वेतन पुनरावलोकन समितीची बैठक तात्काळ बोलावली जावी - BSNLEU ने PGM(SR) ला सांगितले.
कॉ. अनिमेष मित्रा, अध्यक्ष आणि कॉ. पी. अभिमन्यू, महा सचिव, यांनी काल मॅ. Anita Johri, PGM(SR) यांची भेट घेतली आणि वेतन पुनरावलोकन समितीची बैठक न होण्याच्या विलंबावर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, या बैठकीच्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यांनी तात्काळ बैठक बोलावण्याची मागणी केली. PGM(SR) ने उत्तर दिले की, वेतन पुनरावलोकन समितीतील काही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे बैठक बोलावता आली नाही. तिने आश्वासन दिले की, ती लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करेल.
-पी. अभिमन्यू, महा सचिव.