3 रा वेतन करार/ 3rd PRC ह्या फ़क्त एकाच मुद्द्यावर AUAB कडून आंदोलनची नोटीस DoT सेक्रेटरी व CMD BSNL यांना जारी करण्यात आली आहे. हे आंदोलन व्यापक स्वरूपात व्हावे हया साठी AUAB चा प्रत्येक घटक सक्रिय झाला पाहिजे.
हया नोटीस प्रमाणे 27.05.2022 रोजी सर्वानी निदर्शनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी केला. आता दुसरा महत्वपूर्ण टप्पा आहे दिनांक 14.06.22 रोजी "ट्विटर मोहीम". सध्या देशात सोशल मीडिया हा महत्वपूर्ण घटक झाला आहे आणि त्याची दखल केंद्र/राज्य सरकार कडून घेतली जाते.
हया अनुषंगाने सर्व जिल्हा सचिव/परिमंडळ कार्यकारणी सद्स्य/शाखा सचिव/स्थानिक परिषद सदस्य/सक्रिय सभासद यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले ट्विटर अकाउंट उघडून हया मोहिमेत सामील व्हावे. ज्यांची ट्विटर अकाउंट अगोदरच आहेत त्यांनी हयात सक्रिय भाग घ्यावा. सोबत ट्विटर अकाउंट कसे उघडावे ह्या साठी विडिओ जोडत आहे. तरी सर्व कॉम्रेडस यांना विनंती आहे की " ट्विटर मोहीम " यशस्वी करण्यासाठी सर्वानी विशेष प्रयत्न करावे .
कर्मचारी एकता जिंदाबादAUAB जिंदाबाद
कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU
कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU
कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी
कॉम अमिता नाईक संयोजक WWCC