पुणे येथे WFTU च्या आवाहन नुसार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी - आंतरराष्ट्रीय कृती दिन - साजरा करण्यात येईल.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स (WFTU)* कामगार वर्गाच्या जागतिक स्तरावरील लढाईचे नेतृत्व करत आहे. ३ ऑक्टोबर हा WFTU चा ७९ वा स्थापना दिवस आहे. दरवर्षी, WFTU 3 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून साजरा करते. WFTU ने खालील मागण्यांवर प्रकाश टाकत 03 ऑक्टोबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय कृती दिन पाळण्याचे आवाहन केले आहे:-
हया निमित्ताने महाराष्ट्र परिमंडळच्या वतीने पुणे येथे दिनांक 03 ऑक्टोबर -2024 { दुपारी ठीक 1.30 } सेमिनार आयोजित करण्यात येत आहे. हया सेमिनारला BSNLEU चे महासचिव कॉम पी अभिमन्यू, कॉम नागेशकुमार नलावडे, उपाध्यक्ष CHQ व कॉम जॉन वर्गीस, उपमहासचिव संभोदीत करतील.
_WFTU चे ज्वलंत मुद्दे_
मजुरी कमी न करता दर आठवड्याला ३५ तास काम.
कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षितता.
सामाजिक सिक्युरिटीज आणि सार्वजनिक आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रणालींमध्ये प्रवेश सुनिश्चित करणे.
दर्जेदार काम आणि राहणीमान.
BSNL चे प्रमुख मुद्दे
1.वेज रिविजन
2.स्वेच्छानिवृत्ती योजना
3.4जी व 5 जी ची सद्यस्थिती
परीमंडळ पुण्याजवळील सर्व जिल्हा सचिव यांना 03 ऑक्टोबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय कृती दिनच्या कार्यक्रमात मोठया संख्येने सामील होण्याचे आवाहन करतो.