कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरचा रानटीपध्दतीने सामूहिक बलात्कार आणि खून - BSNLWWCC ने कर्मचाऱ्यांना 20.08.2024 रोजी निदर्शने आयोजित करण्याचे आवाहन केले.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या रानटी पध्दतीने सामूहिक बलात्कार आणि हत्येने देशाची सदसद्विवेकबुद्धी हादरली आहे. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दोषींना अटक करण्याची मागणी करत 14 ऑगस्टच्या रात्री कोलकाता येथे हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र, हा गुन्हा करणारे गुन्हेगार अजूनही फरार आहेत. पुढे, समाजकंटकांच्या मोठ्या जमावाने आंदोलक डॉक्टर आणि आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनीही राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे म्हटले आहे. या परिस्थितीत, BSNL कार्यरत महिला समन्वय समितीने (BSNLWWCC) कर्मचाऱ्यांना 20.08.2024 रोजी दुपारच्या जेवणाच्या वेळी निदर्शने आयोजित करण्याचे आवाहन केले आहे, दोषींना त्वरित अटक करण्याची आणि कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. BSNLEU च्या अखिल भारतीय केंद्राने हे निदर्शन व्यापक आणि यशस्वी करण्यासाठी जिल्हा आणि परीमंडळ संघटनांनी सर्वतोपरी तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पी.अभिमन्यू, जीएस.