नमस्कार, आज नाशिक येथे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन यांचे आठवे जिल्हा अधिवेशन व ए आय बी डी पी ए यांचे अधिवेशन पार पडले.

10-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
46
IMG-20240310-WA0068

नमस्कार,आज नाशिक येथे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन यांचे आठवे जिल्हा अधिवेशन व ए आय बी डी पी ए यांचे अधिवेशन पार पडले.

कॉम्रेड जॉन वर्गीस, कॉम्रेड नागेशकुमार नलावडे,  कॉम्रेड गणेश हिंगे, कॉम्रेड  युसुफ हुसैन,कॉम आप्पासाहेब गागरे ,कॉम निलेश काळे कॉम यशवंत केकरे ,कॉम गणेश भोज, कॉम प्रशांत कुलकर्णी,कॉम नाना गुंजाळ यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती.

तसेच SNEA नाशिक चे जिल्हा सचिव श्री कमलेश तायडे, SNEA ACS MH श्री शशिकांत भदाणे, SEWA नाशिक DS श्री संदीप गांगुर्डे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली त्यानंतर कॉम गणेश हिंगे, कॉम जॉन वर्गीस ,कॉम्रेड युसुफ हुसैन कॉम निलेश काळे, कॉम अनिल पाटील, कॉम आप्पासाहेब गागरे, कॉम नागेश कुमार नलावडे यांनी सभेला संबोधित केले आणि आपले मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच श्री नरेश गायकवाड ए जी एम यांनी प्रशासनाच्या वतीने सभेला संबोधित केले. कॉम राजेंद्र लहाने यांनी अध्यक्षीय भाषण केले.

त्यानंतर बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यामध्ये  कॉम अनिल पाटील यांची जिल्हाध्यक्ष, कॉम अरुण उगले यांची जिल्हा सचिव तसेच कॉम विलास पाळदे यांचे खजिनदार म्हणून संमतीने निवड करण्यात आली.

एआयबीडीपीए नाशिक जिल्हा अध्यक्षपदी कॉम रामदास नाना गुंजाळ ,जिल्हा सचिव पदी कॉम  माणिकराव शिंदे तसेच खजिनदार पदी कॉम विनोद अनवेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

कॉम प्रशांत कुलकर्णी यांनी पेन्शन संदर्भात येणाऱ्या अनेक समस्यांवर मार्गदर्शन केले.AIBDBPA नाशिक मध्ये मोठ्या संख्येने सभासद फॉर्म भरण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व सभासद यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.