आपल्या सर्वांना माहीत आहे की 9 वे सद्स्य सत्यापन ची प्रक्रिया BSNL मध्ये सुरू झाली आहे. नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांना आपल्या हक्काची युनियन निवडायची आहे. BSNLEU म्हणून आपण सकारात्मक प्रचार करण्याचे ठरवले आहे. परंतु काही नकारात्मक विचारधारा असलेल्या संघटना पुन्हा एकदा अफवाचा बाजार गरम करत आहे. त्यांना सडेतोड उत्तर देणे हे आमचे कर्तव्य आहे. आधीच 32 पानी पुस्तक CHQ ने प्रिंट करून प्रत्येक कर्मचारी कडे दिले आहे व त्यात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. असे पुस्तक एक ही संघटना छापू शकत नाही हे त्यांचे दुर्देव आहे. BSNLEU खालील महत्वपूर्ण मुद्दे पुन्हा आपल्या समोर ठेवत आहे जेणेकरून आपण अशा नकारात्मक प्रचाराला बळी पडू नये ????
*1. स्टेग्नाशन:* ही समस्या ATT/TT/Sr.TOA कॅडर ला सतावत आहे. ह्या साठी आपण 1 दिवसाचा संप सुद्धा केला आहे. सरकारी नियमानुसार 3 पेक्षा अधिक स्टेग्नाशन इंक्रेमेंट देता येत नाही. म्हणून आपण 0% फिटमेंट घेण्यास तयार झालो. परंतु वेज रिविजन च्या 3 बैठकी नंतर लक्षात आले की याचा फायदा फार कमी स्वरूपात होत आहे. म्हणून आपण आता नवीन प्रोमोशन पोलिसी ची मागणी नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांच्या साठी केली आहे. ज्यामुळे पे स्केल वाढून त्याचा फायदा कर्मचारी यांना होईल. ह्या साठी फक्त BSNL बोर्ड व DoT यांचे एप्रूवल घ्यावे लागेल, केंद्रिय मंत्रीमंडळ कडे जाण्याची आवश्यकता नाही.
*2. JTO/JE/JAO च्या विभागीय परीक्षा :* VRS 19 नंतर BSNL ची कर्मचारी संख्या मोठया प्रमाणात घसरली व त्यामुळे आपली संघटित शक्ती कमी झाली. त्याचा गैरवापर करत BSNL मॅनजमेंट ने अस्तित्वात असलेल्या पोस्ट vacancy नष्ट केल्या. तसेच कर्मचारी यांना परीक्षेला बसण्यासाठी कडक नियम बनवले त्यात शैक्षणिक अहर्ता वाढवली, उच्च पे स्केल ठरवले त्यामुळे कमी कर्मचारी परीक्षेला बसावेत हा त्याचा कुटील डाव होता. परंतु BSNLEU ने सतत पत्राचार करून विभागीय परीक्षा घेण्यास भाग पाडले. शैक्षणिक अहर्ता अशा काही ठिकाणी अजून आपल्याला यश आले नाही तिथे सुद्धा आपण मुद्दा लावून धरला आहे. आम्हाला खात्री आहे की यात आम्हाला लवकरच यश मिळेल.
*3. राष्ट्रीय मुद्रिकरण पाईपलाईन:* ह्या योजने अंतर्गत BSNL चे टॉवर व ऑप्टिकल फायबर हे प्रायव्हेट ऑपरेटर ला देण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. 23 ऑगस्ट 2021 ला ही पोलिसी आल्या नंतर त्याला सर्वात जास्त विरोध BSNLEU ने केला व वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरलो. बाकीच्या संघटना मुकदर्शक बनून राहिल्या.
*4. 3 रे वेज रिविजन :* हया मुद्द्यावर सर्वात आक्रमक भूमिका BSNLEU घेत आहे. श्री अनुपम श्रीवास्तव हे CMD असतांना 15% फिटमेंट सह प्रस्ताव DOT पाठविण्यात आला होता. परंतु मोदी सरकारने नवीन धोरण काढले आहे की जी कंपनी सतत 3 वर्षे फायद्यात असेल त्यांनाच 3rd PRC मिळेल. त्या पुढील आपला संघर्ष सर्वाना माहीती आहे. कॉम पी अभिमन्यू यांनी सर्व संघटना एकत्र आणून AUAB ची स्थापना केली व लढा दिला. परंतु DOT मधील काही नतभ्रष्ट वरिष्ठ अधिकारी यांनी दगा दिला. म्हणून कॉम पी अभिमन्यू यांनी सर्वांचा (AUAB) सहमतीने मागणी केली की 5% फिटमेंट सह वेज रिविजन घेण्यास आम्ही तयार आहोत लिखित स्वरूपात आश्वासन DOT ने दिल्यावर असे कळविले. परंतु अप्रचार केला गेला की 5% फिटमेंट कॉम अभिमन्यू ने घेतले नाही. सध्या वेज रिविजन च्या मीटिंग मध्ये सुद्धा हा मुद्दा उचलुन धरला आहे आणि तसे पत्र मॅनजमेंट ला देण्यात आले आहे. लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे कारण हा मुद्दा आपण माननीय संसद सद्स्य व केंद्रीय मंत्री पर्यंत नेला आहे.
*5. मेडिकल क्लेम :* BSNLMRS अंतर्गत आपण सर्वांनी असंख्य फायदे घेतले आहे. परंतु BSNL ची आर्थिक परिस्थिती खालावली व आपणास त्रास हाऊ लागला. चांगली पॅनल हॉस्पिटलमध्ये आपल्याला प्रवेश नाकारला गेला. आपली सिलिंग लिमिट आऊटडोअर ची कमी झाली. निश्चित याचा त्रास आपल्या सर्वांना झाला. परंतु आपल्या संघटनेच्या प्रयत्न मुळे आऊटडोअर मेडिकल क्लेम आता वेळेत मिळत आहे. हॉस्पिटल ला जिथे with cash सुविधा आहे अशी इनडोअर ची बिले पगारातुन मिळू लागली आहे. क्रेडिट फॅसिलिटी चांगल्या हॉस्पिटलमध्ये मिळावी हया साठी आपण लढत आहोत. BSNL ची आर्थिक परिस्थिती ठीक झाली की ते सुद्धा आपण मिळवूच.
कॉम्रेड अनेक मुद्दे आहेत ते सर्व येथे मांडता येणार नाही. परंतु हे विश्वासाने सांगू शकतो की तुमच्या सर्व मुद्द्यांवर BSNLEU संवेदनशील पणे काम करत आहे. आपली CHQ व Circle website वर सर्व माहिती आपण share करत आहोत. कोविड काळात हे आपणच फक्त सक्रिय होतो. बाकीच्या संघटनेच्या website ह्या कितीतरी काळ बंदच होत्या. तरी मनात काही शंका असतील तर निःसंकोचपणे BSNLEU च्या कोणत्याही जिल्हा सचिव यांना आपण फोन करू शकता. जर समाधान झाले नाहि तर थेट परिमंडळ सचिव कॉम्रेड गणेश हिंगे यांचा मोबाइल क्रमांक 9403837366 वर संपर्क साधू शकता. परंतू कृपा करून कोणत्याही अफवेला व अप्रचारा ला बळी पडू नका.
*येत्या 12 ऑक्टोबर ला आपले बहुमुल्य मत BSNLEU लाच दया व पुन्हां एकदा कर्मचारी म्हणून आपले भवितव्य सुरक्षित करा. मोबाईल फोन ही आपली निशाणी विसरू नका, आपला विश्वास हाच आमचा श्वास*