
03-Aug-2020
अधिकृत केलेल्या रुग्णालयांच्या थकित बिलाचे काही प्रमाणात देय द्या आणि कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचारांची मिळवून देण्याची खात्री करा – बीएसएनएलईयू महासचीवाने सीएमडी बीएसएनएल ला पत्र ....
बीएसएनएल एमआरएस नुसार बीएसएनएलचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त व्यक्तींना अधिकृत् केलेल्या रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळण्यास पात्र आहेत. तथापि, बीएसएनएल व्यवस्थापनाकडून बर्याच दिवसांपासून सदर रूग्णालयांची बिले न भरल्यामुळे ही रुग्णालये कर्मचार्यांना आणि सेवानिवृत्त झालेल्यांना कॅशलेस उपचार नाकारत आहेत. यामुळे कर्मचार्यांना, विशेषत:कोव्हीड-१९ ने संक्रमित झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांना त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावताना हे संकट ओढवत आहे.. म्हणूनच, बीएसएनएलयूने अशी मागणी केली आहे की बीएसएनएल व्यवस्थापनाने तत्काळ रूग्णालयाच्या थकित बिलांचे किमान भाग भरुन व त्यांच्याशी बोलणी करावीत. यापुढे कर्मचारी व सेवानिवृत्त व्यक्तींसाठी कॅशलेस उपचार केले जावेत.
कॉ.अभिमन्यू जी एस.व सिएचक्यू टीमचे महाराष्ट्र सर्कल तर्फे आभार.
View File
31-Jul-2020
खासदारांना निवेदन देण्यासाठी मुदत वाढविली...राहिलेल्या जिल्हा सचिवानी कार्यवाही करून cwc मध्ये रिपोर्ट करणे.
सांसदों को ज्ञापन प्रस्तुत करने की समयावधि 31.07.2020 से एक सप्ताह के लिए बढ़ाई गई - सर्किल एवं डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज से अनुरोध है कि वृद्धि की गई समयावधि में कार्य पूर्ण करें..
लॉक डाउन के चलते, हमारे साथियों को MPs को ज्ञापन प्रस्तुत करने में हो रही दिक्कतों को दृष्टिगत रख कर AUAB द्वारा ज्ञापन प्रस्तुत करने की समयावधि 31.07.2020 से एक सप्ताह के लिए बढ़ाने का निर्णय लिया गया है।
BSNLEU के सभी सर्किल और डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज से निवेदन है कि वें इसका संज्ञान लेवें और अपने क्षेत्र के MPs को ज्ञापन प्रस्तुति का कार्य पूर्ण करने हेतु हर संभव प्रयास करें।
वरील आदेशानुसार सर्व जिल्हा सचिवांना विनंती करण्यात येते कि पुढील आठवड्यात आपल्या खासदारांना निवेदन देवून सदर अहवाल या महिन्यात होणाऱ्या cwc (ऑनलाईन)मध्ये रिपोर्ट करावा लागेल याची नोंद घ्यावी.तसेच वेबसाईट साठी फोटो पाठवावा.
कॉ.नागेशकुमार नलावडे.
[Date : 31 - Jul - 2020[va1] ]
31-Jul-2020
आता सोलापूर नंतर ए आय बी डी पी ए नांदेड मध्ये ...!!
