GPF - ऍडव्हान्स/विथद्रावल (Advance/Withdrawal)  साठी अर्ज करतांना घेण्याची काळजी:
By

BSNLEU MH

Lorem ips
GPF - ऍडव्हान्स/विथद्रावल (Advance/Withdrawal)  साठी अर्ज करतांना घेण्याची काळजी: Image


 *(BSNLEU महाराष्ट्र कडून कर्मचारी हितार्थ जारी)* 

कॉम्रेड असे दिसून आले आहे की Advance किंवा Withdrawal चे पेमेंट काही कर्मचारी यांचे DOT सेल कडून रिजेक्ट होत आहे किंवा पेयमेंट वेळेत होत नाही आहे. त्यामुळे कर्मचारी नाहक परेशान होतो.

GPF साठी अर्ज करत असताना हे ध्यानात घ्या की  BSNL कडून DOT सेल ला GPF च्या रकमेचा भरणा वेळेवर होत आहे. परंतु DOT सेल कडून अंतर्गत पोस्टिंग करण्यासाठी एक महिन्या पेक्षा जास्त उशीर अजून सुद्धा होत आहे त्यामुळे eligible amount मध्ये फरक येतो. म्हणून जर 1,00,000 रुपये eligible amount असेल तर 80,000 ते 85,000 साठीच अर्ज करा जेणेकरून अर्ज नामंजूर होणार नाही.

GPF ला अर्ज केल्यानंतर तो अर्ज BA/OA कडून (स्थानिक प्रशासन व अकाउंट कडून मंजूर करून) योग्य प्रक्रिया करून Circle ला पाठवला की नाही त्याची खातरजमा करा. Circle कडून प्रथम GPF ची लिस्ट प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यात व दुसरी लिस्ट 10 तारखेच्या आस पास DOT सेल ला पाठवली जाते. त्यानंतर DOT सेल त्याचे पेयमेंट  कार्यरत 5 दिवसांत करते. म्हणजे 6 तारखेला पाठवलेली लिस्ट चे पेमेंट 10 तारखेला किंवा नंतर होईल व 10 तारखेला पाठवलेल्या लिस्ट चे पेमेंट 15 तारखेला किंवा नंतर होईल.

तरी सर्वांनी हया GPF प्रक्रियेची नोंद घ्यावी व इतर कर्मचारी वर्गाचे सुद्धा मार्गदर्शन करावे ही विनंती.