*प्रेस नोट*
आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वामध्ये भारतभरामध्ये पुढील मागण्यांसाठी एक दिवसाचा संप करण्यात आला.
1. एअरटेल व GIO ने भारतभरामध्ये 5g सेवा सुरू केलेले असून. बीएसएनएल ही भारत सरकारची कंपनी असून देखील बीएसएनएल ला आजपर्यंत 4g 5g मिळालेले नाही. त्यामुळे बीएसएनएलचे लाखो ग्राहक कमी होत आहेत. सरकारच्या माध्यमातून दरवेळी वेगवेगळ्या कारणाने 4g 5g देण्यास अडथळा निर्माण होत आहे. ग्राहक कमी झाल्यामुळे बीएसएनएल तोट्यात गेले आहे. बीएसएनएल ला लवकरात लवकर 4g 5g मिळवे ही महत्त्वाची मागणी या संपात आहे. 2. बीएसएनएल मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2017 पासुन वेतन करार लागु करावा. जानेवारी 2007 मध्ये झालेल्या वेतन करार नंतर आज पर्यंत वेतन करार मिळालेला नाही आणि तो लवकरात लवकर मिळावा. BSNL ही सरकारी कंपनी आहे व सामाजिक जबाबदारी जपते. म्हणून सलग 3 वर्ष नफा कमविण्याची अट सरकारने मागे घ्यावी.
3. बीएसएनएल मध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकरता वेगवेगळी प्रमोशन पॉलिसी चालू आहे. त्यामुळे नॉन एक्सएकटिव्ह कर्मचाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. एक्सएकटिव्ह कर्मचारी यांचा EPP पोलिसी प्रमाणे नॉन एक्सएकटिव्ह यांच्यासाठी नवीन प्रमोशन पॉलिसी लवकरात लवकर लागू करावी. जेणेकरून जवळपास 20,000 कर्मचारी यांची स्टेग्नाशन समस्यावर तोडगा निघेल.
4. मनुष्यबळाच्या पुनर्रचनेचे अवलोकन करून एलआयसी परीक्षा घेऊन रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात. तसेच ज्या परिमंडळ मध्ये जागा नाही तिथे जागा निर्माण कराव्यात. त्यामुळे कर्मचारी यांना सेवाकाळात पुढे जाण्याची संधी उपलब्ध होईल.
5. बीएसएनएल मधील कामांचे बेफिकीरपणे होणारे आऊटसोर्सिंग थांबवा. तसेच टी आय पी लगेच बंद करावे. TIP (टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉव्हिडर)ची कामे कार्यरत कर्मचारी यांचा कडून करून घ्यावीत.
6. कॉन्ट्रॅक्ट लेबर ची पिळवणूक थांबवणे व त्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन (Minimum Wage) देण्यात यावा व त्यांचे सामाजिक अधिकार म्हणजे ESI, EPF नियमित चालू करावेत.
7. चार कामगार विरोधी प्रस्तावित काळे कायदे रद्द करा.
8. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण थांबवावे. 9. राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन योजना बंद करा.
10. कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला किमान रुपये २६०००/- वेतन लागू करा. वरील प्रलंबित न्याय मागण्यासाठी नवी दिल्लीच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रभरामध्ये हा संप यशस्वी पार पाडण्यात आला. यामध्ये कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात तीव्र मत प्रदर्शित केले. हा संप कॉम्रेड नागेश कुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, कॉम्रेड जॉन वर्गीस, उपमहासचिव - नवी दिल्ली, कॉम्रेड गणेश हिंगे परिमंडळ सचिव, कॉम्रेड मोहम्मद जकाती, ए आय बी डी पी ए परिमंडळ सचिव, कॉम्रेड युसुफ हुसेन, महासचिव MH BSNLCWU, कॉम्रेड सुचिता पाटणकर, संयोजक डब्ल्यू डब्ल्यू सी सी याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सचिव व परिमंडळ कार्यकारणी सद्स्य यांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के यशस्वी झाला. वरील मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार केला नाही तर येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा संदेश या संपाच्या माध्यमातून देण्यात आला.
धन्यवाद