बी एस एन एल चे रेग्युलर व व्ही आर एस पेन्शनर्स ह्यांची जिल्हा नांदेड येथे श्री व्ही डी नीलावाड ह्यांचे अध्यक्ष खाली मीटिंग संपन्न झाली,त्यावेळी ए आय बी डी पी ए संघटनेसाठी ,नांदेड ,परभणी व लातूर ह्या तिन्ही जिल्ह्यासाठी एकमताने खालील कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड झाली।
अध्यक्ष- कॉम श्री व्ही डी नीलावाड (9420071717)
सचिव- कॉम श्री बी एन तोतोड (9422931824)
कोषाध्यक्ष-कॉम श्री एम आर रायालवाड(9404663741)
कॉम श्री नागेश जी नलावडे,बी एस एन एल इ यु महाराष्ट्र परिमंडळ सेक्रेटरी,कॉम श्री लालूजी कोंडवाले,जिल्हा सचिव बी एस एन एल यु, कॉम श्री ए एस चौधरी ए आय बी डी पी ए संघटक सचिव सी एच क्यू,महाराष्ट्र ,कॉम श्री बी जी सूर्यवंशी अध्यक्ष व कॉम श्री आर एन पाटील महाराष्ट्र परिमंडळ सचिव ए आय बी डी पी ए, तर्फे निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्याचे हार्दिक अभिनंदन केले.तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा ।
26-Jul-2020
प्रशासनाबरोबर बैठका घेण्यासाठी जिल्हा सचिवानी LCM यादी तयार करून ताबडतोब पाठवावेत .
असे दिसून आले आहे की अद्यापही काही अनेक जिल्ह्यांनी स्थानिक परिषदांची स्थापना केलेली नाही. हे सत्य आहे की या कोविड -१ कालावधीत स्थानिक परिषद बैठक घेणे कठीण झाले आहे. तथापि, स्थानिक परिषदांनी विलंब न करता मंडळाची स्थापना केली पाहिजे .ते सुनिश्चित करणे आपले कर्तव्य आहे, जेणेकरून परिस्थिती सामान्य झाल्या बरोबर बैठका घेता येतील.
स्थानिक परिषद (LCM) स्थापन करून व्यवस्थापनास सक्षम करण्यासाठी, सीएचक्यूला यादी पाठवावी लागतील. म्हणूनच, सर्व जिल्हा सचिवांना स्थानिक नामनिर्देशन त्वरित सर्कलला ई-मेल / व्हॉट्सअॅपवर पाठविण्याची विनंती केली जाते. सर्कल यादी सीएचक्यूला ताबडतोब पाठवून मंजूर करेल आणि यादी परत पाठवेल. तरी जिल्हा सचिवांनी सदर प्रस्ताव या अगोदर प्ठविला नसेल तर लगेचच स्थानिक परिषदेचे प्रस्ताव सर्कलकडे त्वरित पाठवावेत अशी विनंती केली जाते.
------------------- कॉ.नलावडे नागेशकुमार ,सर्कल सचिव महाराष्ट्र
[तारीख: 25 - जुलै - 2020]
23-Jul-2020
एयूएबी ची बैठक 25.07.2020 रोजी ऑनलाईन होणार...
एयूएबीची बैठक 25-07-2020 रोजी 15:00 वाजता ऑनलाइन आयोजित केली जाईल. सभेचा अजेंडा खालीलप्रमाणे असेलः
१) बीएसएनएलच्या टॉवर्स व फायबरचे परीक्षण करण्याचे सरकारचा प्रस्ताव.
२) बीएसएनएलच्या जमिनींवर नजर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आढावा.
३) १६/०७/२०२० रोजी झालेल्या ब्लॅक फ्लॅग अदोलानाचा आढावा.
४) खासदारांना निवेदन सादर करण्याच्या सुरू असलेल्या कार्यक्रमाचा आढावा.
५) 05 ऑगस्ट 2020 रोजी ट्विटर मोहिमेचे नियोजन.
६) अध्यक्षाच्या परवानगीने इतर विषयावर चर्चा.
[तारीख: 23 - जुलै - 2020]
23-Jul-2020
माहे जून 2020 महिन्याच्या पगाराबाबत - संचालक (वित्त) यांच्याशी चर्चा... पगार पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता .
माहे.जून, २०२० या महिन्याच्या पगाराच्या देयकासंदर्भात अनेक कॉम्रेड्सकडून सीएचक्यूला बर्याच शंकास्पद प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी १६ जुलै, २०२० रोजी देशभरात काळे-ध्वज सह निदर्शने करण्यात आली होती, त्या मध्ये पगाराची देय लवकर देण्यात यावी हि मागणीही होती. कर्मचार्यांकडून या महत्त्वपूर्ण विषयावर संयुक्त आंदोलन करुनीही बीएसएनएल व्यवस्थापन वेळेत वेतन देत नाही.
