10-Nov-2019

CWC साठी स्पेशल रजेबाबत पत्र

सोबत CWC साठी स्पेशल रजेबाबतचे पत्र पहा 

06-Nov-2019

VRS SCHEME सविस्तर पत्र पहा

View File

06-Nov-2019

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाअधिवेशन दि. ५ नोव्हेंबर २०१९ रोजी संपन्न

कॉ.नवनाथ थोरात,अध्यक्ष,कॉ.विजय शिपणकर,जिल्हा सचिव व कॉ.बाळासाहेब गाडळकर,खजिनदार यांची बिनविरोध निवड.

      अहमदनगर  जिल्हा अधिवेशन दिनांक ०५नोव्हेंबर २०१९ रोजी  अहमदनगर येथे कॉ जॉन वर्गीस सहाय्यक महासचिव.नवी दिल्ली ,कॉ.आप्पासाहेब गागरे ,परिमंडळ अध्यक्ष ,कॉ.विठ्ठल औटी, परिमंडळ सहसचिव यांच्या उपस्थ्तीत पार पडले.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे महाप्रबंधक मा.श्री.अजातशत्रू सोमाणी व उप महाप्रबंधक श्री खानसहेब तसेच एसएनईए असोशियनचे जिल्हासचिव कॉ.राम चौरे,सर्कल प्रतिनिधी कॉ.विजय पिंपरकर, एससी/एसटी संघटनेचे जिल्हासचिव कॉ.प्रदीप जाधव हे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

   कॉ.जॉन वर्गीस,सह महासचिव ,मा.श्री सोमाणी ,पिजीएम सह सर्व वक्त्यांनी विशेषकरून येवू घातलेले व्हीआरएस या बाबत अधिवेशनात मार्गदर्शन केले.

     दुसरया सत्रात जिल्ह्यातील सर्व शाखेच्या संघटन व समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली त्या प्रमाणे शाखा सचिवानी अहवाल व समस्या मांडल्या.कॉ.लाला शेख जिल्हासचिव यांनी सविस्तर उतरे दिली.

     शेवटच्या सत्रात २०१९ ते २०२१ सालाकरिता नोटीस प्रमाणे निवडणूक जाहीर करण्यात आली.निवडणूक अधिकारी व कमिटी म्हणून संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी कॉ.जॉन वर्गीस कॉ.विठ्ठलराव औटी व कॉ.आप्पासाहेब गागरे यांनी काम पहिले.एकच पेनल आल्याने नवीन जिल्हा कार्यकारणीची निवड बिनविरोध जाहीर केली व महाराष्ट्र परिमंडलातर्फे निवडून आलेल्या सर्व कार्यकरणीचे अभिनंदन करण्यात आले.शेवटी कॉ.विठ्ठल औटी यांनी अधिवेशन अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले व सहकार्य केले या बद्दल सर्वांचे आभार मानले.

03-Nov-2019

*स्वेच्छा निवृत्ती*

भारत सरकारने BSNL साठी पुनरुज्जीवन योजना आणली आहे त्यातील एक महत्त्वाचा भाग कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती साधारणपणे पणे 80000 कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा सरकारचा मानस आहे त्या मुळे समाजमाध्यमात त्यावर जोरदार चर्चा चालू आहे.कर्मचारी वेगवेगळे मेसेज बातम्या व हिशोब एकमेकांना पाठवत आहेत यात काही खरे काही कपोलकल्पित काही *धमकी युक्त जसे की काम वाढेल ते येणार का? बदली गैरसोयीचे ठिकाणी लांब सेवानिवृत्त वय 58 तर उर्वरीत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार होणार नाही* काही अतिशयोक्ती रक्कम दाखवून भुरळ पडणारे त्या मुळे गोंधळून जाऊ नये
*ही एक स्वेच्छा निवृत्ती योजना आहे यात सहभागी होण्यासाठी कोणतीही सक्ती नाही*
प्रत्येक कर्मचारी बंधू भगिनी यांनी आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन जी काही योजना जाहीर होईल त्यावर साधक बाधक सर्व बाजूने विचार करून निर्णय घ्यावयाचा आहे
कोणी मित्र मैत्रिणी ने घेतली म्हणून घेण्यात शहाणपण नाही
प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात कोणाचे घर नसते कोणाची मुले शिकतात कोणाच्या मुला मुलींची लग्न राहिली असतील तर कोणाची शिकून पण व्यवस्थित नोकरी व्यवसायात स्थिर झाली नसतील त्यामुळे कुटुंबातील सदस्य बरोबर चर्चा व पुढील प्लॅन करून त्यास अनुसरून योग्य निर्णय घेणे
*ता क योजना जाहीर झाल्यावर सर्व आर्थिक व इतर गोष्टींचा खुलासा होईलच तो पर्यंत वाट पाहू*

23-Oct-2019

बीएसएनएल व्यवस्थापनाकडून एलआयसीला प्रीमियम रक्कम पाठविण्यास विलंब-- - बीएसएनएलईयूने एलआयसी व्यवस्थापनाकडे हा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी....

कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केलेली एलआयसी प्रीमियम रक्कम बीएसएनएल मॅनेजमेंटने एलआयसीकडे मे, 2019 पासून पाठविली नाही. परिणामी, कर्मचारी आत्ता  थकबाकीदार बनले आहेत, यामुळे मृतांच्या कुटुंबियांना गंभीर गुंतागुंत निर्माण होईल. हे खरं आहे की बीएसएनएल कर्मचारी वर्ग  हा एलआयसीचा एक मूल्यवान ग्राहक आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्या  पोलिसि व्यवहारात आहेत. बीएसएनएलईयूने सीएमडी बीएसएनएलला पत्र लिहून,   प्रीमियमच्या विलंब पेमेंटचा मुद्दा उपस्थित करण्याचे सुचविले आहे, जेणेकरून बीएसएनएल व्यवस्थापनाने केलेल्या विलंब पत्रामुळे कर्मचार्यांना  त्रास होणार नाही. बीएसएनएलईयूने यापूर्वीच अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटनेच्या (एआयआयईए) सरचिटणीसांची मदत मागितली आहे. सीएमडी बीएसएनएलने एलआयसीच्या अध्यक्षांना औपचारिक पत्र लिहिले आहे. बीएसएनएलईयू यापुढेहि  या विषयाचा पाठपुरावा करेल.

सोबत पत्र पहा [तारीख: 22 - ऑक्टोबर - 2019]

View File

15-Oct-2019

AUAB ने 18.10.2019 को भूख हड़ताल का आव्हान किया ! - कार्यक्रम जबरदस्त रूपसे सफल करें...!!

 AUAB की मीटिंग सम्पन्न हुई। कॉम चंदेश्वर सिंह, चेयरमैन, ने अध्यक्षता की। कॉम पी अभिमन्यु, संयोजक ने सभी का स्वागत किया और एजेंडा प्रस्तुत किया। मीटिंग में सितंबर माह के वेतन का भुगतान न किए जाने पर अत्यंत गंभीरता के साथ रोष प्रकट किया गया। कॉन्ट्रैक्ट वर्कर्स का विगत 8 माह से वेजेस का भुगतान न होना, विद्युत बिल्स का भुगतान नही होना, अखबारों में BSNL के बंद होने की भ्रामक मीडिया रिपोर्ट्स का प्रकाशन आदि मुद्दों की गंभीरता के साथ समीक्षा की गई। गहन चिंतन पश्चात निर्णय लिया गया कि शुक्रवार दिनांक 18-10-2019  को जनरल सेक्रेटरीज, सर्किल सेक्रेटरीज व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज द्वारा क्रमशः कॉर्पोरेट ऑफिस, सर्किल ऑफिस व जिला स्तर पर भूख हड़ताल की जाएगी। साथ ही, इसी दिन सभी जगह भोजन अवकाश के दौरान सभी एग्जीक्यूटिव्ज व नॉन एग्जीक्यूटिव्ज को शामिल करते हुए प्रदर्शन आयोजित किए जाएंगे। यह भी निर्णय लिया गया कि जो यूनियन्स व एसोसिएशन्स आज की मीटिंग में उपस्थित नही हो पाए हैं, उनसे भी त्वरित संपर्क किया जाएगा और उक्त कार्यक्रम में शामिल होने का अनुरोध किया जाएगा। AUAB की 21-10-2019 को पुनः मीटिंग होगी जिसमें आगामी कार्यक्रम की रूपरेखा तय की जाएगी। मांगें निम्नानुसार है।

मांग (Demands)

