कॉम्रेड आज CMD साहेब श्री रवी ए रॉबर्ट जेराड जी BSNL 4G ट्रेनिंग कोर्स करिताच्या कार्यक्रम निमित्त ITPC पुणे येथे आलेअसता आपल्या BSNLEU च्या वतीने कॉम नागेशकुमार नलावडे जी व कॉम विकास कदम, जिल्हा सचिव व AIBDPA च्या वतीने कॉम मोहम्मद जकाती व कॉम खडके आणि SNEA चे श्री सुनील सोनवणे आणि कॉम दिलीप भगत इतर पदाधिकारी व पुण्यातील आपल्या BSNL टीम ने त्याची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी खालील मुद्द्यावर आपण आपली भूमिका मांडली व निवेदन दिले.*
1.BSNL ची 4G व 5G सेवा लवकरात लवकर सुरू करणे. जेणेकरून आपण आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करू.
2.मार्केट मध्ये BSNL FTTH ची मागणी असतांना आपण ती पूर्ण करण्यास विलंब होतो किंवा काही ठिकाणी सेवा सतत विस्कळीत होत असल्याने FTTH सरनडर सुद्धा होत आहे. यात प्रामुख्याने नवीन कस्टमर आल्यावर जुने कस्टमर कमी होतात यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे
3.BSNL ची कॉपर केबल मोठया प्रमाणावर जमिनीत आहे ती संपूर्ण टेंडर करून बाहेर काढणे. अन्यथा चोरीच्या पद्धतीने इतर समाजकंटक ते काढून घेत आहेत.
4.60% पेक्षा अधिक नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी स्टेग्नाशन मध्ये आहे. त्यांना ह्यातून बाहेर काढण्यासाठी नवीन प्रोमोशन पोलिसी लागू करणे. तसेच पेन्शन व पे रिविजन संदर्भात विचारविनिमय करणे याकरिता श्री रवी सीएमडी यांनी 25% पर्यंत प्रॉफिट वाढवा या सर्व गतवैभव पुन्हा प्राप्त करून देऊ .
5.सुप्रीम कोर्टच्या निर्णय नुसार DoT काळात कार्यरत कर्मचारी यांचे पत्नी/मुले अनुकंपा तत्वावर कामाला लागली आहेत त्याना पुन्हा GPF चा दर्जा बहाल करून पेन्शन मिळून दयावी. सुप्रीम कोर्टामध्ये काही कर्मचारी गेले होते व त्यांच्या बाजूने हा निकाल लागला असून त्याचे अंमलबजावणी करून संपूर्ण बीएसएनएल मध्ये जे या संदर्भात बाधित आहेत त्यांना पेन्शन व ईपी एफ ते जी पी एफ करण्यात यावा
6.ST कास्ट वेल्डिंटी मुद्द्या मुळे सेवानिवृत्त कर्मचारी यांचे अत्यंत आर्थिक नुकसान होत आहे. हा सर्वाना त्रासदायक विषय फक्त महाराष्ट्रात आहे आणि तो प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी हि विनंती करण्यात आली. यावरील मंत्रालयातील शेरे पाहता मॅनेजमेंट ने कॉस्ट व्हॅलिडेशन बघायला पाहिजे
7.BSNL चा मार्केट share वाढला तर वेज रिविजन सारखा अंत्यत प्रलंबित विषय सुद्धा निकाली लागेल. असे सीएमडी आणि सांगितले
8.MTNL सेवा सुधारली व त्याचे BSNL मध्ये मेर्जेर झाले तर महाराष्ट्र संपूर्ण देशात टॉप वर असेल असेही CMD यांचा निदर्शनास आणून देण्यात आली.
*ही चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. CMD च्या देहबोलीतून हेच जाणवत आहे की पुढील काळात ते BSNL ला पुढे आणण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी सर्व वर्गाची साथ बहुमूल्य आहे.*