संप यशस्वी करा कॉम्रेड

15-02-24
1 Min Read
By BSNLEU MH
133
संप यशस्वी करा कॉम्रेड  Image

संप यशस्वी करा कॉम्रेड

*नमस्कार,*  *आपल्या न्यायोचित मागणीसाठी आपण एक दिवसाचा संप करत आहोत. निश्चितपणे हा संप प्रतिकुल परिस्थिती होत आहे. आपण सर्वांनी गेल्या 20 दिवसापासून  संपाची तयारी केली आहे. उदया संप कशा पद्धतीने करावा त्याबाबतीत काही मार्गदर्शक सूचना BSNLEU CHQ आल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत.

1. BSNLEU चे सर्वसाधारण सद्स्य उदया ऑफिसला  नाही आले तरी चालेल.

2. जे युनियन चे पदाधिकारी आहेत त्यांनी ऑफिसला यावे. दुपार पर्यंत हजर राहून भोजन अवकाशात सर्व कर्मचारी व अधिकारी यांची गेट मीटिंग घ्यावी. हया मिटींगला NFTE, SNEA, AIGETOA, SEWA, AIBSNLEA व इतर संघटनेचा जिल्हा सचिव यांना हया मीटिंग मध्ये बोलावून त्यांना BSNLEU करत असलेल्या प्रयत्नात बद्दल सांगावे. तसेच त्यांना सुद्धा नैतिक पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावे.

3. दुपारी 11.30 वाजता संपाचा रिपोर्ट परिमंडळ सचिव यांना देणे. म्हणजे एकूण सद्स्य किती आणि किती सद्स्य संपात सहभागी आहेत.

4. कॉम संदीप गुळुंजकर, सहायक परिमंडळ सचिव यांचा विशेष प्रयत्नाने  एक प्रेस नोट तयार करण्यात आली आहे ती सोबत पाठवली जात आहे. ही प्रेस नोट आघाडीच्या वर्तमानपत्र शी संबंधित अशा पत्रकार यांना देऊन तशा बातम्या वर्तमानपत्र मधून छापून आणाव्या.

5. संप करत असताना कुठेही भांडण तंटा करू नये. सद्स्य किंवा कर्मचारी यांना आपले मुद्दे पटवून देऊन संपात सहभागी करून घ्यावे.* 

*हा संप BSNL व कर्मचारी यांचा हिताचा कसा आहे हे जरी आपण सर्वाना पटवून देऊ शकलो हा सुद्धा आपला नैतिक विजय असेल. जास्तीत जास्त काय होईल तर आपला एक दिवसाचा पगार कापला जाईल. पण मनाला समाधान राहील की एक युनियन प्रतिनिधी म्हणून मी माझी जबाबदारी चोख बजावली आहे.*