BSNLEU ची प्रतिमा खराब करण्यासाठी फेक मेसेज पसरवण्यापासून सावध रहा.
By

BSNLEU MH

Lorem ips
BSNLEU ची प्रतिमा खराब करण्यासाठी फेक मेसेज पसरवण्यापासून सावध रहा. Image

CHQ सर्व पदाधिकारी आणि कॉम्रेड्सना काही असामाजिक तत्व/"विघ्नसंतोषी कडून पाठवल्या जाणार्‍या बनावट संदेशांपासून सावध राहण्याची विनंती करते.

 अलीकडे, कॉ. पी. अभिमन्यू, जीएस यांच्या नावाने एक बनावट संदेश प्रसारित करण्यात आला, ज्यामध्ये कॉर्पोरेट कार्यालयाने IDA थकबाकी देण्याचे आदेश जारी केले आहेत.  वास्तविक, कॉर्पोरेट कार्यालयाकडून असे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही.  BSNLEU आणि सरचिटणीस कॉ.पी.अभिमन्यू यांची प्रतिमा खराब करण्याचा अशा प्रकारचे खोटे संदेश प्रसारित करणार्‍यांचा हेतू आहे.  त्यामुळे, क्षेत्रीय स्तरावरील कॉम्रेड्सना विनंती आहे की, केवळ संबंधित परीमंडळ सचिव/जिल्हा सचिव यांनी पाठवलेल्या संदेशांवर विश्वास ठेवावा.  इतर स्त्रोतांकडून/गटांकडून आलेले संदेश दुर्लक्षित केले पाहिजेत. -पी.अभिमन्यू, जीएस.