03-Sep-2018

५ सप्टेंबर रोजी मजदूर किसान संघर्ष रॅली – बीएसएनएलईयू संघटनेची रॅली Eastern Court पासून (पूर्व न्यायालयापरिसर) सुरू होवून संसद रस्त्यावर मुख्य रॅलीमध्ये सामील होईल.

अगोदरच  घोषित केल्याप्रमाणे, मजदूर किसान संघर्ष रॅली ०५ सप्टेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे आणि  बीएसएनएलईयू संघटना  या मेळाव्यामध्ये भाग घेत आहे. या रॅलीभाग घेण्यासाठी बीएसएनएलईयूचे नेते आणि सदस्य देशभरातील सर्व भागांमधून येणार  आहेत. ०५-0-२०१८  रोजी सकाळी, मुख्य मेळावा रामलीला मैदानापासून सुरू होईल आणि संसद रस्त्यावर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचेल .  मात्र बीएसएनएलईयू संघटनेचे सर्व नेते व सदस्य  रॅलीत सहभागी होण्यासाठी इस्टर्न कोर्ट येथे जमा होवून सुरुवात करतील व  संसद रस्त्यावर मुख्य रॅलीमध्ये सामील होतील  असा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून, बीएसएनएलईयूचे विविध सर्कल मधून येत असलेले  नेते आणि सहकारी यांना विनंती करण्यात येते कि सर्वांनी इस्टर्न कोर्ट (पूर्व न्यायालया) जवळ   सकाळी 9 .30 वाजता जमा व्हावे..तरी  सर्कल  व जिल्हा सचिवांना विनंती आहे की हे सर्व लक्षात घेवून त्यांच्या सर्व  सदस्यांना त्यानुसार मार्गदर्शक करा.. सीएचक्यूने बॅनर, ध्वज आणि प्ले  कार्डांची व्यवस्था केलेली  असून ते  इस्टर्न कोर्ट या ठिकाणी वितरित केली जाईल.

         तसेच महाराष्ट्र सर्कल मधील सर्व जिल्हा सचिवांना विनंती आहेकी रैलीत भाग घेणाऱ्या सदस्यांची संख्या व नावे  सविस्तर जाण्या - येण्याच्या कार्यक्रमासह कॉ.गणेश हिंगे यांच्याकडे ताबडतोब देण्यात यावीत जेणेकरून सदस्यांची  गैरव्यवस्था होणार नाही.

22-Aug-2018

कॉ..पी.अभिमन्यू महासचिव बीएसएनएलईयू यांचे मा.श्री पीयूष गोयल, वितमंत्री,भारत सरकार यांना बीएसएनएल मधील पेन्शन अंशदान ( PESION CONTRIBUTION) संबधी पत्र.

 

                    अनेक वेळा संघटनेने पत्रव्यवहार करूनही बीएसएनएलच्या पेन्शन अंशदान समस्येचे निराकरण होणे बाकी आहे. या संदर्भात  मा. मनोज सिन्हा एमओसी  यांनी दिनांक 24.02.2018 रोजी   आश्वासन दिले होते कि  भारत सरकारचा नियम बीएसएनएलच्या संदर्भात सुद्धा लागू केला जाईल,परंतु अद्याप  ही समस्या सोडवली गेली  नाही.

                   म्हणून या विषयासंबंधी श्री पी.अभिमन्यू महासचिव  बीएसएनएलईयू यांनी माननीय श्री पीयुष गोयल,वीत मंत्री भारत सरकार यांना पत्र लिहून  त्यांचे लक्ष वेधले आहे कि  बीएसएनएल कंपनी मध्ये  पेन्शन  अंशदान ( PESION CONTRIBUTION) हे (Maximum Pay Scale) जास्तीत जास्त पे स्केल वर न घेता अक्चुअल बेसिक पे वर घेण्यात यावे.तसेच त्यांच्या हे ही लक्षात आणून दिले कि सध्याच्या  बीएसएनएलची आर्थिक परस्थितीचाही विचार करण्यात यावा .

 

सोबत मंत्र्यांना दिलेले पत्र.

View File

21-Aug-2018

बीएसएनएल वैद्यकीय लाभ बाबत सुधारित पत्र (BSNLMRS)

बीएसएनएल मधील  (वैदकीय लाभ) एमआरएस  लाभार्थींना  वैद्यकीय दावे देताना सुधारित पत्राप्रमाणे अंमलबजावणीसाठी कार्पोरेट ऑफिसचे पत्र (Corporate office letter on systemic improvement in medical claims of BSNLMRS beneficiaries.)

 सोबत पत्र पहा

View File

Important Link

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.