमन,बीएसएनएल यांना देण्यात आले.
सोबत सदर पत्र पहा
View File
16-Nov-2018
यवतमाळ ,गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा व वर्धा जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन पार पडले...कॉ.भालचंद्र माने,परिमंडळ सहा.सचिव, कॉ.पुरोषात्तम गेडाम, माजी परिमंडळ सचिव, कॉ.गुलाबराव काळे सह.सचिव,यांची परिमंडळ प्रतिनिधी म्हणून उपस्थिती....

गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा व वर्धा जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन दि.१३ ते १६ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडले, या अधिवेशनासाठी परिमंडळचे प्रतिनिधी म्हणून सहसचिव कॉ.भालचंद्र माने ,कॉ.गुलाब काळे,माजी सर्कल सचिव कॉ.पुरोशोत्तम गेडाम ,संघटक सचिव कॉ.प्रकाश जैन हे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.हे सर्व अधिवेशन अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.तसेच या अधिवेशनात पुढील दोन वर्षासाठी जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली असून जिल्हासचिव व जिल्हाध्यक्ष म्हणून
- गडचिरोली जिल्हा-- कॉ.सदानंद कोरे - जिल्हा सचिव, कॉ.बेनोडेकर - जिल्हा अध्यक्ष
- चंद्रपूर जिल्हा – कॉ.कोल्हे बाबूलाल –जिल्हा सचिव ,कॉ.चंद्रशेखर दलाल –जिल्हाध्यक्ष
- वर्धा जिल्हा -कॉ.आक्रम पठाण जिल्हा सचिव व कॉ. आय.ए.शेख जिल्हा अध्यक्ष
- भंडारा/गोंदिया—कॉ.किशोर कुंभारे-जिल्हा सचिव,कॉ.युवराज लांजवारे जिल्हाध्यक्ष
- यवतमाळ –कॉ.अजय दामले जिल्हा सचिव व कॉ.बेनोडेकर जिल्हाध्यक्ष
यां सर्वांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र परिमंडळातर्फे वरील सर्व जिल्ह्याच्या नवीन कार्यकारणीचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा !!!
15-Nov-2018
३ डिंसेबर १८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा एयूएबीने घेतला ऐतिहासिक निर्णय .... सर्व सरकारी (एनओएफएन, एनएफएस आणि एलडब्लूईई सारख्या )प्रकल्पांच्या कामावर बहिष्कार ....
आज ए.यु ए.बी. मीटिंग नवी दिल्ली येथे आयोजित केली. या बैठकीत एओएबी. अध्यक्ष कॉ. चंद्रेश्वर सिंह, व पी. अभिमन्यू, संयोजक यांनी सर्वांचे स्वागत केले आणि चर्चा सत्रे सादर केली. या बैठकीत कॉमरेड के. सेबस्टीन, जीएस, एसएनईए, कॉम. प्रल्हाद राय, जीएस, एआयबीएसएनएलए कॉ.सुरेश कुमार, जीएस, बीएसएनएल एमएस, कॉम. पाथक, एजीएस, आयजीईटीओए, कॉम. रेवती प्रसाद, एजीएस बीएसएनएल एटीएम, कॉम. अब्दुल समद, एजीएस, टीईपीयू, कॉम. कबीरदास, जीएस, बीएसएनएल ओए, कॉम.जी.एल.जोगी, अध्यक्ष, एसएनईए, कॉम. स्वप्न चक्रवर्ती, डीजीजीएस, बीएसएनएलईयू, कॉमरेड ए.ए.ए खान, अध्यक्ष एसएनईए आणि कॉम. शिवकुमार, अध्यक्ष, एबीएसएनएलएएलए यांनी भाग घेतला.
बैठकीत चालू असलेल्या संघर्षांचे पुनरावलोकन केले गेले आणि डीओटीने जारी केलेल्या ६/११/२०१८ च्या पत्राने गंभीर चर्चा करून विचार केला कि ज्यामध्ये आपल्या सर्व मागण्या नाकारण्यात आलेल्या आहेत.
दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर बैठकीत कर्मचार्यांनी दि.०३/१२/२०१८ पासून अनिश्चितकालीन स्ट्राइक (बेमुदत संप)आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.तसेच दि. ०३/१२/२०१८ पासून एनओएफएन, एनएफएस आणि एलडब्लूईई सारख्या सर्व सरकारी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा बहिष्कार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सर्कल आणि जिल्हा संघटनांना, अनिश्चितकालीन स्ट्राइक यशस्वी होण्यासाठी, एएएबीच्या इतर घटकांशी समन्वयाने ताबडतोब बैठका घेऊन व गंभीर चर्चा करून तयारी सुरू करण्यास विनंती केली आहे.
कामगार एकजुटीचा विजय असो....हम सब एक है !
सोबत पत्रक पहा.
View File
13-Nov-2018
दूरसंचार विभाग (DOT) कडून आपल्या प्रमुख मागण्या अमान्य करण्यात आल्या ...आता आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय नाही ...तीव्र आंदोलनास .सज्ज राहा.
AUAB और सेक्रेटरी, टेलीकॉम के बीच 02.11.2018 को सम्पन्न मीटिंग में यह बताया गया था कि DoT द्वारा BSNL से कुछ जानकारियां (queries) मांगी जाएगी। साथ ही यह भी बताया गया था कि BSNL से जवाब मिल जाने के बाद DoT द्वारा 3rd पे रिवीजन के संबंध में कैबिनेट नोट को अंतिम रूप दिया जाएगा। अब ज्ञात हुआ है कि DoT ने BSNL को पत्र लिख कर कुछ क्वेरीज प्रस्तुत की है। यह भी ज्ञात हुआ है कि उस पत्र में DoT ने हमारी 3rd पे रिवीजन, BSNL को 4G स्पेक्ट्रम का आवंटन और वास्तविक मूल वेतन पर पेंशन कॉन्ट्रिब्यूशन की मांग को परोक्ष रूप से रिजेक्ट कर दिया है।
माननीय संचार राज्य मंत्री द्वारा दिए गए आश्वासनों पर विगत 8 माह में DoT ने कोई कार्यवाही नही की है। अब उन्होंने स्पष्ट रूप से हमारी सभी प्रमुख डिमांड्स रिजेक्ट कर दी है। अतः CHQ, सभी सर्किल व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज के संज्ञान में लाना चाहेगा कि ऐसे में, अब हमारे पास हड़ताल/अनिश्चितकालीन हड़ताल पर जाने के अलावा कोई दूसरा विकल्प नही बचा है। सर्किल व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज से अनुरोध है कि इस संबंध में हुई प्रगति सभी कर्मचारियों में व्यापक रूप से प्रसारित करें और कर्मचारियों को हड़ताल हेतु प्रेरित करने के लिए हर संभव प्रयास करें।
09-Nov-2018
AUAB चा आंदोलन कार्यक्रम पुढे नेण्याचा ठाम निर्णय- दि. १४/११/२०१८ रोजी मोठ्या प्रमाणात सर्कल व जिल्हा स्तरावर रैली काढण्यात यावी.
दूरसंचार विभागाच्या सचीवाबरोबर झालेल्या बैठकीत चर्चेअंती समाधानकारक निर्णय झाला नाही त्यामुळे सर्व संघटना व असोशियन्स (AUAB) शेवटी ठरविलेल्या आंदोलन कार्यक्रमानुसार दिनांक १४ नोव्हेंबर २०१८रोजी कॉर्पोरेट,सर्कल व जिल्हा स्तरावर प्रभावीपणे रैली काढून यशस्वी करण्याचे अवहान करण्यात आले आहे. तसेच या रैलीच्या दरम्यान आपल्या मागण्याचे फ्लेक्स बोर्ड व पत्रके सामान्य जनतेला समजण्यासाठी बनविण्यात यावेत. संयोजक या नात्याने सर्व जिल्हा सचिवानी सर्व संघटना व असोशियन यांना बरोबर घेवून हे आंदोलन यशस्वी करावे. कॉ.नागेशकुमार नलावडे ,परिमंडळ सचिव.