वेज रिव्हिजन मुद्दाचा तात्काळ निपटारा करा- BSNLEU आणि NFTE यांनी नवीन CMD BSNL यांना तपशीलवार संयुक्त पत्र लिहले.
BSNLEU आणि NFTE च्या सरचिटणीसांनी नवीन CMD BSNL यांना वेतन सुधारणेच्या मुद्द्यावर तपशीलवार संयुक्त पत्र लिहिले आहे. या पत्रात असे निदर्शनास आणून दिले आहे की, 27-07-2018 रोजी झालेल्या संयुक्त वेतन वाटाघाटी समितीच्या बैठकीत नॉन एक्सएकटीव्ह कर्मचाऱ्यांचा नवीन वेतनश्रेणीबाबत मान्यताप्राप्त संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात करार झाला होता. तथापि, हे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, व्यवस्थापनाने या कराराचे उल्लंघन केले आहे आणि नॉन एक्सएकटीव्ह वर कमी वेतनश्रेणी लादण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे स्टेग्नाशन ची समस्या कायम राहील आणि भविष्यातील वेतन सुधारणांमध्ये समस्या निर्माण होतील. श्री मनोज सिन्हा जी, माननीय दळणवळण राज्यमंत्री आणि दूरसंचार सचिव सुश्री अरुणा सुंदरराजन यांनी नॉन-एक्झिक्युटिव्हजच्या वेतन सुधारणेचा लवकरात लवकर तोडगा काढण्याची वचनबद्धता दिली होती. BSNLEU आणि NFTE ने पत्रात मागणी केली आहे की, वेतन सुधारणेची त्वरित अंमलबजावणी करून या वचनबद्धतेचा सन्मान करण्यात यावा. दोन्ही युनियनने असेही निदर्शनास आणून दिले आहे की, बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे भत्ते जवळजवळ एक चतुर्थांश शतकात सुधारित केले गेले नाहीत आणि भत्त्यांच्या सुधारणेचा विचार करावा अशी विनंती सीएमडी बीएसएनएल यांना केली आहे.
-पी.अभिमन्यू, जीएस.