आम्हाला खलनायक समजू नका - केंद्रीय कामगार संघटनेचे नेते यांनी श्रीमती निर्मला सीतारामन, माननीय अर्थमंत्री यांना सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय ट्रेड युनियनच्या नेत्यांना श्रीमती निर्मला सीतारामन, माननीय अर्थमंत्री यांनी सल्लामसलत करण्यासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत CITU, AITUC, HMS इत्यादींसह सेंट्रल ट्रेड युनियनचे नेते सहभागी झाले होते. नेत्यांनी माननीय अर्थमंत्र्यांना सांगितले आहे की, “ ट्रेड युनियनना खलनायक समजू नये. त्याऐवजी, कामगारांना हया देशाचे नायक आणि विकासाचे इंजिन म्हणून पाहिले पाहिजे.” बैठकीत, BMS वगळून 10 केंद्रीय कामगार संघटनांनी भारतीय कामगार वर्गाच्या खालील प्रमुख समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आग्रही निवेदन सादर केले आहे:-
सर्वसामान्यांवर जीएसटी, कॉर्पोरेट टॅक्स, वेल्थ टॅक्स इत्यादींचा बोजा वाढवु नये. श्रीमंतांनी आरोग्य, शिक्षण आणि इतर सामाजिक क्षेत्रांसाठी वित्तपुरवठा वाढवला पाहिजे.
4 नवीन कामगार संहिता, जे कामगार वर्ग विरोधी आहेत, ते रद्द करावेत. पूर्वी अस्तित्वात असलेले सर्व २९ कामगार कायदे पुनर्संचयित करावेत.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण थांबवावे.
केंद्र सरकारच्या विभागांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सध्याच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्यात.
किंमत वाढ नियंत्रण मध्ये ठेवावे.
पगारदार वर्गासाठी आयकर सवलत मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे.
सर्व शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) सुनिश्चित केली जावी. ह्या सोबत माननीय मंत्री याना दिलेले निवेदनाची एक प्रत सोबत माहितीसाठी जोडली आहे. जॉन वर्गीस, कार्यवाहक GS.