स्पेशल JTO LICE 2022 च्या उमेदवारांवर लादलेल्या कठोर, अतार्किक आणि अनुचित अटी काढून टाका- BSNLEU ने संचालक(HR) यान पत्र लिहिले

29-09-22
1 Min Read
By BSNLEU MH
247
6BA53B9A-1AB7-41CA-A541-80F9729C68A5

 

 कॉर्पोरेट ऑफिसने स्पेशल JTO LICE 2022 घेण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. तथापि, असे लक्षात आले आहे की, व्यवस्थापनाने स्पेशल JTO LICE 2022 मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांवर काही कठोर आणि अनुचित अटी लादल्या आहेत. उदाहरणार्थ, निवडलेला उमेदवार  परीमंडळासाठी पर्याय दिला आहे त्या परीमंडळात सामील होण्यासाठी अपयशी ठरल्यास  त्या उमेदवाराला JTO LICE मध्ये उपस्थित राहण्यापासून एक वर्षासाठी प्रतिबंधित केले जाईल.  त्याचप्रमाणे, अधिसूचनेत असे नमूद केले आहे की, BSNL बदली धोरणाच्या नियम 9 अंतर्गत, 5 वर्षे पूर्ण होण्याआधी, तात्पुरते ट्रान्सफर देखील मंजूर केले जाणार नाही.  या सर्व कठोर, अतार्किक आणि अनुचित अटी आहेत.  BSNLEU ने संचालक (HR) यांना पत्र लिहून या कठोर अटी हटवण्याची मागणी केली आहे. पी.अभिमन्यू, जीएस.