04-Sep-2020

कॉ.भालचंद्र माने,सहाय्यक सचिव, बीएसएनएलच्या सेवेतून ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवूर्त..

कॉ..भालचंद्र माने बीएसएनएलइयु महाराष्ट्र परिमंडलाचे सहाय्यक सचिव यांची ३१ ऑगस्ट २०२० रोजी बीएसएनएलमधील पूर्ण सेवा करून सेवानिवूर्त झाले आहेत.

कॉ.माने,बीएसएनएलइयु संघटनेत पहिल्या व्हेरिफिकेशन पासून तर आजपर्यंत अंत्यंत  सक्रीय राहून नेतृत्व केले आहे.महाराष्ट्रात संघटना वाढविण्यासाठी ज्या मोजक्या नेत्यांचे खास काम केले त्या यादीत कॉ.माने आहेत. त्यांची पोस्टिंग मुंबई  सर्कल ऑफिस मध्ये असल्याने सर्कल ऑफिसमधील संघटनेचे  सर्व कामे मार्गी लावण्यासाठी कॉ.माने यांचा खूप मोठा वाटा आहे. संघाच्या बीएमएस संघटनेत सुरुवातीला काम केल्यानी त्यांच्या वकृत्वात खास शैली होती त्यांचे भाषनामध्ये एक वेगळाच जोश असे.

संघटनेत त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.त्यांनी तात्विक वादाला जास्त ताणून न धरता संघटनेला महत्व दिले आहे.

     भविष्यात ते संघटनेत कामं करणार आहेतच परंतु सर्कल ऑफिसमधील  कामाचा ताबडतोब  पाठपुरावा करण्यसाठी साठी एका नेत्याची उणीव संघटनेला जाणवणार आहे.

 असो त्यांच्या या योगदानाबद्दल संघटना व महाराष्ट्र परिमंडळ शाखा आभारी आहे.

 त्यांच्या भावी सेवानिवूर्त आयुष्य कार्यकालासाठी त्यांना आरोग्यमय व उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्राथना !!!

04-Sep-2020

कॉ.भालचंद्र माने,सह्हायक सचिव,महाराष्ट्र सर्कल हे बीएसएनएलच्या सेवेतून निवूर्त..

25-Aug-2020

मान्यताप्राप्त हॉस्पिटलला मुदत वाढविण्यासाठी पत्र..

मा.सी.जी.एम. महाराष्ट्र सर्कल मुंबई, यांना कॉ.नागेशकुमार नलावडे ,सर्कल सेक्रेटरी यांनी मान्यताप्राप्त हॉस्पिटलसाठी मुदत वाढवून देवून मेडिकल सुविधा देण्यासाठी पत्र दिले.

            सोबत पत्र पहा

View File

25-Aug-2020

सेवानिवूर्त कर्मचार्यासाठी संघटना कार्य करते..

*सर्व सेवानिवृत्त कॉम्ब्रेड,
आपली संघटना,
ST चा मुद्दा असो वा PPO संबंधी अङचणी BSNLEU AIBDPA यावर सतत प्रशासनाशी झगडत आहे. कॉ. नंबोदरीना खात्री आहे कि ह्या महीनाअखेर पर्यंत सर्व VRS सहकार्यांच्या तमाम समस्या सोडविण्यात आपली संघटना यशस्वी झालेली असेल...*
BSNLEU AIBDPA यांचे संस्थापक कॉ. ंबुदिरी असल्याने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपली वर्कींग BSNLEU व रीटायर असो. AIBDPA काम करत आहे.
आपले नम्र
सचिव महाराष्ट्र परिमंडळ, AIBDPA


 

13-Aug-2020

सेवानिवूर्त कर्मचार्यांचे आंदोलन..

13-Aug-2020

बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बैठक (CWC) दिनांक १३/०८/२०२० रोजी व्हिडीओकॉन्फरन्स द्वारे ...