या विषयावर कॉ.पी.अभीमान्यू, जी.एस. यांनी श्री एस.के.गुप्ता यांचाय्शी बोलले. संचालक (वित्त) गुप्ता यांनी आज या विषयावर चर्चा केली. संचालक (वित्त) यांनी त्याला उत्तर दिले की, कंपनी दरमहा सुमारे १३०० कोटी रुपये जमा करीत असली तरी कंपनीचा मासिक खर्च जास्त आहे, त्या मुळे वेतन वेळेवर दिले जात नाही. कॉ.सरचिटणीस यांनी तीव्र व्यथा व्यक्त केली की, विपणन क्रियाकलापांमध्ये वाढ करत असून त्याविषयी असोशिअन आणि संघटनांना विश्वासात घेण्याची व्यवस्थापन काळजी घेत नाही.
चर्चेच्या शेवटी, संचालक (वित्त) म्हणाले की पुढील आठवड्यात पगार देण्याचा प्रयत्न केला जाईल..
[तारीख: 23 - जुलै - 2020]
23-Jul-2020
लॉक डाउन की वजह से अपने गांव या अन्य स्थानों पर फंसे कर्मचारी- BSNLEU ने इस अनुपस्थिति अवधि को ड्यूटी मानने की मांग की....
BSNLEU द्वारा लॉक डाउन घोषित होने की वजह से अपने गांव या अन्य दूरस्थ स्थानों पर फंसने और अपने कार्यस्थल पर लौटने में असमर्थ कर्मचारियों के मामले में पूर्व में डायरेक्टर (HR) को लिखा जा चुका है। BSNLEU ने मांग की है कि उनकी अनुपस्थिति की अवधि को ड्यूटी माना जाए, क्योंकि लॉक डाउन के दौरान किसी भी प्रकार के आवागमन के साधन की अनुपलब्धता की वजह से वें अपने कार्य स्थल पर लौट आने में असमर्थ थे।
आज, कॉम पी अभिमन्यु, महासचिव ने श्री अरविंद वडनेरकर, डायरेक्टर (HR) से चर्चा की और इस प्रकरण के शीघ्र निराकरण हेतु आग्रह किया।डायरेक्टर (HR) ने कार्यवाही का आश्वासन दिया। तत्पश्चात, कॉम पी अभिमन्यु, जीएस ने श्री सौरभ त्यागी, Sr.GM(Estt.), BSNL CO., से बात की और उनसे BSNLEU द्वारा प्रस्तुत डिमांड्स को शीघ्र प्रोसेस करने का अनुरोध किया। उन्होंने भी यथोचित कार्यवाही बाबद आश्वासित किया।
[Date : 22 - Jul - 2020]
23-Jul-2020
बी एस एन एल मधील रेग्युलर व व्ही आर एस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सोलापूर येथे मीटिंग संपन्न
बी एस एन एल मधील रेग्युलर व व्ही आर एस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सोलापूर येथे मीटिंग संपन्न झाली।त्यावेळी ए आय बी डी पी ए संघटनेसाठी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी पद्धधिकाऱ्यांची एकमताने निवड झाली।(1) अध्यक्ष- कॉम श्री वाय डी संगीतराव(9422464200) (2) सचिव -कॉम श्री एस व्ही दुसल (9423858575) (3) कोषाध्यक्ष - कॉम श्री ए के कोळी(9423067595). ए आय बी डी पी ए, सि एच क्यू, संघटक सचिव महाराष्ट्र .,कॉम श्री ए एस चौधरी तसेच महाराष्ट्र परिमंडळ सचिव, कॉम श्री आर एन पाटील, ह्यांच्या तर्फे,निवड झालेले पद्धधिकाऱ्यांचे व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन !!... संघटनेची जास्तीत जास्त मेम्बरशीप होण्यासाठी सर्वाना शुभेच्छा !!
