कॉम्रेड नमस्कार,
BSNL कर्मचारी यांचा कडून वारंवार वेज रिवीजन केव्हा होणार याची वारंवार चौकशी केली जात आहे. काही नकारात्मक मंडळी तर वेज रिवीजन लवकर होत नसल्याने त्याचा दोष BSNLEU देत आहे.
त्यामुळे एक सविस्तर परिपत्रक BSNLEU CHQ, नवी दिल्ली च्या वतीने काढण्यात आले आहे. ज्यात वेज रिवीजन साठी केलेला संघर्ष, कुणाकडुन अडथळे निर्माण केले जात आहे आणि सद्यस्थिती काय आहे ह्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच ह्या मुळे नॉन एक्सएकटीव्ह कॅडर मध्ये 60% पेक्षा अधिक कर्मचारी हा स्टेग्नाशन मध्ये गेला आहे. हे परिपत्रक मराठी व इंग्रजी भाषेत जारी करण्यात आले आहे.
तरी सर्व युनियन प्रतिनिधी व सक्रिय कार्यकर्ते यांनी कर्मचारी यांना दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ते 06.डिसेंबर 2024 ह्या कालावधीत प्रत्यक्ष भेटून हे परिपत्रक देणे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.