* सितंबर माह के वेतन का तुरंत भुगतान। प्रत्येक माह वेतन का समय पर भुगतान।
* कॉन्ट्रैक्ट/कैज्युअल वर्कर्स के वेजेस का भुगतान, इलेक्ट्रिसिटी बिल्स और किराए का भुगतान।
* BSNL को 4G स्पेक्ट्रम का आवंटन, वित्तीय सहायता/सॉफ्ट लोन और BSNL द्वारा प्रस्तुत लैंड मोनेटायजेशन प्रस्ताव का अनुमोदन कर BSNL का रिवाइवल।
* तृतीय पे रिवीजन, पेंशन रिवीजन व 30% सुपर एन्युएशन लाभ का निराकरण।
* GPF, बैंक लोन की किश्तें, सोसाइटी की किश्तें, LIC प्रीमियम आदि का त्वरित प्रेषण।

 

15-Oct-2019

AUAB अधिक सशक्त झाले ...बीएसएनएल कर्मचार्यां मध्ये मोठे ऐक्य – अनेक संघटना एयूएबीचा भाग बनले ....

दिवसेंदिवस बीएसएनएलमध्ये  अनेक संकट  तीव्र होत चालले आहेत.. म्हणूनच, बीएसएनएल कर्मचार्‍यांची ऐक्य बळकट करण्याची नितांत गरज होतो , जेणेकरून बीएसएनएलच्या संयुक्त कामगार संघटनेच्या चळवळीमुळे कंपनीचे आर्थिक पुनरुज्जीवन लवकरात लवकर करता येईल .त्या साठी  बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या सर्व प्रमुख संघटनां गेल्या काही आठवड्यांपासून  या दिशेने प्रामाणिक पावले उचलली होती . परिणामी, मोठे ऐक्य गाठले गेले आहे. बर्‍याच संघटना  आता एयूएबीचा भाग बनल्या आहेत.  दिनांक  ११/१०/२०१९ रोजी झालेल्या एयूएबीच्या बैठकीत  हजर राहून सामील झालेल्या असोशियन्स  व संघटनांची नावे पुढीलप्रमाणे    :- बीएसएनएलईयू, एनएफटीई बीएसएनएल, एसएनईए, एआयबीएसएनएलए, एफएनटीओ, सेवा बीएसएनएल, बीएसएनएल एमएस, एआयबीएसएनएलओए, स्नाट्टा, टेपू, बीएसएनएल ओए, टोए बीएसएनएल आणि बीईए.( BSNLEU, NFTE BSNL, SNEA, AIBSNLEA, FNTO, SEWA BSNL, BSNL MS, AIBSNLOA, SNATTA, TEPU, BSNL OA, TOA BSNL and BEA.)

     तसेच या  बैठकीत भाग घेऊ न शकलेल्या सर्व संघटनांकडे जाण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या १८ तारखेच्या आंदोलनात वरील सर्व संघटना व असोशियन्स भाग घेणार आहेत.

       सर्व जिल्हा सचिव व परिमंडळ पदाधिकार्यांना विनंती कि सर्वाना बरोबर घेवून आंदोलन यशस्वी करावे.

                       आपला विश्वासू.///कॉ.नागेशकुमार नलावडे///

14-Oct-2019

CEC बैठक पार पडली बैठकीत बोलताना कॉ.जॉन वर्गीस.

बीएसएनएल कंपनी ची सध्याची परस्थिती व संघटनेची पुढील वाटचाल या बाबत विशेस करून चर्चा करण्यात आली.

07-Oct-2019

• LIC/PLI चे हप्ते ताबडतोब जमा करण्याबाबत मा.सिजीएम,बीएसएनएल,मुंबई यांना पत्र....

गेल्या में २०१९ पासून कर्मचार्यांच्या पगारातून BSNL कडून एल.आय.सी./पी एल आय.चे नियमित हप्ते वसूल केले आहेत,परंतु संबंधित विभागाकडे पाठविण्यात आलेले नाहीत.त्याबाबत बीएसएनएल मधील कर्मचार्यांना लेखी/मेसेज स्वरुपात विचारणा करण्यात येत आहे.शिवाय सहा महिन्याचा कालावधी होत आला आहे.त्यामुळे कॉ.नागेशकुमार नलावडे यांनी  त्यासंदर्भात मा.सिजीएम,बीएसएनएल,महाराष्ट्र यांना पत्र दिले आहे.

          सोबत पत्र पहा,

View File

03-Oct-2019

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्री यांना विन्रम अभिवादन ...!!!

भारत मातेचे महान सुपुत्र पितामह  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त बीएसएनएलइयु महाराष्ट्र परिमंडळ तर्फे विनम्र अभिवादन ..

Important Link

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.