CMD BSNL सर सोबत झालेल्या चर्चेचा गोषवारा.
नमस्कार कॉम्रेड,
आज CMD साहेब यांनी महाराष्ट्र मधील युनियन व असोसिएशन यांना भेटले व अनेक विषयांवर चर्चा केली. हया चर्चा सत्रात महाराष्ट्र BSNLEU परिमंडळ तर्फे खालील प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
कॉ कौतिक बस्ते, CS
कॉ गणेश हिंगे, VP
कॉ युसूफ हुसेन, AGS CCWF
कॉ बाळकृष्ण कासार, OS
कॉ महेश अरकल, DS मुंबई
महाराष्ट्र परिमंडळ तर्फे कॉम कौतिक बस्ते यांनी खालील मुद्दे मांडले.
1.दिवसागणिक FTTH ची सेवा विस्कळीत होत आहे. ज्यामुळे सरेंडर रेशो वाढला आहे.
2.कॉपर ते फायबर स्वीच ओव्हर लवकरात लवकर झाले पाहिजे.
3.MTNL मुंबईतील खराब नेटवर्क चा परिणाम महाराष्ट्र BSNL वर होत आहे.
4.सध्याच्या 4G टॉवर मुळे मोबाईल अस्तित्वात असलेल्या नेटवर्क ला अडथळा येत आहे.
5.तिवरा सिस्टीम मध्ये फक्त FTTH डाऊन झाल्याची माहिती मिळते. पण मोबाइल टॉवर डाऊन असल्याची माहिती मिळत नाही. ही सुविधा तिवरा सिस्टीम मध्ये उपलब्ध झाली पाहिजे.
6.TIP द्वारे सिस्टीम मध्ये कस्टमर ची माहिती दिली जाते. परंतु फिजिकल पुन्हा संपूर्ण माहिती देण्यासाठी आग्रह केल्याने ग्राहक नाराज होत आहेत. त्यामुळे TIP ने दिलेली माहिती ग्राह्य धरण्यात यावी.
7.महाराष्ट्र मध्ये JE ची संख्या खूपच कमी आहे. JE कॅडर मध्ये भरती करावी.
8.स्टेग्नाशन मुळे नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांचा उत्साह मावळला आहे. उत्साह वाढविण्यासाठी नवीन NEPP पोलिसी आणावी.
9.अनुकंपा तत्वावर लवकरात लवकर भरती करावी. जेणेकरून कॉविड व अक्सीडेट मुळे जीव गमावलेल्या कर्मचारी यांचा वर अवलंबून असलेल्या व्यक्ती यांची अनुकंपा तत्वावर भरती करून त्या कुटूंबाला मदतीचा हात दयावा.
10.नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांचा पगार अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे वेज रिविजन लवकरात लवकर करून कामगार वर्गाला न्याय दयावा.
नवीन CMD व CGM आल्यापासून महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण तयार झाले असून त्याचा फायदा निश्चितच होईल असा आशावाद BSNLEU तर्फे व्यक्त करण्यात आला.
सर्व युनियन व असोसिएशन यांचे म्हणणे ऐकून घेऊन CMD साहेब यांनी सांगितले की पुढील एक वर्षाचा काळ BSNL साठी संघर्षाचा आहे. सर्वानी एकदिलाने काम करावे. पुढील काळात MTNL मुंबई व दिल्लीत चांगले नेटवर्क येणार आहे त्याचा फायदा रेवणू वाढीसाठी होऊ शकतो. सरकार BSNL च्या भविष्या बाबत चिंता करत आहे. BSNL च्या नवीन नवीन योजना सर्वसामान्य नागरिकांना सांगाव्यात व आपणच म्हणजे कर्मचारी यांनी BSNL चे ब्रँड एबेसिडेंर म्हणून काम करावे.
3 रे वेज रिविजन साठी आपल्याला अजून काम करावे लागेल. मार्केट शेअर 25% करण्यासाठी सर्वानी जीवाचे रान करावे. VRS बाबतीत विचारणा केली असता भविष्यात अशी कोणतीही योजना नाही असे त्यांनी ठासून सांगितले व सर्वानी जोमाने काम करावे अशी विनंती त्यांनी सम्पूर्ण कर्मचारी वर्गाला केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात झाल्याने सर्वानी CMD व CGM साहेब यांचे आभार मानले. आपल्या माहितीसाठी सोबत विडिओ सुद्धा उपलब्ध करून दिले आहे त्यासाठी कॉम महेश अरकल, DS यांचे विशेष आभार.
कॉम कौतिक बस्ते
परिमंडळ सचिव BSNLEU.