जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन आज रविवार दि. 24/11/20 24 रोजी संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये अध्यक्षस्थानी प्रदीप चांगरे हे होते.
या अधिवेशनाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
या अधिवेशनाला कॉम्रेड नागेश नलावडे, अध्यक्ष महाराष्ट्र परिमंडळ, कॉम.संदीप गुळुंजकर सहसचिव महाराष्ट्र परिमंडळ, कॉ. एम आय जकाती सर्कल सचिव एआयबीडीपीए, कॉ.गणेश भोज जिल्हा खजिनदार पुणे व सचिव पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटी, कॉ. रविंद्र पाटील सहाय्यक परिमंडळ सचिव, कॉ. इंगळे खजिनदार एआयबीडीपीए, काँ. श्रीवास्तव एसएनईए चे जिल्हा सचिव, अगोटा जिल्हा सचिव कॉ. बाविस्कर कॉ. अग्रवाल इत्यादी या अधिवेशनाला उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन पर भाषण करून अधिवेशनाला संबोधित केले. सभेचे अध्यक्ष कॉ.प्रकाश चांगरे यांनी अध्यक्षीय भाषण केले.
दुपारच्या सत्रात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी कॉ.शाळीग्राम पाटील, जिल्हा सचिव कॉ.निलेश काळे, जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. शशिकांत सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा सचिव निलेश काळे यांनी सर्वांचे अभिनंदन व आभार मानून या अधिवेशनाची सांगता केली.