परिवहन भत्त्याचे पुनरावलोकन – महासचिव, BSNLEU, संचालक (मानव संसाधन) यांच्याकडे या विषयाचे लवकर निराकरण होण्याची विनंती करतात.
BSNLEU ने याआधीच ठामपणे मागणी केली आहे की, नॉन-एक्झिक्युटिव्ह कर्मचार्यांचे परिवहन भत्ते पुनरावलोकन केले पाहिजे. BSNLEU ने हे देखील सूचित केले आहे की, परिवहन भत्त्यांचे पुनरावलोकन हे व्यवस्थापन Wage Revision ची प्रतिक्षा न करता केले जाऊ शकते. आज Com.P.Abhimanyu, महासचिव यांनी डॉ. कल्याण सागर निप्पाणी, संचालक (मानव संसाधन) यांची भेट घेतली आणि या विषयाचे लवकर निराकरण होण्याची विनंती केली. संचालक (मानव संसाधन) यांनी उत्तर दिले की, परिवहन भत्त्यांच्या पुनरावलोकनाचा विषय व्यवस्थापनाच्या सक्रिय विचाराधीन आहे. संचालक (मानव संसाधन) यांनी हे देखील सांगितले की, या विषयावर निर्णय मार्च २०२५ नंतर घेतला जाईल.
– P.Abhimanyu, महासचिव.