20-Jan-2020

"संचार क्रीडा पदक" कॉ.जॉन वर्गीस यांना बहाल.

17-Jan-2020

कॉ.नागेशजी नलावडे यांची National Council Committee साठी निवड....

मागील व्हेरिफिकेशन नुसार आपल्या संघटनेला ८ जागा सेंटर कोन्सील मध्ये मिळाल्या आहेत.त्यानुसार सेंटर पदाधिकार्यांची बैठक होवून खालील पदाधिकारी कोम्ब्रेडना सेंटर न्याशनल कॉन्सील कमिटी साठी BSNLEUतर्फे नॉमिनेट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र परिमंडळ सचिव कॉ.नागेशजी नलावडे यांची निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन व शुभेच्छा !!!

  1. Com.Animesh Mitra, President.
  2. Com.P.Abhimanyu, General Secretary.
  3. Com.Swapan Chakraborty, Dy. General Secretary.
  4. Com.J. Sampath Rao, CS, Telangana.
  5. Com.N.K. Nalawade, CS, Maharashtra.
  6. Com.S. Chellappa, Asst. General Secretary.
  7. Com.Santosh Kumar, CS, Kerala.
  8. Com.S.R. Das, CS, Odisha.

बीएसएनएलईयु  महाराष्ट्र सर्कल तर्फे सर्व कमिटी मेंबरचे अभिनंदन !!!

 

 

15-Jan-2020

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

14-Jan-2020

कॉ.जॉन वर्गीस AGS यांना संचार क्रीडा अवार्ड ....हार्दिक अभिनंदन !!!

बीएसएनएल मध्ये २०१८ सालाकरिता उत्कुष्ट क्रीडा खेळाडू म्हणून ज्यांनी काम केले अशा देशामध्ये ३० खेळाडूना निवडण्यात आले .त्या मध्ये महाराष्ट्रातून श्री जॉन वर्गीस यांची निवड करण्यात आली .या खेळाडूना रोख रुपये १००००/- मानपत्र व सिल्वर नाणे देवून सत्कार करणार आहेत.

महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी तर्फे कॉ.जॉन वर्गीस ,सहायक महासचिव यांचे हार्दिक अभिनंदन.!!!

पहा 

View File

03-Jan-2020

देशभरात दि.८ जानेवारी २०२० रोजी आम हरताळ..

संपूर्ण भारत देशात कामगारांचा सरकारच्या कामगार व औद्योगिक धोरणाविरोधात एक दिवसाचा (दि.८ जानेवारी २०२० )सार्वजनिक संप पुकारला आहे.या संपांत बीएसएनएलइयु , एनएफटीई सह अनेक संघटना सहभागी होण्याचा निर्णय केला आहे,तरी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांच्या आदेशावरून सर्व जिल्हा सचिव व परिमंडळ सदस्य यांना विनंती आहे कि आपल्या जिल्ह्यात जागृती करून   या संपांत सर्वाना  सहभागी करून यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अहवान करत आहे.

आपला :- कॉ.नागेशकुमार नलावडे,सचिव.महाराष्ट्र परिमंडळ मुंबई.

25-Dec-2019

HAPPY CHRISTMAS

FROM:- BSNLEU MAHARASHTRA CIRCLE

30-Nov-2019

बीएसएनएल कर्मचार्यांच्या तिसरे वेतन पुनरावृत्तीबाबत विचार होणार ... मा.संचारमंत्री या मुद्यावर संसदेत प्रत्युत्तर ..

बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांना तिसरे वेज रिव्हिजन (०१/०१/२०१७ पासून ) बाबतचा  मुद्दा  माननीय खासदार आणि एलपीएफचे सरचिटणीस कॉ.पी.शानमुगम यांनी काल संसदेत उपस्थित केला. माननीय संचार मंत्र्यांनी  त्यावर असे उत्तर दिले आहे की वेतन पुनरीक्षण हा उपलब्ध पर्याय आहे आणि बीएसएनएलचे पुनरुज्जीवन झाल्यावर त्याचा विचार निश्चित केला जाईल.

         यावरून असे दिसते कि  बीएसएनएल कर्मचार्‍यांना वेतन सुधारित करण्याच्या मुद्दय़ावर माननीय संचारमंत्री यांनी दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद आहे .

