कॉर्पोरेट ऑफिस पत्र जारी केले : युनियन सदस्यत्व बदलण्यासाठी संधी मिळणार (नॉन एक्सएकटीव्हना मॅन्युअल फॉर्म द्वारे व एक्सएकटीव्हना ऑनलाईन).

06-06-24
1 Min Read
By BSNLEU MH
167
Membersship Subscription

कॉर्पोरेट ऑफिस पत्र जारी केले : युनियन सदस्यत्व बदलण्यासाठी संधी मिळणार (नॉन एक्सएकटीव्हना मॅन्युअल फॉर्म द्वारे व एक्सएकटीव्हना ऑनलाईन).

विद्यमान कॉर्पोरेट ऑफिस ऑर्डरनुसार, कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा त्यांचे युनियन सदस्यत्व बदलण्याची परवानगी आहे.  कर्मचाऱ्यांसाठी युनियन सदस्यत्व बदलण्यासाठी अधिकृतता सादर करण्याची विंडो १६ जून ते १५ जुलै या कालावधीत उघडली जाईल.  यावर्षी, कॉर्पोरेट कार्यालयाने 03.06.2024 रोजी पत्र जारी केले आहे, ही विंडो 16.06.2024 ते 15.07.2024 च्या काळात उघडी राहणार आहे.  BSNLEU च्या सर्व परीमंडळ आणि जिल्हा संघटनांना विनंती आहे की त्यांनी BSNLEU चे सशुल्क सदस्यत्व वाढवण्यासाठी या संधीचा उपयोग करावा.  माहितीसाठी कॉर्पोरेट ऑफिसच्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.   

-जॉन वर्गीस, कार्यवाहक GS.