*महत्वपुर्ण महिती : ऑनलाईन हजेरी व्यवस्था व कर्मचारी याने घेण्याची दक्षता.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*महत्वपुर्ण महिती : ऑनलाईन हजेरी व्यवस्था व कर्मचारी याने घेण्याची दक्षता.*  Image

कॉम्रेड आपणांस माहीत आहेच की 1.64 लाख करोड ? चे रेविवाल पेकेज दिल्यानंतर BSNL मॅनजमेंट फारच आक्रमक झाले आहे व कर्मचारी वर्गावर अंकुश ठेवण्यासाठी ऑनलाईन हजेरी व्यवस्था आणली आहे.

ही व्यवस्था OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड वर आधारित असणार आहे व तिची अंमलबजावणी 01.10.2022 म्हणजे BSNL डे पासून होणार आहे. लक्षात घेण्याचे महत्वाचे मुद्दे.

1. आपला सध्याचा वापरातील मोबाइल क्रमांक ESS/ERP मध्ये अद्ययावत करणे.

2. चाचणी आधारावर (ट्रायल बेसिस) व सिस्टम सुरू आहे त्याचा वापर उद्याच पासून सुरुवात करणे.

3. ATT किंवा इतर ग्रुप D कर्मचारी यांनी कॉम्प्युटर चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वाना प्रोत्साहित करणे.

4. जिथे कॉम्प्युटर नाही तिथे मोबाइल अँप चा वापर होईल. त्यासाठी जवळ अँड्रॉईड मोबाइल असणे गरजेचे.

5. काही दिवस सूट देण्यात येऊ शकते. म्हणून गाफील राहू नका. इतर कर्मचारी यांना प्रशक्षित करा.

6. आपण चुकीत सापडणार नाही याची दक्षता घ्या.

7. येणारी अडचण लगेच नोडल अधिकारी जो BA हेड ला उपलब्ध असेल त्याच्या निदर्शनास आणा. जर तो ऐकत नसेल तर परिमंडळ सचिव यांना संपर्क करा.

व्यवस्था नवीन आहे, खूप अडचणी येतील. पण सावध रहा व सतर्क रहा. संघटना आपल्या पाठीशी आहे कुणीही घाबरून जाऊ नका, योग्य पद्धतीने दिनक्रम चे नियोजन करा  धन्यवाद.