"9 वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे दिनांक 17 व 18 डिसेंबर-2024 रोजी उत्स्फूर्तपणे पार पडले."

20-12-24
1 Min Read
By BSNLEU MH
426

"9 वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे दिनांक 17 व 18 डिसेंबर-2024 रोजी उत्स्फूर्तपणे पार पडले."


कॉम्रेड नमस्कार,

आज BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ चे 9 वे अधिवेशन, नाशिक मुक्तीधाम येथे पार पडले.  ह्या अधिवेशनाला अंदाजे 150 ex officio/delegate/observer यांनी उपस्थिती दर्शवली. 17 डिसेंबर ला उद्घाटन सत्र पार पडले ह्या सत्रात आपले सर्वोच्च नेते कॉ नागेशकुमार नलावडे जी हे अध्यक्षस्थानी होते. BSNLEU CHQ च्या वतीने आपले लाडके नेते कॉम पी अभिमन्यू जी, तसेच कॉ. डी एल कराड, अध्यक्ष CITU महाराष्ट्र, कॉम जॉन वर्गीस, Dy GS CHQ, श्री ए पी गायकवाड, PGM नाशिक, कॉम मोहम्मद जकाती, CS AIBDPA, कॉम युसूफ जकाती, GS BSNL MH कॉन्ट्रॅक्ट workers युनियन, कॉम सुचिता पाटणकर, संयोजक WWCC, कॉम आप्पा साहेब गागारे, माजी परिमंडळ अध्यक्ष, कॉम सत्यवान उभे, जेष्ठ नेते, कॉम समीर खरे, CS SNEA, कॉम  निकी जगवानी, CS AIGETOA, कॉम  तायडे, Circle प्रेसिडेंट, AIBSNLEA, कॉम गोडसे, DS NFTE, कॉम गांगुर्डे, कॉम धनंजय रेंगडे, SEWA BSNL, कॉम सांगळे व इतर सर्व संघटनेचे नेते उपस्थित होते. सर्वानी सभेला संभोदीत केले. विकसित भारत 2047 मोहिमेत BSNL ची भूमिका हा विषय केंद्रीय स्थानी होता.

गेली दोन दिवस प्रत्येक विषयावर व कर्मचारी यांचा विषयावर जिल्हा सचिव, परिमंडळ कार्यकारणी सदस्य, WWCC संयोजक व  डेलिगेट यांनी आपली मते मांडली. शेवटी परिमंडळ सचिव यांचा कार्यअहवाल व परिमंडळ खजिनदार यांचा आर्थिक अहवाल सभेने स्वीकारला. नवीन कार्यकारणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कॉम्रेड नागेशकुमार नलावडे, अध्यक्ष, कॉम कौतिक बसते, सचिव आणि कॉम संदीप गुळुंनजकर यांची, परिमंडळ खजिनदार व उर्वरीत टीम यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यक्रम सूत्रसंचालन कॉम गणेश भोज यांनी अंत्यत सुरेख पद्धतीने केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम अनिल पाटील, जिल्हा अध्यक्ष,  कॉ अरुण उगले, जिल्हा कॉ पाळंदे, खजिनदार, कॉ गौरव सोनार, CCM सदस्य, कॉ माणिक शिंदे, जिल्हा सचिव AIBDPA, कॉ गिरासे, कॉम संतोष पाळंदे, कॉ नितिन सोनवणे, कॉम राजेंद्र लहाने व इतर सहकारी  व स्वागत समिती यांनी विशेष मेहनत घेतली यांना सर्वाना मानाचा लाल सलाम.

कामगार एकजुटीचा विजय असो

BSNLEU जिंदाबाद

इन्कलाब जिंदाबाद.