*बँकांना EMI रक्कम उशीरा पाठवणे* - *दंडात्मक व्याज व्यवस्थापनाने भरावे* -
*BSNLEU ने* *CMD BSNL यांना पत्र लिहिले*.
** बऱ्याच प्रसंगी, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली EMI रक्कम व्यवस्थापनाकडून वेळेवर बँकेला दिली जात नाही. यामुळे बँका कर्मचाऱ्यांवर दंडात्मक व्याज आकारतात. BSNLEU ने यापूर्वीच CMD BSNL यांना अनेक वेळा पत्र लिहून EMI रक्कम उशीरा पाठवल्याबद्दल दंडात्मक व्याज फक्त व्यवस्थापनाने भरावे, कर्मचाऱ्यांनी नाही अशी मागणी केली आहे. आज, BSNLEU ने कर्नाटक परिमंडळतुन प्राप्त झालेल्या एका विशिष्ट प्रकरणाचा हवाला देऊन CMD BSNL ला पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. BSNLEU ने अशीही मागणी केली आहे की, BSNL व्यवस्थापनाने देखील अशाच प्रकरणांमध्ये दंडात्मक व्याज स्वतः भरावे. -- *पी.अभिमन्यू, जीएस*