दिग्गज ट्रेड युनियन नेते, कॉम सी एस पी, यांची जन्मशताब्दी चेन्नई येथे साजरी करण्यात आली.
तामिळनाडू आणि चेन्नई परीमंडळांच्या BSNLEU आणि AIBDPA च्या परीमंडळ संघटनांनी काल कॉम सी एस पंचपाकेसन याच्या जन्मशताब्दी निमित्त एक प्रभावी कार्यक्रम आयोजित केला गेला. ते तामिळनाडूमधील P&T ट्रेड युनियन चळवळीतील दिग्गज नेत्यांपैकी एक होते. कॉ सी एस पंचपाकेसन यांचे योगदान तामिळनाडू P&T ट्रेड युनियन चळवळीला वैचारिकदृष्ट्या बळकट करण्यात खूप मोठे होते, ज्याना प्रेमाने कॉम सी एस पी असे म्हंटले जात होते. तामिळनाडू परिमंडळतील विविध भागांतील सुमारे 400 कॉम्रेड या बैठकीला उपस्थित होते. कॉ. एस. चेल्लाप्पा, एजीएस अध्यक्षस्थानी होते. कॉ.पी.अभिमन्यू, जीएस, बीएसएनएलईयू, यांनी या सभेला संबोधित केले आणि तामिळनाडू ट्रेड युनियन चळवळीतील कॉम.सी.एस.पी.च्या अतुलनीय योगदानावर विस्तृतपणे बोलले. कॉ.पी. संपत, अध्यक्ष, (TNUEF), कॉम इस मोहनदास, VP (CHQ), AIBDPA, कॉम.बाबू राधाकृष्णन, CP, BSNLEU, TN, Com.Raju, CS, BSNLEU, TN, कॉम एम श्रीधरसुब्रमण्यन, CS, BSNLEU, चेन्नई, कॉम आर राजसेकर, CS, AIBDPA, TN, कॉम के गोविंदराज, CS, AIBDPA, चेन्नई आणि Com.C.S.P. च्या कुटुंबीयांनी देखील संबोधित केले. कॉ.पी.अभिमन्यू, जीएस यांनी Com.C.S.P. यांच्या स्मरणार्थ छापलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात योगदान देणाऱ्या सर्व कॉम्रेड्सचे BSNLEU CHQ मनापासून अभिनंदन करते.
पी.अभिमन्यू, जीएस.