BSNLEU सोलापूर जिल्हा चे 9 वे अधिवेशन उत्साहात व आनंदात संपन्न झाले. नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीचे अभिनंदन

13-12-24
1 Min Read
By BSNLEU MH
434
IMG-20241213-WA0056

BSNLEU सोलापूर जिल्हा चे 9 वे अधिवेशन उत्साहात व आनंदात संपन्न झाले. नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीचे अभिनंदन .

आज सोलापूर BSNLEU  जिल्हा चे अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी कॉम दत्ता अलगिकर (आप्पा ) हे होते. महाराष्ट्र परिमंडळच्या वतीने कॉम गणेश हिंगे, CS, कॉम मोहम्मद जकाती, CS AIBDPA, कॉम  कॉम युसुफ हुसेन GS CCWF, कॉम मनोज शिंदे, परिमंडळ कॉम महेश अरकल, जिल्हा सचिव, Circle Office, मुंबई आणि उस्मानाबाद चे जिल्हा सचिव कॉम प्रकाश सरवदे हे उपस्थित होते.  विशेष अतिथी म्हणून उपस्थित कॉम श्रीकांत माब्रुखाने, महाव्यवस्थापक हे होते. प्रशासनाच्या वतीने अनेक वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते.  तसेच SNEA च्या वतीने कॉम तुषार कुलकर्णी, DP व कॉम वृषाली, जय भीम संघटनेच्या वतीने कॉम तेलगावकर, कॉम पोटफोडे, कॉम सुजित हावळे. AIGETOA च्या वतीने कॉ त्रंबके, NFTE चे जिल्हा सचिव कॉम माने आणि  AIBDPA च्या वतीने DS कॉम दुसाल हे उपस्थित होते.

उद्घाटन सत्र मध्ये मांडलेल्या मुद्दाना परिमंडळ सचिव यांनी माहिती दिली व संघटित संघर्षसाठी  सर्वानी तयार राहावे असे आवाहन केले. सोलापूर मध्ये  होणाऱ्या संघटनात्मक कामाची सर्वानी भरभरून प्रशंसा केली. तसेच कॉम मनोज शिंदे यांनी आपले आधारस्तंभ कॉम नागेशकुमार नलावडे व परिमंडळ सचिव यांनी केलेल्या कार्याबद्दल सोलापूर च्या वतीने आभार मानले. सर्व मान्यवरांनी जिल्हा अधिवेशनाला शुभेच्छा देत, जिल्ह्यात BSNLEU द्वारे झालेल्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

दुसऱ्या सत्रात कॉम ए जे शेख यांनी आपला कार्य अहवाल मांडला तो सर्वाने एकमताने मंजूर केला. कॉम दत्ता अलगीकर, जिल्हा अध्यक्ष, कॉम ए जे शेख, जिल्हा सचिव व कॉम बिटोडकर, जिल्हा खजिनदार व सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम प्रकाश सलगर, कॉम सय्यद, कॉम प्रशांत पाटील, कॉम अलगिकर, कॉम मुलाणी व इतर सहकारी यांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कॉम स्वप्नाली पाळसे, संयोजक WWCC यांनी कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन केले. परिमंडळ च्या वतीने नवीन कार्यकारणी ला शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील कार्यकाळात परिमंडळ ने संपूर्ण सहकार्य चे आश्वासन दिले.

BSNL जिंदाबादBSNLEU जिंदाबादAIBDPA जिंदाबादCCWF जिंदाबादWWCC जिंदाबाद

कामगार शक्ती जिंदाबाद