BSNL एम्प्लॉइज युनियन महाराष्ट्र चे कन्व्हेन्शन संपन्न.

03-02-24
1 Min Read
By BSNLEU MH
136
IMG-20240203-WA0076

BSNL एम्प्लॉइज युनियन  महाराष्ट्र चे कन्व्हेन्शन संपन्न. 

आज दि. 03/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता BSNL एम्प्लॉइज युनियन  महाराष्ट्र चे कन्व्हेन्शन ला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली.      यावेळी BSNL वर होत असलेल्या अन्याया बाबत चर्चा करण्यात आली.   BSNL ला 4G, 5G देण्यात होत असलेला विलंब.  BSNL ला चुकीच्या पद्धतीने निवीदा काढून स्पर्धे पासुन वंचीत ठेवण्याचा प्रयत्न. BSNL मधील कर्मचाऱ्यांना पे रीव्हीजन, प्रमोषन पॉलीसी पासुन गेल्या 7 वर्षांपासून वंचीत ठेवण्यात येत आहे.  याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड पी अभिमन्यू जनरल सेक्रेटरी यांनी BSNL ची सद्यस्थिती, BSNL ला संपवण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न तसेच कर्मचाऱ्यांचे पे रीव्हिजन , पेंशन रीव्हिजन, प्रमोशन पॉलीसी या बाबत संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या संघर्षा बाबत माहिती दिली.  यावेळी कॉ. नागेश कुमार नलावडे, गणेश हिंगे, युसुफ जकाती, युसुफ हूसेन, रोहिणी कुलकर्णी, विकास कदम, कौतीक बस्ते,मामा सुर्यवंशी, संदीप गुळूंजकर यांनी सभेला मार्गदर्शन केले व 16/02/2024 रोजी होत असलेला संप यशस्वी करण्याचे आवाहन केले. निलेश काळे यांनी सुत्रसंचलन केले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. गणेश भोज, किशोर गवळी, नितीन कदम, कॉ. खालीद, कॉ. दिलीप मगर, कॉ. मोरे , कॉ. जाधव कॉ. समीर देखणे    यांनी प्रयत्न केले. यावेळी महाराष्टातुन 300 पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते.