कॉम्रेड नमस्कार,
प्रायव्हेट मोबाइल कंपन्यानी दरवाढ केल्यानंतर सध्या मार्केट मध्ये BSNL सिम मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही संधी चे सोने केले पाहिजे व प्रत्येक कर्मचारी यांनी 100% योगदान दिले पाहिजे हया BSNLEU पत्र लिहून व आवाहन करून जनजागृती करत आहे. ह्याबाबतीत आपल्या युनियन प्रतिनिधी, कर्मचारी व तसेच आपले जेष्ठ सहकारी कॉम युसूफ हुसेन, CSC मधील स्टाफ इत्यादी कडून मोबाईल नेटवर्क मजबूत करण्यासाठी व आलेले नवीन कस्टमर पुन्हा BSNL सोडून जाणार नाही ह्यासाठी विनंती व सूचना करण्यात येत होत्या.
हया सर्व विनंती व सूचना यांचा विचार करून प्रत्येक मुद्द्याचा अंतर्भाव करून एक सविस्तर पत्र BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने देण्यात आले. हे पत्र बनवतांना आपले डेप्युटी जनरल सेक्रेटरी कॉम जॉन वर्गीस यांची सुद्धा मदत मिळाली त्यांना विशेष धन्यवाद.