बीएसएनएलईयुची महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बेठक (Circle Working Committee Meeting) दिनांक १३/०८/२०२० रोजी कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आली.,कॉ.आप्पासाहेब गागरे,यांच्या अध्यक्षतेखाली व बीएसएनएलईयुचे महासचिव कॉ.पी.अभिमन्यू व सह जनरल सेक्रेटरी कॉ.जॉन वर्गीस ,कॉ.नागेशकुमार नलावडे यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

ह्या बैठकीत विशेषकरून सध्याच्या बीएसएनएलची वाताहत व सरकारची नीती या बाबत सर्वांनी प्रश्न उपस्थित केले.बीएसएनएलकर्मचार्याविषयी खासदार श्री. हेगडे यांनी जे वक्तव्य केले त्यांचा सर्वांनी निषेद व्यक्त केला.आज संपूर्ण देशात श्री .हेगडे यांच्या विरोधात घोषणा देवून निदेर्शने करण्यात आली.सर्वच जिल्हा सचिवानी अनेक शंका विचारल्या या प्रश्नाना कॉ.नलावडे व कॉ.पी अभिमन्यू यांनी सविस्तर उत्तरे दिले.

कॉ.पी.अभिमन्यू,यांनी सध्याच्या घडामोडींवर सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. पुढील काळात सेवानिवूर्त संघटना व लेबर संघटनेला सोबत घेवून आंदोलने करावी लागतील असे सुचविले.या बैठकीत एकूण ३२ सदस्यांनी भाग घेतला . त्या नंतर कॉ.यशवंत केकरे, सचिव सर्कल ऑफिस मुंबई,कॉ.एस.बी.सूर्यवंशी परभणी, कॉ.विलास सावडे,औरंगाबाद जिल्हा सचिव ,सौ.साधना महाडिक संघटक सचिव मुंबई,कॉ.वराडे गडचिरोली,कॉ.कोंडाळवाडे,जिल्हा सचिव नांदेड,,कॉ.गणेश वाघाटे,सिंधदुर्ग,कॉ.मधु चांदोरकर,कॉ.संजय नागणे,जिल्हासचिव,धुळे, जिल्हासचिव कॉ.पाटील, नाशिक, कॉ.कौतिक बस्ते, कॉ.निलेश काळे,जिल्हा सचिव,जळगाव, कॉ.जकाती ,जिल्हा सचिव पुणे ,कॉ.सूर्यवंशी परभणी, कॉ.विजय शिपंणकर,अहमदनगर,कॉ.भालचंद्र माने व कॉ.विठ्ठलराव औटी ,सह सचिव महाराष्ट्र परिमंडळ,.कॉ.संदीप गुळुंजकर ,कॉ.वरगुडे उपाध्यक्ष म.परिमंडळ ,तसेच जिल्हासचिव, यवतमाळ, बुलढाणा,अमरावती, यांनी बैठकीत भाग घेतला.  शेवटी कॉ.नलावडे परिमंडळ सचिव यांनी सविस्तर उत्तरे दिले व सांगितले कि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हि संघटना या पुढेही कर्मचार्यांच्या समस्याबरोबर  व बी एस एन एल कंपनीसाठी लढणार आहे.

 

10-Aug-2020

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची मिळून एकत्र सेवानिवूर्त कर्मचाऱ्यांच्या (संघटनेची) शाखेची स्थापना ...

बीएसएनएलचे रेग्युलर व व्ही आर एस पेन्शनर्स ची जिल्हा कोल्हापूर येथे, कॉम श्री गुंडप्पा एन कोळी यांच्या अध्यक्षते खाली दि ४/८/२०२० रोजी,मिटींग संपन्न झाली। त्यावेळी ए आय बी डी पी ए संघटनेसाठी कोल्हापूर व सांगली ह्या दोन्ही जिल्ह्यासाठी खालील प्रमाणे जिल्हा कार्यकारिणी पदाधीकाऱ्यांची एकमताने निवड झाली।
अध्यक्ष-कॉम श्री गुंडप्पा एन कोळी (9421556922)
सचिव-कॉम श्री बाळासाहेब बी कोळी (9404287073)
कोषाध्यक्ष-कॉम श्री बाबासाहेब व्ही भादुले(9420456105)
संघटक सचिव-कॉम श्री सुभाष के.कोळी(9423959393)
कॉम श्री नागेशजी नलावडे ,बी एस एन एल इ यु परिमंडळ सचिव, कॉम श्री बोडसजी ,बी एस एन एल इ यु जिल्हा सचिव सांगली, कॉम श्री कदम जी,बी एस एन एल इ यु जिल्हा सचिव कोल्हापूर, तसेच कॉम श्री ए एस चौधरी, ए आय बी डी पी ए,संघटक सचिव,सि एच क्यू,महाराष्ट्र , व कॉम श्री आर एन पाटील, ए आय बी डी पी ए, परिमंडळ सचिव,महाराष्ट, ह्यांच्या तर्फे निवड झालेल्या जिल्हा कार्यकारिणी ,पदाधिकारी व सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करून  संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

06-Aug-2020

ट्विटरखाते उघडण्यासाठी खालीलप्रमाणे वापर करून प्रत्येकाने खाते ओपन करा..

