परिमंडळ आणि जिल्हा अधिवेशन तातडीने घेणे.
BSNLEU च्या घटनेनुसार 3 वर्षातून एकदा परीमंडळ अधिवेशन आयोजित करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा अधिवेशन 2 वर्षातून एकदा घ्यावी लागते. सीएचक्यूच्या निदर्शनास आले आहे की, काही परीमंडळांनी, ज्यांची अधिवेशने आधीच नियोजित आहे, त्यांनी ती आयोजित केली नाही. या परीमंडळ संघटनांनी तातडीने त्यांची परीमंडळ अधिवेशन घ्यावी. सरचिटणीसांशी चर्चा करून परिमंडळ अधिवेशन तारीख निश्चित केली जाऊ शकते. शिवाय, त्यांच्या परिमंडळाच्या जिल्हा संघटनांच्या अधिवेशने तत्परतेने आयोजित केल्या जातील याची खात्री करणे हे देखील परीमंडळ संघटनांचे कर्तव्य आहे.
पी.अभिमन्यू, जीएस.