29-Dec-2018

अखिल भारतीय अधिवेशन “मैसूर” चा थोडक्यात महत्वाचा हिदींत इतिवृतांत

बीएसएनएलईयु अखिल भारतीय अधिवेशन मैसूर येथे दिनांक १७ ते २० डिसेंबर रोजी पार पडले .या अधिवेशनात अनेक महत्वाचया विषयावर चर्चा होवून बीएसएनएल कंपनी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले त्याबाबत थोडक्यात महत्वाचे मुद्दे सोबत हिंदीत देत आहे.

             सदर मुद्दे शाखा सचिव व  जिल्हा सचिवानी कर्मचार्यापर्यंत बैठका घेवून पोहोचविणे .

 

सोबत इतिवृतांत पहा.

 

View File

25-Dec-2018

बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ तर्फे सर्वाना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!

नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

              बीएसएनएलईयु  महाराष्ट परिमंडळ ...

22-Dec-2018

अखिल भारतीय बीएसएनएलइयु संघटनेच्या अध्यक्षपदी कॉ.अमिनेश मित्त्रा व महासचिवपदी कॉ.पी.अभिमन्यू यांची बिनविरोध निवड.कार्यकारणीत महाराष्ट्र सर्कलचे कॉ. नागेश नलावडे व कॉ.जॉन वर्गीस .

           मैसूर(कर्नाटक) येथे बीएसएनएलइयु चे अखिल भारतीय अधिवेशन दि.१७ ते २० डिसेंबर २०१८ रोजी पार पडले.या अधिवेशनामध्ये पुढील तीन (२०१९-२०२१)सालाकरिता नवीन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी कॉ.अमिनेश मित्त्रा व महासचिवपदी कॉ.पी.अभिमन्यू  तसेच महाराष्ट्र सर्कल मधून उपाध्यक्ष पदी कॉ. नागेशकुमार नलावडे व सह महासचिवपदी कॉ.जॉन वर्गीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

         या निवडीबद्दल महाराष्ट्र परिमंडळातर्फे सर्व नवीन कार्यकारणीचे हार्दिक अभिनंदन !!!

20-Dec-2018

आखिल भारतीय ९ वे अधिवेशन मैसूर मध्ये महाराष्ट्र सर्कलने मांडलेले विचार व प्रश्न.

आज दिनांक १९ डिसेंबर अधिवेशनाचा तिसरा दिवस महाराष्ट्र सर्कलला मा.अध्यक्षाने त्यांचे विचार व प्रश्न मांडण्यासाठी ४० मिनिटांचा वेळ दिला.या वेळामध्ये कॉ.नागेशजी नलावडे सर्कल सेक्रेटरी(२५ मिनिट) सहित कॉ.भालचंद्र माने,कॉ.गणेश हिंगे,कॉ.कौतिक बस्ते व कॉ.यसुफ जकाती(प्रत्येकी५ मिनिट ) यांनी महाराष्ट्र सर्कलतर्फे खालील  विचार मांडले.

                      कॉ.नागेशकुमार नलावडे, सर्कल सेक्रेटरी —सध्याचे सरकार बीएसएनएल कंपनी संपविण्याचे काम करत आहे.सरकार इतर टेलीकोम खाजगी कंपनीना आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करते परंतु बीएसएनएल सरकारी कंपनी असून सुद्धा आर्थिक मदत न करता आपल्या  कंपनीला जाणूनबुजून आर्थिकदृष्ट्या दुर्बल करत आहे.

सेन्ट्रल युनियनचा संपाविषयी घेतलेला निर्णय योग्य आहे,आपल्या मागण्या मिळवून घेण्यासाठी AUAB व बीएसएनएलइयु अंत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहे. बीएसएनएल कर्मचार्यासाठी तिसरे वेतन मिळविणे हि मागणी खूप महत्वाची असून कॉ.अभिमन्यू सारख्या नेत्यामुळे ती आपणास मिळणार आहेच .त्यामुळे यापुढेही कॉ.अभिमन्यू सारख्या अभ्यासू ,प्रामाणिक व लढाऊ नेत्याच्या  नेतृत्वाची गरज आहे.

 सोशल मेडीयावर आपल्या मागण्या व विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे या साठी आता गरज आहे.हे सरकार सार्वजनिक उद्योग व सामान्य जनतेविरोधी असून खाजगीकरण करणे व भांडवलदारासाठी काम करत आहे.या सरकारला येत्या निवडणुकीमध्ये धडा  दाखविणे गरजेचे आहे तरच बीएसएनएल कंपनी येत्या काळात टिकू शकते.

 

                            कॉ.गणेश हिंगे ---मुंबई मध्ये MTNL कंपनी बीएसएनएलला   सेवा देत नाही त्यामुळे बीएसएनएलच्या अनेक लाईन्स बंद झाल्या आहेत.फंड न दिल्यामुळे अनेक ठिकाणी वीज बिले थकल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यात आली आहे.या पुढे सोलर विजेचा विचार करण्यात यावा व बीएसएनएल याबाबत स्वयंभू झाली पाहिजे.तसेच महाराष्ट्र सर्कल मध्ये ६०० च्यावर खाजगी वाहने ऑफिसर्स वापरतात शिवाय ट्रान्सपोर्ट भत्ता सुद्धा घेतात. या सर्व गोष्टीचा विचार सेन्ट्रल युनियन केला पाहिजे व म्हणजे  बीएसएनएल आर्थिकदृष्ट्या थोडेफार मजबूत होईल.

 

                                कॉ.कौतुक बस्ते – बीएसएनएल. कर्मचार्यांना तिसरे वेतन मिळाले पाहिजे सबसिडी टॉवर ला मंजुरी देवू नये.आजच्या इतर कंपनीच्या प्रतिस्पर्धा करण्यासाठी ४ जी स्पेक्ट्रम मिळाले पाहिजे या करिता भारतातल्या सर्व खासदारामार्फत निवेदन देवून सुद्धा बोटावर मोजणाऱ्या खासदारांनी हा प्रश्न मांडला.आपण निवडून दिलेले खासदार जर मदत करत नसतील तर या पुढे विचार केला पाहिजे.आपले पंतप्रधान अंबानी बंधूना (JIO) साठी मदत करतात परंतु बीएसएनएल सरकारी कंपनीला मदत करत नाही.जर बीएसएनएल यापुढे वाचवायचे असेल तर या सरकारला ज्या प्रमाणे जनतेने  काही राज्यात बदल केला त्या प्रमाणे यापुढे बीएसएनएलविरीधी सरकारला धडा शिकवला पाहिजे.

                             कॉ.भालचंद्र माने---संघटनेला आता जास्तीत जास्त जागृत राहून काम करणे गरजेचे आहे.बीएसएनएल कंपनी अंत्यंत बिकट परस्थितीततून जात आहे.सरकारवर विश्वास ठेवून आपण काही दिवसासाठी संप मागे घेतला आहे परंतु जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत हा लढा चालू ठेवावा लागणार आहे.कॉ.अभिमन्यू व बीएसएनएलइयु नेत्यावर आमचा पूर्ण विस्वास आहे.ते ह्या सर्व मागण्या मिळवून घेतीलच.आपल्या मागण्या रास्त आहेत परंतु त्यांचे सोशल मेडीयावर पब्लिसिटी होणे गरजेचे आहे त्या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

                           कॉ.यसुफ जकाती –बीएसएनएल मधील आर्थिक प्राब्लेम मुळे लेबरला वेळेवर पेमेंट मिळत नाही, त्यामुळे  बीएसएनएल कंपनीतील मेन्टनसची कामे होत नाहीत  म्हणून लेबरची काम करण्याची मानशीकता रहात नाही. हे सरकार बीएसएनएल कंपनीला कर्ज देततर  नाही परंतु  कर्ज कसे मिळणार नाही यासाठी प्रयत्न करून बीएसएनएल कंपनी लवकरात लवकर संपविण्यासाठी काम करत आहे. परंतु कॉ. पी.अभिमन्यू यांच्या नेतृत्वाखाली बीएसएनएलइयु संघटना हे होवू देणार नाही.कारण आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे कि ते या परस्थितीतून निश्चित मार्ग काढतील. बीएसएनएल कंपनी स्थापन केली त्या वेळेस सरकारने आर्थिक मदत करण्याबाबत लेखी करार केला त्यानुसार  सेन्ट्रल युनियनने प्रयत्न करावे.

 बीएसएनएल कर्मचार्यांच्या तिसर्या वेतन पुनरावृत्तीवर बीएसएनएलईयूच्या 9 व्या अखिल भारतीय अधिवेशनात  ठराव मंजूर..

         बीएसएनएलईयूच्या 9व्या ऑल इंडिया कॉन्फरन्स म्हैसूर येथे आजच्या  सत्रात सरकारने  बीएसएनएल कर्मचार्यांना 15% फिटनेससह तिसर्या वेतन पुनरावृत्तीची पुर्तता करण्याची मागणी केली आहे. या अधिवेशनात  या विषयावर पूर्णपणे चर्चा केली आणि बीएसएनएलच्या नुकसानीस बीएसएनएल कर्मचार्यांचा संबध नसताना   तिसर्या वेतन पुनरावृत्तीस नकार देण्यारया सरकारवर  गंभीरपणे टीका केली. रिलायन्स जिओच्या प्राणघातक किंमतीचा सरकार कसा पाठिंबा देत आहे याविषयी परिषदेने निदर्शनास आणले  आहे, ज्यामुळे दूरसंचार उद्योगातील सध्याच्या संकटांना तोंड द्यावे लागले आहे. शिवाय, बीएसएनएल कर्मचार्यांना वाजवी वेतन फेरबदल नकार देऊन खाजगी टेलिकॉम कंपन्यांना सरकार जामीन-आउट पॅकेज देत आहे यात सुद्धा  कॉन्फरन्समध्ये चर्चा करून  लक्ष वेधले आहे. तृतीय वेतन पुनरावृत्ती वाजवी वेळेत व्यवस्थित  न केल्यास कर्मचार्यांना संपूर्णपणे संघर्षासाठी संघटित करण्यासाठी मंडळ आणि जिल्हा संघटनांना आवाहन केले आहे.   केरळच्या सर्कल सेक्रेटरी कॉ.सी. संतोष यांनी ठराव मांडला आणि   गुजरातचे सर्कल सेक्रेटरी कॉ.बक्कुरा यांनी अनुमोदन दिले.

            या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून २५० (१३० प्रतिनिधी व १२० व्हिजिटर) च्यावर प्रतिनिधी  आले असून संपूर्ण भारतातून ६००० ते ७००० प्रतिनिआले आहेत.

20-Dec-2018

बीएसएनएल कर्मचार्यांच्या तिसर्या वेतन पुनरावृत्तीवर बीएसएनएलईयूच्या 9 व्या अखिल भारतीय अधिवेशनात ठराव मंजूर..

         बीएसएनएलईयूच्या 9व्या ऑल इंडिया कॉन्फरन्स म्हैसूर येथे आजच्या  सत्रात सरकारने  बीएसएनएल कर्मचार्यांना 15% फिटनेससह तिसर्या वेतन पुनरावृत्तीची पुर्तता करण्याची मागणी केली आहे. या अधिवेशनात  या विषयावर पूर्णपणे चर्चा केली आणि बीएसएनएलच्या नुकसानीस बीएसएनएल कर्मचार्यांचा संबध नसताना   तिसर्या वेतन पुनरावृत्तीस नकार देण्यारया सरकारवर  गंभीरपणे टीका केली. रिलायन्स जिओच्या प्राणघातक किंमतीचा सरकार कसा पाठिंबा देत आहे याविषयी परिषदेने निदर्शनास आणले  आहे, ज्यामुळे दूरसंचार उद्योगातील सध्याच्या संकटांना तोंड द्यावे लागले आहे. शिवाय, बीएसएनएल कर्मचार्यांना वाजवी वेतन फेरबदल नकार देऊन खाजगी टेलिकॉम कंपन्यांना सरकार जामीन-आउट पॅकेज देत आहे यात सुद्धा  कॉन्फरन्समध्ये चर्चा करून  लक्ष वेधले आहे. तृतीय वेतन पुनरावृत्ती वाजवी वेळेत व्यवस्थित  न केल्यास कर्मचार्यांना संपूर्णपणे संघर्षासाठी संघटित करण्यासाठी मंडळ आणि जिल्हा संघटनांना आवाहन केले आहे.   केरळच्या सर्कल सेक्रेटरी कॉ.सी. संतोष यांनी ठराव मांडला आणि   गुजरातचे सर्कल सेक्रेटरी कॉ.बक्कुरा यांनी अनुमोदन दिले.          

17-Dec-2018

अखिल भारतीय अधिवेशन बीएसएनएलईयु मैसूर (कर्नाटक) येथे सुरु.

आज सकाळी ठीक १०.३० वाजता जयाम्मा गीविंद गोडा कुवेंपु नगर,मैसूर येथे अधिवेशनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे मा.कॉ.तपनसिंग महासचिव सी आयटी यु ,कॉ.आमनुल्ला खान,कॉ.नम्बुदरी कॉ.अभिमन्यू महासचिव,कॉ.बलबीरसिंग अध्यक्ष  बीएसएनएलइयु  अखिल भारतीय महासचिव एल आय सी कर्मचारी संघटना यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

              कॉ.तपनसिंग यांनी सभेला संबोधित करताना सांगितले कि गेल्या काही वर्षापासून सरकार सार्वजनिक सरकारी कंपन्या बीएसएनएल कंपनीसह  संपविण्याचे काम करत आहे.सरकारी कंपन्याचे धोरणे बंद करून ग्राहकांची सेवा संपविण्याचे मोठे दुर्दयी काम करत आहे.खाजगी कंपन्यांना सढळ हाताने  मदत करण्याचे काम हे सरकार करत आहे.

            कॉ.अम्मानुउल्ला खान महासचिव LICकर्मचारी संघटना म्हणाले आमची कंपनी गेल्या काही दिवसात अंत्यंत चांगली सेवा देत असताना गेल्या काही दिवसापासून आम्हाला खाजगी कंपन्या स्पर्धेत उतरवून आमचे चांगले प्ल्यान बंद करण्यात आलेत.त्या मुळे आम्हाला सुद्धा आज ग्राहकास सेवा देता येत नाही.बीएस एन एल प्रमाणे LIC संपविण्याचे काम हे सरकार करत आहे.एकीकडे मुकेश अंबानी सारख्या भांडवलदाराला हाताशी धरून देशात खाजगीकरणची लाट आणत आहे.ह्या सरकारने लोंकाना खोटे अशावासन देवून खुर्चीवर बसले आणि आता मुठभर भांडवल दारासाठी काम करत आहे.

           आज खरोखर सार्वजनिक कंपन्यातील संघटनेला देश खाजगीकरणातून वाचविण्याचे महत्वाचे काम करावे लागणार आहे व ते करत आहे.

            शेवटी त्यांनी आजच्या या अधिवेशनाला मनापासून शुभेच्छा दिल्या व कामगार एकजुटीचे कौतुक केले.

        कॉ.नाम्बोदरी यांचे सर्व सभाग्रहाणे टाल्याच्या गजरात स्वागत करून सत्कार केला.कॉ.नम्बोदरी यांनी आपल्याला अधिवेशनासाठी बोलाविल्याबद्दल आभार मानून  भाषणात सांगितले कि बीएसएनएल कंपनीला संपविण्याचे काम दोन्हीही सरकारने केले आहे.परंतु गेल्या सरकारपेक्षा हे सरकारने बीएसएनएल कंपनी संदर्भाबाबत  कोणतेही आश्वासन पाळले नाही.पे रिविजन बाबत हे सरकार निगेटिव्ह विचार करते.या साठी सर्व संघटना व असोशियन एकत्र येवून स्ट्रगल करत आहेत.या साठी खूप प्रयत्न करावे लागतील.मला गर्व आहे कि आपली संघटना क्याजुअल मजदूर ,सेवानिवृत्त कार्माचार्याबरोबर बीएस एन एल कंपनी व त्यामधील वर्कर्स साठी इतर संघटनांना बरोबर घेवून ट्रेड युनियन अक्टला धरून लढा देत आहे.

         या अधिवेशनासाठी देशातून ५००० ते ६००० प्रतिनिधी उपस्तीत झाले आहेत तसेच  महाराष्ट्रामधून अनेक जिल्ह्यातून  जिल्हा सचिव ,परिमंडळ पदाधिकारी सह   १५० प्रतिनिधी हजर झाले आहेत.  

दुपारी ३.०० वाजता मैसूर शहरातून रेली काढण्यात आली .कार्माचार्यानाच्या मागण्य्बाबत रेली मध्ये घोषणा देण्यात आल्या. जवळ जवळ ३००० प्रतिनिधी हजर झाले होते.

  सायंकाळी ५ वाजता खुले अधिवेशन घेण्यात आले.प्रशासनाचे प्रतिनिधी सह इतर संघटनेचे व  असोशीयन चे नेते कॉ.चंदेश्वर सिंग महासचिव  एन एफ टी ई ,कॉ.सबस्टेन ,महासचिव SNEA ,कॉ.प्रल्हाद रोय महासचिव,AIBSNLEA कॉ.सुरेश कुमार महासचिव BSNLMS,कॉ.सिंग ,BSNLEOA यांनी सभेला संबोधित केले.AUAB ही बीएसएनएल कंपनी व कर्मचार्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली असून या पुढे कोणतेही मतभेद न करता सरकारच्या बीएसएनएल विरोधी धोरणाविरोधात लढणे व बीएसएनएल वाचविणे हे एकमेव ध्येय ठेवून कार्य करेल असे सर्व नेत्यांनी सांगितले. संप पुढे ढकलण्याचा निर्णय अंत्यंत विचारपूर्वक घेण्यात आला असून या मध्ये कोणत्याही एका संघटनेचा निर्णय नसून हा सामुदाईक निर्णय होता असेही सर्व नेत्यांनी सांगितले.तसेच या पुढील  आंदोलने एकत्रित लढण्याचा निर्धार सर्व नेत्यांनी केला. जर सरकारने मागण्या जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर त्यानंतर पुढील आंदोलनासाठी तयार राहून सहकार्य करण्याचे अहवान करण्यात आले.

  

सोबत फोटो पहा

14-Dec-2018

महत्वाचे:- Sr.TOA च्या स्क्रीनिंग टेस्ट बाबत

दिनांक १६ डिसेंबर २०१८ रोजी Sr.TOA च्या स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात येणार आहेत.या बाबत सविस्तर  माहिती अगोदरच देण्यात आली आहे.हि परीक्षा शेवटची असू शकते.तरी सुद्धा काही SSAने अद्याप HALL Ticket दिलेली नाहीत तरी सर्व जिल्हासचिवाना विनंती आहे कि त्यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून  त्या कार्माचार्याना सहकार्य करून हाल तिकेट मिळवून द्यावीत.

नंतर याबाबतची जबाबदारी कोणीही स्वीकारणार नाही.

 

11-Dec-2018

रिसेप्शन कमिटी मैसूरने अधिवेशनाबाबत सूचना व माहिती पत्र.

बीएसएनएलइयु चे  ९वे अखिल भारतीय अधिवेशन दि.१७ ते २० डिसेंबर २०१८ दरम्यान मैसूर मध्ये होत आहे ,

त्या साठी पदाधिकारी व प्रतिनिधी साठी  रीसेप्शन कमिटीने सविस्तर माहिती पत्र जारी केलेआहे.

सदर पत्र सोबत जोडत आहे.  त्या प्रमाणे सर्व जिल्हा सचिव व येणाऱ्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी.

 याबाबत कोणाला काही शंका किंवा समस्या असतील तर त्याबाबत कॉ.जॉन वर्गीस ,सह्हायक महा सचिव    यांच्याशी संपर्क करण्यात यावा.

 

View File

10-Dec-2018

अखिल भारतीय अधिवेशनच्या स्पेशल क्यजुअल लिव्ह बाबत.

दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान होणारया अखिल भारतीय अधिवेशनाच्या प्रतिनिधी साठी स्पेशल क्यजुअल रजेबाबत कॉ.पी अभिमन्यू महासचिव बीएसएन एल इयु यांनी पत्र दिले आहे.तरी सर्व प्रतिनिधीने रजेची मागणी करावी.

सोबत पत्र पहा

View File

04-Dec-2018

ऑल यूनियन्स एंड एसोसिएशन्स ऑफ बीएसएनएल (AUAB) के निर्णय.... 4 मुद्दों पर DOT व MOS(C) सकारात्मक..इस चर्चे के रेकोर्ड नुसार डीओटीने बीएसएनएल को दिया पत्र....

          कल 03.12.2018 को AUAB के चेयरमैन कॉम चंदेश्वर सिंह की अध्यक्षता में AUAB की मीटिंग सम्पन्न हुई। मीटिंग में माननीय संचार राज्य मंत्री श्री मनोज सिन्हा से AUAB के साथ हुई चर्चा की समीक्षा की गई। मीटिंग के निष्कर्ष निम्नानुसार है।

(1) AUAB के कॉल को BSNL के सभी एग्जीक्यूटिव और नॉन एग्जीक्यूटिव का अद्भुत प्रतिसाद (रिस्पांस) व सहयोग मिला।

(2) फलस्वरूप 02.12.2018 को AUAB और सेक्रेटरी, टेलीकॉम के बीच और आज 03.12.2018 को AUAB और माननीय संचार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) के बीच गंभीरता के साथ चर्चा हुई।

(3) उपर्युक्त चर्चा के दौरान माननीय संचार राज्य मंत्री और सेक्रेटरी, टेलीकॉम के द्वारा निम्न खुलासा किया गया।

(a) बीएसएनएल को स्पेक्ट्रम आवंटन के लिए कैबिनेट के अनुमोदन हेतु प्रकरण यथाशीघ्र कैबिनेट को प्रस्तुत किया जाएगा। इस हेतु विभिन्न संबंधित मंत्रालयों (नोडल मिनिस्ट्रीज) से विचार विमर्श (interaction) के लिए DOT के वरिष्ठ अधिकारी को डेप्यूट किया जाएगा।

(b) बीएसएनएल से रिटायर्ड कर्मियों के पेंशन रिवीजन को कार्यरत कर्मियों के वेज रिवीजन से अलग (delink) किया जाएगा और पेंशन का रिवीजन शीघ्र ही किया जाएगा।

(c) बीएसएनएल द्वारा पेंशन कॉन्ट्रिब्यूशन के भुगतान हेतु गवर्नमेंट के नियम लागू किए जाएंगे।

(d) बीएसएनएल के डायरेक्ट रिक्रूट कर्मचारियों के 30% सुपरएन्युएशन बेनिफिट्स के संबंध में CMD BSNL ने आश्वासित किया कि बीएसएनएल के डायरेक्ट रिक्रूट कर्मचारियों के पेंशन कंट्रीब्यूशन में 3% की वृद्धि मार्च 2019 तक की जाएगी और शेष 4% की वृद्धि अगले चरण में होगी। स्टैण्डर्ड पे स्केल के मसले पर AUAB ने BSNL के प्रस्ताव को लागू करने की मांग की। मंत्री महोदय ने इसे कंसीडर करने हेतु DOT के अधिकारियों को निर्देश दिए।

(e) बीएसएनएल एम्प्लॉईज के 3rd PRC के मुद्दे पर AUAB की मीटिंग में महसूस किया गया कि इस मुद्दे के निदान हेतु DOT और बीएसएनएल मैनेजमेंट को कुछ और समय दिया जाए।

स्थिति की विस्तृत रूप से समीक्षा करने के बाद मीटिंग में सर्वानुमति से आगामी सूचना तक हड़ताल स्थगित करने का निर्णय लिया गया।

   और आज दि.४ डिसेंबर को कल कि  मीटिंग में माननीय संचार राज्य मंत्री श्री मनोज सिन्हा से AUAB के साथ हुई चर्चा की समीक्षा की गई। मीटिंग के निष्कर्ष  रेकार्ड नुसार डीओटी ने बीएसएनएल को पत्र लिखा है।

डीओटी का पत्र

डाऊनलोड कीजिए:

 

View File

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.