डिजिटल लाईफ सर्टिफिकेट न जमा केल्या विषयी (संपन्न पेन्शन धारक)

23-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
190
m_merged(16)

मार्च 2022 च्या अखेरी पर्यंत जवळपास 1000 सेवानिवृत्त कर्मचारी यांनी डिजिटल लाइफ certifcate दिले नव्हते. त्यासाठी BSNLEU/AIBDPA च्या प्रतिनिधी नी विशेष प्रयत्न करून सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सर्टिफिकेट पाठवले. जेणेकरून सेवा निवृत्त कर्मचारी यांची पेन्शन एप्रिल 22 पर्यंत होऊ शकली.

परंतु May - 22 हया महिन्यात सुद्धा 103 सेवा निवृत्त कर्मचारी यांनी सर्टिफिकेट दिलेले नाही ज्याची लिस्ट सोबत जोडत आहोत. अशा कर्मचाऱ्यांनी दिनांक 25.05.2022 च्या आधी सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक आहे. तरी सर्व जिल्हा सचिव यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील व्हाट्सअप्प ग्रुप च्या माध्यमातून ही माहिती हया सेवा निवृत्त कर्मचारी पर्यंत पोहचवावी.  सोबत CCA महाराष्ट्र बरोबर योग्य पध्दतीने संपर्क कसा ठेवावा याची सुद्धा माहिती जोडत आहे. धन्यवाद????

कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC