नमस्कार कॉम्रेड

27-04-24
1 Min Read
By BSNLEU MH
202
नमस्कार कॉम्रेड  Image

नमस्कार कॉम्रेड,

1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त सर्व BSNL कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना आगाऊ शुभेच्छा.

देशात लोकसभेच्या निवडणूक होत आहे. ही निवडणूक देशातील सर्व कर्मचारी वर्ग, शेतकरी वर्ग, मजूर व कष्टकरी वर्गासाठी अंत्यत महत्वपूर्ण आहे. मागील काळात जे निर्णय सरकार द्वारे घेण्यात आले आहे त्यावरून पुढील काळ हा आपल्या साठी फारच घातक आहे असे दिसून येत आहे. अशा वेळी देशातील व राज्यातील कामगार संघटना एकत्र होऊन कर्मचारी वर्गाला सद्यस्थिती सांगणे गरजेचे आहे. म्हणून सोबत एक संयुक्त पत्रक दोन्ही मान्यताप्राप्त संघटनेकडून जारी करण्यात येत आहे जे प्रत्येक कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी पर्यंत पोहचवावे. जेणेकरून कामगार वर्ग निवडणुकीत हिरहिरने भाग घेऊन कर्मचारी वर्गांच्या हिताच्या व संघर्षाच्या बाजूने उभा राहणाऱ्या योग्य उमेदवाराला निवडून आणण्यात मदत होईल.