Creating Twitter Account for participating in the Twitter Campaign..The AUAB has decided to organise a Twitter campaign, in support of BSNL’s speedy rollout of 4G service, as well as immediate implementation of the assurances given in BSNL’s Revival Package. This Twitter campaign is to mobilise public opinion in favour of BSNL. Since, many comrades may not be having a Twitter account, the CHQ requests them all to immediately open a Twitter account, so that they can participate in the Twitter campaign. The following are the steps for opening a Twitter account.

Step 1:    Go to Twitter.com or download the app and sign up for an account. The "Full name" that you provide will be your display name, but unlike Facebook, you can change your display name to whatever you want as many times as you want, 

Step 2:    Go to Twitter.com and sign up. Use your name, your email, and a password. ...

Step 3:    Join Twitter. Complete the form by entering your name, your email, a password, and a username. ...

Step 4:    Click “create my account”.

Step 5:    Click “next”.

Step 6:    Build your timeline. ...

Step 7:    Build your timeline 2. ...

Step 8:    Confirm email. ...

 

[Date : 05 - Aug - 2020]

04-Aug-2020

बीएसएनएलईयू, केरळ परिमंडळ, कडून कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी १५६२९३७/-. रुपये देनागीरूपी मदत...खरच अभिमानस्पद..!!

केरळ सर्कल, बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन तर्फे  कोविड -१९ विरुद्ध  लढण्यासाठी  Rs.15,62,937/-रुपये देणगी म्हणून केरळ सरकारला  देण्यात आली  आहे, निशितच हे  जाणून आपल्यासाठी अंत्यंत  अभिमानाची बाब  केरळ संघटनेने केली आहे. ही रक्कम केरळच्या मुख्यमंत्री व्यथित मदत निधीला देण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री कॉ. पिनारायी विजयन यांनी ही बातमी माध्यमांना दिली. या उदात्त कारणासाठी कर्मचार्‍यांकडून मिळालेली देणगी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सीएचक्यू बीएसएनएलईयूच्या केरळ सर्कल संघाचे मनापासून अभिनंदन केली आहे.

[तारीख: 04 - ऑगस्ट - 2020]

04-Aug-2020

दिनांक १३ ऑगस्ट २० रोजी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र परिमंडळच्या सर्कल वर्किंग कमिटीची ओंनलाईन सभा

 नोटीस क्र.BSNLEU/MH/CWC/20.21/1 dated 20.07.2020 नुसार आपल्या संघटनेची सर्कल वर्किंग कमिटी मीटिंग गुरुवार दिनांक  १३/०८/२०२० रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येईल सदर मिटिंग ही ऑनलाईन मीटिंग असेल या मिटिंग मध्ये हे केवळ सर्कल ऑफिस सदस्य यांनाच बोलता येईल इतर कोणालाही हि लिंक पाठवता येणार नाही मीटिंगमध्ये ते खालील विषयांवर चर्चा करण्यात येईल
1) संघटनात्मक चर्चा, ब्रांच सर्कल डिस्ट्रिक्ट कामकाजाबाबत व स्थानिक प्रश्नांवर चर्चा
2) अखिल भारतीय पातळीवरील कामकाजाचा आढावा
3) आर्थिक परिस्थितीबाबत विवरण
4) ए आय बी डी पी ए व कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियन बाबतच्या समस्या
5) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे

विशेष सूचना. फक्त ऑनलाइन मीटिंग आहे टेक्निकल माहिती साठी कॉम जॉन यांच्याशी संपर्क  करण्यात यावा ही विनंती 🙏

कळावे आपला साथी
कॉ.नागेश नलावडे
सर्कल सचिव

 vitthal.auti61@gmail.com>

3:18 PM (33 minutes ago)

Important Link

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.