*BSNLEU व AIBDPA चा संयुक्त विभागीय मेळावा लातूर येथे संपन्न.

24-12-23
1 Min Read
By BSNLEU MH
143
*BSNLEU व AIBDPA चा संयुक्त विभागीय मेळावा लातूर येथे संपन्न.  Image

*BSNLEU व AIBDPA चा संयुक्त विभागीय मेळावा लातूर येथे संपन्न.

*  कॉम्रेड,  लातूर जिल्ह्याचा पुढाकाराने आज BSNLEU व AIBDPA चा विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. नांदेड,परभणी व धाराशिव (उस्मानाबाद)  जिल्ह्याने यात आपला सहभाग नोंदविला.   हया कार्यक्रमाला श्री अनिल बनसोडे, BSNL लातूर जिल्हा प्रमुख यांनी BSNL च्या भवितव्य बद्दल सखोल मार्गदर्शन केले व सर्वानी सकारात्मक राहून आपली जबाबदारी उचलावी असे आवर्जून सांगितले. कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव BSNLEU, कॉम मोहम्मद जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA व कॉम सुनील चौधरी, सहायक परिमंडळ सचिव यांनी उदघाटनपरी आपले भाषण केले व कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा तसेच BSNL च्या समस्या वर आपले मत मांडले. तसेच इतर संघटनेचे प्रतिनिधी: कॉम वी ए पाटील, SNEA, कॉम तोंडारे, कॉम वाश्मक, NFTE आणि कॉम लांडगे, SEWA यांनी सुध्दा आवर्जून हजेरी लावली. कॉम सुनीता सन्मुखराव, जिल्हा सचिव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली व कॉम प्रकाश खंडागळे, जिल्हा अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  भोजना नंतर कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू झाले. हया सत्रात अनेक मान्यवरांनी आपली मते व समस्या मांडल्या. ह्यावर परिमंडळ सचिव, BSNLEU व परिमंडळ सचिव AIBDPA यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली.  हया कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी खालील प्रमाणे उपस्थित होते.  नांदेड- कॉम लालू कोंडालवडे, कॉम शाम जाधव, कॉम वानखेडे, कॉम रवी कंधारकर, कॉम प्रकाश जैन, कॉम मारुती रायलवाड व इतर सहकारी.  परभणी: कॉम सुमेरसिंग सूर्यवंशी, कॉम चाटे, कॉम बेग व इतर सहकारी. तसेच धाराशिव च्या वतीने कॉम अशोक सरवदे व सहकारी उपस्थित होते.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम प्रकाश खंडागळे,कॉम प्रकाश जैन, कॉम गगणे, कॉम राठोड, कॉम प्रमोद बोकेफोडे, कॉम मुदामे, कॉम नागनाथ इरळे, कॉम सुनीता सन्मुखराव,कॉम सरोजा सातपुते व इतर सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले.

महाराष्ट्र परिमंडळ कडून सर्वाना लाल सलाम