पूणे येथे महाराष्ट्र परिमंडळ सर्कल वर्किंग कमिटी बैठक आणि कनव्हेन्सेन पूणे येथे आयोजित केले.

01-12-25
1 Min Read
By BSNLEU MH
7
पूणे येथे महाराष्ट्र परिमंडळ सर्कल वर्किंग कमिटी बैठक आणि कनव्हेन्सेन पूणे येथे आयोजित केले.  Image

पूणे येथे महाराष्ट्र परिमंडळ सर्कल वर्किंग कमिटी बैठक आणि कनव्हेन्सेन पूणे येथे आयोजित केले. 


बी एस एन एल एम्प्लॉइज युनियन महाराष्ट्र परिमंडळ वर्कीग कमिटी बैठक व कनव्हेन्सेन दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पी जी एम टी ऑफिस सातारा रोड पूणे येथे पूणे जिल्ह्याने यशस्वी रित्या आयोजन केले ज्या मध्ये अध्यक्ष कॉ. नागेशकुमार नलावडे,कॉ. अनिमेश मित्रा जनरल सेक्रेटरी सी एच क्यू, कॉ. गणेश हिंगे डेप्युटी जी एस सी एच क्यू कॉ. संदिप गुळुजंकर संघटक सचिव सी एच क्यू, कॉ.युसुफ जकाती AIBDPA सर्कल सचिव,कॉ युसुफ हुसेन जनरल सेक्रेटरी MH CCWF, परिमंडळ कार्यकारीणी सदस्य, तसेच  पूणे ,सर्कल ऑफिस मुंबई  टेलीकॉम फॅक्टरी मुंबई, कल्याण, छत्रपती संभाजी नगर, नाशिक,धुळे,जळगाव,सांगली सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग धाराशिव, नांदेड, परभणी,चंद्रपूर येथून जिल्हा सचिव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पूणे येथील कर्मचारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिला भगिनी यानी लाल रंगाच्या साड्या नेसून युनियन च्या लाल झेंड्याच्या रंगात रंग मिळवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते पुढील वक्ते यांनी सभेस संबोधित केले,कॉ, युसुफ जकाती,कॉ युसुफ हुसेन,कॉ विकास कदम जिल्हा सचिव पूणे,कॉ निलेश काळे ACS ,कॉ गुळुजकर org secretary Chq यांनी ईपीएफ ते जीपीएफ जे कर्मचारी आहेत त्यांचे बाबत युनियन ने केस कोर्टात दाखल करावी त्याबाबत येणारा खर्च ते  कर्मचारी देण्यास तयार आहेत, कॉ सर्कल सेक्रेटरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले पूणे जिल्ह्याने सुंदर नियोजन केले त्याबद्ल सर्व टिमचे विशेष आभार व्यक्त केले,त्या नंतर कॉ गणेश हिंगे यांनी आपल्या भाषणात मला सी एच क्यू मध्ये काम करण्याची व ,वेज रिव्हिजन कमीटी मध्ये समावेश होऊन अॅग्रीमेंट वर सही करण्याची संधी मिळाली, याबाबत आनंद व्यक्त केला टीटी परिक्षा बाबत माहिती दिली,    कॉ अनिमेश मित्रा जनरल सेक्रेटरी  यांनी,केद्र सरकारने नविन कायदे लागू केले याबाबत, कामगार व युनियन वर होणारे परिणाम बाबत सविस्तर माहिती दिली वेज रिव्हिजन अॅग्रीमेंट व सी एच क्यू ची भुमिका बाबत तपशील वार माहिती दिली, युनियन व्हेरिफिकेशन बाबत माहिती दिली, ईतर सर्व विषयांची सुध्दा सखोल माहिती दिली, यानंतर आपले सिनियर लिडर अध्यक्ष कॉ नलावडे साहेब यांनी आपल्या भाषणातून कॉ अनिमेषजी हे अतिशय सुंदर काम सी एच क्यू मध्ये करीत आहेत, युनियन चे काम युनियन च्या घटनेनुसार चालले पाहिजे,घटनेची पायमल्ली करता कामा नये, येणाऱ्या युनियन व्हेरिफिकेशन मध्ये महाराष्ट्र परिमंडळ मधून जवळपास ११०० च्या वर मते घेऊन निवडून आणू व संपूर्ण देशात महाराष्ट्र ईयू नंबर १ वर असेल,अशी ग्वाही दिली, आम्ही सर्व जण एकदिलाने काम करीत अहोत तसेच सी एच क्यू च्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही जनरल सेक्रेटरी यांना दिली,
यानतर कॉ मंदा माल्लमपंल्ली मॅडम यांनी टी टी ची परीक्षा पूणे येथील किंवा इतर ठिकाणी असलेल्या ट्रेनिंग सेंटर मध्ये घेण्यात यावी यामुळे गैरसोय होणार नाही तसेच निगेटिव्ह मार्क्स पद्धत बंद करावी,अशी मागणी केली,
या बैठकीत चे अतिशय उत्कृष्ट सुत्रसंचलन कॉ गणेश भोज यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ विकास कदम कॉ संदिप गुळुजंकर,कॉ गणेश भोज कॉ किशोर गवळी,कॉ, नितिन कदम कॉ जकाती कॉ आणि त्यांची संपूर्ण टिमने अतिशय मेहनत घेऊन ही बैठक यशस्वी केली , तसेच मिटींगची व्यवस्था,जेवणाची व्यवस्था उत्तम केली त्या सर्व पूणे जिल्हा टिमचे महाराष्ट्र परिमंडळ च्या वतिने हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. कॉ प्रकाश जैन सिनियर कॉमरेड नेहमी प्रमाणे लातूर येथून आवर्जून या बैठकीत उपस्थित राहिले त्यांचे अभिनंदन.
बी एस एन एल एम्प्लॉइज युनियन झिंदाबाद 
कॉ कौतिक बस्ते सर्कल सेक्रेटरी