कॉम्रेड नमस्कार, परिमंडळ अध्यक्ष कॉम नागेशकुमार नलावडेजी यांचा सूचनेनुसार SNEA च्या परिमंडळ कार्यकारणी बैठक सातारा येथे काल पार पडली.

04-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
86
IMG-20240804-WA0047

कॉम्रेड नमस्कार,

परिमंडळ अध्यक्ष कॉम नागेशकुमार नलावडेजी यांचा सूचनेनुसार SNEA च्या परिमंडळ कार्यकारणी बैठक सातारा येथे काल पार पडली. परिमंडळ सचिव म्हणून हया बैठकीला हजर होतो. नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी यांची संख्या कमी झाली असल्याने BSNL च्या प्रगती साठी व मॅनेजमेंट सोबत संघर्ष करण्यासाठी एक्सएकटीव्ह वर्ग आता समोर आला पाहिजे व संघर्ष केला पाहिजे अशी भूमिका मांडली.

दुपारी भोजन अवकाश नंतर BSNLEU सातारा व सांगली कॉम्रेड यांची एक समन्वय बैठक घेण्यात आली व सर्व मुद्द्यावर तपशीलवार चर्चा करून BA मजबूत करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अशीच बैठक येणाऱ्या पुढील काळात सांगली येथे घेतली जाऊन ह्यात कोल्हापूर च्या कॉम्रेड यांना सुद्धा सामावून घेतले जाईल. परिमंडळ सचिव यांनी हया बैठकीत

1. 3Rd PRC

2. EPF to GPF

3. 4G व 5G

4. कास्ट वेलीडिटी ह्या विषयावर परिमंडळ ची भूमिका स्पष्ट केली. ह्याच बैठकीत रिक्त असलेल्या जिल्हा अध्यक्ष पदावर कॉम चांगदेव गडगे यांची एकमताने निवड करण्यात आली. वरिष्ठ कॉम मणेश निकम हे महत्वपुर्ण घरगुती कारणांमुळे हया कार्यक्रमला येऊ शकले नाही त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

तसेच कॉम युसूफ हुसेन, GS CCWF यांनी येथे आलेल्या काही कॉन्ट्रॅक्ट लेबर यांच्याशी चर्चा करून ज्या 43 कॉम्रेड यांना थकबाकी मिळून दिली त्यांचा कडे डोनेशन ची अपेक्षा व्यक्त केली व सातारा येथे एक चांगली ब्रँच ओपन करण्यासाठी विनंती करण्यात आली.

कॉम संदीप साळुंखे, कॉम संतोष कांबळे, कॉम जगताप, कॉम शेलाटकर मॅडम, AIBDPA च्या वतीने जिल्हा सचिव जगन्नाथ दिवटे व इतर सातारा जिल्ह्याचे सहकारी उपस्थित होते. हया बैठकीसाठी सांगली वरून कॉम विकास चव्हाण, कॉम अमित सुळे, कॉम घोडेस्वार, कॉम लोंढे व इतर सहकारी यांनी भाग घेतला. हा समनव्यातुन संवाद घडविण्यासाठी सर्व कॉम्रेड यांनी विशेष प्रयत्न केले. BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ तर्फे हया सर्व कॉम्रेड यांचे आभार व अभिनंदन.