महाराष्ट्र BSNL कर्मचारी यांचे लाडके नेते व ट्रेड युनियन चळवळीचे पुरस्कर्ते : कॉम्रेड नागेशकुमार नलावडे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

20-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
84
महाराष्ट्र BSNL कर्मचारी यांचे लाडके नेते व ट्रेड युनियन चळवळीचे पुरस्कर्ते : कॉम्रेड नागेशकुमार नलावडे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Image

महाराष्ट्र BSNL कर्मचारी यांचे लाडके नेते व ट्रेड युनियन चळवळीचे पुरस्कर्ते : कॉम्रेड नागेशकुमार नलावडे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गेली 45 पेक्षा अधिक वर्षे DoT/ BSNL कर्मचारी यांच्या न्यायोचित हक्कासाठी लढणारे कॉम नागेशकुमार नलावडे यांना मानाचा लाल सलाम. संघटना कशी मजबूत करावी, कर्मचारी यांची व्यथा कशी मांडावी, आपल्या ओघवत्या भाषणातून अन्यायवर आसूड कसे ओढावे, संघटित संघर्षाची परिभाषा वेगळ्या पद्धतीने मांडून सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित करून लढा कसा उभारावा असे बाळकडू पाजून नवीन कार्यकर्त्यांची फळी आपण उभारली. मी नाहीतर "आम्ही" हया शब्दावर भर देवुन सामूहिक नेतृत्व बहाल केले. प्रत्येक कार्यकर्त्यांचे गुण हेरून त्याला योग्य संधी दिली. संधी देतांना सोबत काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य ही दिले. स्वतः मोठे होत असताना आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना ही आपण मोठे केले.

आज आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात BSNLEU चे अंग असलेल्या AIBDPA, CCWF व WWCC अशा संघटना ही मजबूत करण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. आपल्या वाढदिवशी आम्ही परमेश्वरा जवळ एकच मागणे मागतो की आपले प्रेम व आपुलकी व मार्गदर्शन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना कायम मिळो.