(सौजन्याने)
23-Jul-2020
एनएफटीईनेचे परिमंडल सचिव सी. के. माथीवानन यांना योग्य समज द्यावी व शिस्त लावावी ----एनएफटीई नेतृत्वाला अपील*
बीएसएनएलईयूच्या ऑल इंडिया सेंटरने चेन्नई सर्कल पदाधिकारी पैकी एकावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. ही पूर्णपणे बीएसएनएलईयूची अंतर्गत बाब आहे.
इतरांना त्यात नाक मुरडण्याचा कोणताही अधिकार नाही. तथापि, एनएफटीई, चेन्नई सर्कलचे उन्माद सर्कल सेक्रेटरी असलेल्या मथीवनान यांनी त्यांच्या वेबसाईटवर याविषयी निंदनीय टीका केली आहे.
सर्वांना ठाऊक आहे की सी. के. माथीवानन व्यक्ति हा कोणताही शिस्त किंवा शिष्टता नसलेला माणूस आहे. जेव्हा कॉ.व्ही.ए.एन. नंबूदीरी बीएसएनएलईयूचे महासचिव असताना हा उन्मादी सी. के. मथीवनन त्याचा अपमान करीत आणि त्याच्यावर हल्ला चढवित असे. महासचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कॉ. पी. अभिमन्यू हे त्यांच्या हल्ल्यांचे लक्ष्य बनले आहेत. ह्या गोष्टीत सर्वात वाईट भाग म्हणजे सी. के. माथीवनन आपल्याच नेत्यांनाही शिवीगाळ करीत हल्ले चढवित आहेत.
काही वर्षांपूर्वी एनएफटीईचे सरचिटणीस कॉ. चंदेश्वर सिंग चेन्नई येथे झालेल्या सर्व युनियन सेमिनारला संबोधित करण्यासाठी आले होते. तेथे सार्वजनिक ठिकाणी त्याना घेराव घालण्यात आला, त्यात सुद्धा सी.के. मथिवानन आणि त्याचे गुंडे सामिल होते. आम्हाला माहिती आहे की अशी दुर्दैवी घटना इतर कोणत्याही सघटनेच्या महासचिव यांच्या सोबत झाली नव्हती .
याखेरीज एनएफटीईचा आणखी एक महत्त्वाचा अखिल भारतीय पदाधिकारीही सुद्धा सी. के. मथिवानन यांच्या हल्ल्याचा बळी ठरला आहे. सी.के.मंथिवानन यांनी आपल्या सर्कल युनियन वेबसाइटवर लिहिले की, या नेत्याने आपले शर्ट जितक्या वेळा बदलले तितक्या वेळा त्यांचे युनियन बदलली आहे.
जेव्हा जेएसी (जॉइंट एक्शन कमिटी) नेत्यांनी बीएसएनएल व्यवस्थापनाशी 78.2% IDA आयडीए विलीनीकरणाचा करार केला तेव्हा. सी. मथिवानन यांनी आपल्या संकेतस्थळावर लिहिले होते की, अखिल भारतीय नेत्यांनी कामगारांचे हित विरोधी काम केले आहे आणि त्यांचे हित साधले गेले नाही आहे. ह्या असंस्कृत माणसाने कराराचा निषेध करत निषेध सभा आयोजित करण्याची पातली पर्यन्त गेला. तथापि, जेव्हा 78 78.२% IDA आयडीए विलीनीकरणाचा आदेश जारी झाला तेव्हा ह्याच दुट्टपी माणूस सी. के. माथीवनन यांनी हळूच सर्व फायदे प्राप्त करून घेतले स्वतासाठी आणि त्याचा पासून आर्थिक फायदा सुद्धा घेतला.
AUAB बीएसएनएलच्या संपूर्ण अधिकारी आणि कर्मचार्यांना एकत्र करत आहे आणि बीएसएनएल आणि त्या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी सरकारविरूद्ध सतत लढा देत आहे. तथापि, सी.के. मथिवाननने AUAB वर हल्ला करणे आणि त्यांची चेष्टा करणे ही वाईट सवय स्वतःला लावून घेतली आहे. एनएफटीईच्या अखिल भारतीय नेतृत्व सोबत AUAB च्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आताही एनएफटीई चेन्नई सर्कल हा AUAB मधील घटक भाग नाही आहे.
काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा सी.के. मथिवनन, कॉम.चंदेश्वर सिंग, महासचिव, एनएफटीई यांचा अपमान केला. सीके माथीवानन यांनी त्यांच्या संकेतस्थळावर जे लिहिले ते पुढीलप्रमाणे आहे: - "स्वत: ला कम्युनिस्ट म्हणवणारे महासचिव पटना विमानतळावर दूरसंचार मंत्र्यांची वाट पहात राहिले. परंतु, त्यांचे आगमन झाल्यावर मंत्रीजी ने ह्या नेत्याकडे दुर्लक्ष केले व डुंखुन सुद्धा पहिले नाही आणि त्यांनी तसेच पुढे निघुन गेले ." कॉम चंदेश्वर सिंह यांचा चेहरा पाहण्याची तसदीही मंत्रीने घेतली नाही. तरीसुद्ध, महासचिव NFTE, हात बाँधूँन मंत्री साहेबच्या मागे मागे फिरत राहिले. एवढी दयनीय परिस्थिती आहे का? "
हे देखील खरं आहे की, सी. के. माथीवानन सारख्या मस्तवाल माणसाने कॉ.ओ.पी.गुप्ता आणि कॉम. जगन यांच्या सारख्या थोर नेत्यांनादेखील सोडल नाही. सी. के. माथीवनान सारखा बेशिस्त माणूस वरिष्ठ नेते कॉम.ओ.पी.गुप्ता यांना * “म्हातारडा” म्हणून संबोधत करत असत. आणि वारंवार कॉम.ओ.पी.गुप्ता आणि कॉम.जगन यांना तो अश्लील व शिवराल भाषेत शिवीगाळ करीत असे.
एनएफटीईमध्ये जे काही घडते ते ही त्यांची अंतर्गत बाब आहे. परंतु, जर एनएफटीई नेतृत्व सी.के.मथिवानन यांना BSNLEU आणि AUAB यांना शिवीगाळ व गलिच्छ शब्द वापर करण्यास परवानगी देत असेल तर ते योग्य ठरणार नाही.
*म्हणून, BSNLEU एनएफटीई नेतृत्त्वाला एक खुले अपील करू इच्छिते की त्यांनी हया सी.के. माथिवानन नामक मस्तवाल बैलाला वेसन घालावी व BSNLEU व AUAB च्या वरिष्ठ नेत्याशी कसे वागावे यांची शिस्त ह्या बेशिस्त व असंस्कृत माणसाला लावावी.*
*-पी.अभीमन्यू, महासचिव.*
20-Jul-2020
आज कॉ. नागेशकुमार नलावडे, बीएसएनएलईयू सीएचक्यू नवी दिल्ली चे उपाध्यक्ष व सर्कल सचिव यांचा 63 वा वाढदिवस मजुरांना धान्य देवून साजरा

कॉ. नागेशकुमार नलावडे, बीएसएनएलईयू सीएचक्यू नवी दिल्ली चे उपाध्यक्ष व सर्कल सचिव यांचा 63 वा वाढदिवस युनियन ऑफिस बाजीराव रोड पुणे येथे अतिशय साध्या पध्दतीने सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून व मास्क घालून कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातर्फे रोजंदारी मजूरांना धान्याचे किट कॉ नलावडे यांच्या हस्ते दिले गेले तसेच जिल्हा सचीव कॉ जकाती व अन्य कार्यकर्ते यांच्या तर्फे लेबर शोभा वाघमारे यांच्या 12 वीत शिकणार्या मुलास शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी मदत देण्यात आली. या प्रसंगी एआयबीडीपीए पुणे जिल्हा च्या सचिव पदाचि जबाबदारी कॉ नफीस काझी यांच्या वर स्वतः नलावडे यांनी घातली व त्यांना जोमाने काम करण्याचा सल्ला दिला .या प्रसंगी कॉ.गुळून्जकर कॉ.गणेश भोज व इतर नेते उपस्थित होते०