29-Nov-2019

* सेवा निवृत्तीचे वय (५८) कमी होणार नाही - माननीय मंत्री यांचे संसदेत माहिती. ह्या कारणमुळे VRS -19 घेत असतील तर त्यांनी आपल्या निर्णयचा फेरविचार करावा.*


कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वरुन 58 करून  कमी करणार ह्या भीतीपोटी काही कर्मचारी यांनी VRS साठी अर्ज केला आहे. अशा प्रकारच्या अफवा पध्दतशीर पसरवून  कर्मचाऱ्यावर एकप्रकारे   दबाव टाकण्यात येत आहे.
परंतु पंतप्रधान कार्यलयइन राज्य मंत्री मा डॉ जितेंद्र सिंह यांनी काल दिनांक 27.11.19 रोजी संसदेत जाहिर केले आहे की सरकारी कर्मचारी यांचे निवृत्तिचे वय 60 वरुन 58 करण्यासंबंधी  कोणतीही योजना सरकार आखत नाही. सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून असा जो खोडसाळ पणा  होत आहे त्याला अटकाव करण्यासाठी हे उत्तर मा.मंत्री महोदयांनी दिले आहे.

BSNL Employees Union ने याबाबत  आधीच सर्वाना खात्रीने सूचित केले होते की BSNL मैनजमेंट यांच्या पत्र संख्या BSNL/4/सर/2000 दिनाक 2.1.2001 नुसार BSNL कर्मचार्यांना  आश्वसन देण्यात आले आहे की आपले निवृत्ती वय हे  केंद्र सरकारच्या नियमानुसार असेल.

ह्या आधी दिनांक 25.11.2019 रोजी माननीय राज्य मंत्री (वित्त) श्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सुद्धा है स्पष्ट केले आहे की 60 वय किवा 33 वर्ष सेवा जे आधी असेल ते ह्या धर्तीवर सेवा निवृत्ती देण्या संबंधित सुद्धा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

तरी ज्या कर्मचार्यनी अशा अफवावर विश्वास ठेवून जऱ VRS-19 साठी अर्ज केला असेल तर ते कर्मचारी आज सुद्धा त्यांचा अर्ज  मागे घेवू शकतात.
आपला विश्वासु
कॉम पी अभिमन्यु
महासचिव BSNLEU

22-Nov-2019

व्हीआरएस मधील त्रुटी ताबडतोब काढा अन्यथा VRS पर्याय मागे घेण्यासाठी कर्मचार्यांएना अहवान करणार.. - कामगार संघटनांनी मा .सचिव, दूरसंचार विभाग व मा .सीएमडी, बीएसएनएल याना इशारा ...

व्हीआरएस 2019 मधील त्रुटी जाणून घेतल्याशिवाय, मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांनी व्हीआरएसची निवड केली आहे. व्हीआरएसशी संबंधित बर्‍याच अडचणी सोडवल्याशिवाय बीएसएनएल व्यवस्थापन कर्मचार्‍यांना व्हीआरएस करण्यास भाग पाडत आहे. निवृत्तीनंतर वेतन बदलणे, तिसरे वेतन निवृत्ती नंतर पात्रतेनुसार लागू करणे , सन २००० मध्ये देण्यात आलेल्या वचनबद्धतेचा सन्मान करणे, सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याची व बदल्यांची धमकी आणि नंतर कामाचे ओझे यासारख्या काही महत्त्वाच्या बाबी सोडविणे आवश्यक आहे. जे लोक व्हीआरएस वर जात आहेत त्यांना पेन्शन कम्युटेंशन आणि पीआरसी पात्रता निकाली न लावल्यास त्याना भविष्यात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.त्या साठी बीएसएनएलईयू, बीटीईयू, एफएनटीओ, बीएसएनएल एमएस, बीएसएनएल एटीएम आणि बीएसएनएल ओए यांनी दि .२५.११.२०१९ रोजी एक दिवसाचे उपोषण करनार आहेत . यासाठी वरील संघटनांच्या सेक्रेटरीने , टेलिकॉम सचिव आणि सीएमडी बीएसएनएल यांना पत्र लिहिले आहे की, जर हे प्रश्न निकाली न काढल्यास कर्मचार्‍यांना त्यांचे व्हीआरएस पर्याय मागे घेण्यास सांगितले जाईल.

            तरी सर्व जिल्हा सचिवांना कळविण्यात येते कि आंदोलन यशस्वी करून कर्मचार्यांमध्ये जागृती करावी.

     --------नागेशकुमार नलावडे,सर्कल सचिव,

10-Nov-2019

CWC साठी स्पेशल रजेबाबत पत्र

सोबत CWC साठी स्पेशल रजेबाबतचे पत्र पहा 

Important Link

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.