" नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडर ची कर्तव्ये आणि जबाबदायांची व्याख्या करा: BSNLEU ने CMD BSNL ला पत्र लिहिले
BSNLEU सातत्याने मागणी करत आहे की, विविध नॉन एक्सएकटीव्ह संवर्गांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या परिभाषित केल्या पाहिजेत. यापूर्वी, P&T विभाग आणि दूरसंचार विभागात अशी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे परिभाषित केल्या होत्या. तथापि, बीएसएनएलच्या स्थापनेनंतर, व्यवस्थापनाने विविध कॅडरची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या परिभाषित केल्या नाहीत. यामुळे नॉन एक्सएकटीव्ह केडरच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबाबत संदिग्धता आणि अस्पष्टता निर्माण होत आहे. उदाहरणार्थ, जेई कॅडरला बीबीएम (भारतनेट बिझनेस मॅनेजर) या पदासह जबरदस्तीने लादले जात आहे. मॅनेजर हा शब्दच स्पष्टपणे सूचित करतो की, ही एक्झिक्युटिव्हची जबाबदारी आहे. परंतु BBM जबरदस्तीने जेईंवर लादले जात आहे. याचे कारण म्हणजे, नॉन एक्सएकटीव्ह केडरची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या परिभाषित नाहीत. आज, BSNLEU ने पुन्हा एकदा, CMD BSNL यांना पत्र लिहून, नॉन एक्सएकटीव्ह केडरची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या लवकरात लवकर परिभाषित कराव्यात अशी मागणी केली आहे.
-जॉन वर्गीस, कार्यवाहक GS.