BSNLEU पुणे जिल्हा चे 9 वे अधिवेशन उत्साहात व आनंदात संपन्न झाले. नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीचे अभिनंदन.

01-12-24
1 Min Read
By BSNLEU MH
107
BSNLEU पुणे जिल्हा चे 9 वे अधिवेशन उत्साहात व आनंदात संपन्न झाले. नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीचे अभिनंदन. Image

BSNLEU पुणे जिल्हा चे 9 वे अधिवेशन उत्साहात व आनंदात संपन्न झाले. नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीचे अभिनंदन.

काल पुणे BSNLEU  जिल्हा चे अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी कॉम युसूफ जकाती हे होते. महाराष्ट्र परिमंडळच्या वतीने कॉम नागेशकुमार नलावडे, कॉम गणेश हिंगे, कॉम संदीप गुळुंनजकर व कॉम युसुफ हुसेन GS CCWF विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने PGM श्री भातम्बरे साहेब व अन्य वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अधिवेशनाला संभोदीत करत नूतन कार्यकारणी शुभेच्छा दिल्या. पुण्यात होणाऱ्या संघटनात्मक कामाची सर्वानी भरभरून प्रशंसा केली. तसेच आपले आधारस्तंभ कॉम नागेशकुमार नलावडे हे BSNLEU, AIBDPA, CCWF व WWCC सक्षम करण्यासाठी जे काही मार्गदर्शन करतात व काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात याचाचा आवर्जून उल्लेख परिमंडळ सचिव यांनी केला.

हया अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी कॉम पुष्पाताई फराटे, AGS AIBDPA, कॉम वृषाली दाभोळकर,कॉम मंजुषा लचके, सहसंयोजक WWCC  केले ही आवर्जून उपस्थित होत्या. मुंबई, नांदेड, रायगड जिल्ह्यातून कॉम यशवंत केकरे, कॉम महेश अरकल, कॉम प्रशांत कुळकर्णी, कॉम आयुब खान, कॉम लालू कोंडाळवडे, कॉम वानखेडे व कॉम संपत गाढवे यांनी सुद्धा हजेरी लावली. AIBDPA च्या वतीने कॉम सूर्यवंशी मामा, कॉम नरेंद माने,कॉम नफिस काजी, कॉम खडके, कॉम शशांक नायर, कॉम कुळकर्णी मॅडम, कॉम गुलाब काळे, SNEA च्या वतीने कॉम प्रयाग पिसाळ व कॉम कदम हे उपस्थित होते.

भोजन अवकाश नंतर संघटनात्मक कारवाई सुरु झाली.  जिल्हा अध्यक्ष - कॉम युसुफ जकाती,जिल्हा सचिव - विकास कदम व जिल्हा खजिनदार कॉम गणेश भोज यांची व पुन्हा एकमताने निवड करण्यात आली आणि कार्यकारिणीत अनेक सक्रिय कार्यकर्त्यांची युनियन प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. सर्वाना परिमंडळच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले. हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कॉम किशोर गवळी, कॉम मंगेश गायकवाड, कॉम शमा गांधी, कॉम मंदा मालांपल्ली, कॉम नितीन कदम, कॉम विजय झगडे व इतर सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली. कॉम गणेश भोज यांनी सूत्रसंचालन ची जबाबदारी चोख पणे बजावली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्गीताने झाली.

BSNL जिंदाबाद
BSNLEU जिंदाबाद
कामगार शक्ती जिंदाबाद