BSNLEU ने घेतली भेट श्री आर.के.  गोयल, चेरअमन संयुक्त वेतन वाटाघाटी समिती.
By

BSNLEU MH

Lorem ips
BSNLEU ने घेतली भेट श्री आर.के.  गोयल, चेरअमन संयुक्त वेतन वाटाघाटी समिती. Image

 बीएसएनएलईयूच्या प्रतिनिधींनी यांनी श्री आर.के.  गोयल, अध्यक्ष, संयुक्त वेतन वाटाघाटी समिती, यांची आज भेट घेतली आणि 28.11.2022 रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबद्दल व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या अन्यायकारक (कुटील)  मिन्ट्स (इतिवृत्त) बद्दल कठोरपणे तक्रार केली.  कॉ.अनिमेश मित्रा, अध्यक्ष, कॉ.पी.अभिमन्यू, जीएस, कॉ.जॉन वर्गीस, Dy.GS, कॉ.  सुरेश कुमार आणि कॉ.मनु मेहरा यांनी या बैठकीत सहभाग घेतला.  प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले की वेतनश्रेणी, फिटमेंट आणि भत्त्यांची पुनरावृत्ती यावर घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात मिनिटस मध्ये वेगळ्याच व अनाठायी गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.  BSNLEU ने यापूर्वीच श्री आर.के.गोयल, अध्यक्ष यांना या प्रकरणी एक कडक पत्र लिहिले आहे.   आजच्या बैठकीत बीएसएनएलईयूच्या प्रतिनिधींनी समितीच्या अध्यक्षांनी कुटील व अन्यायकारक  इतिवृत्त पूर्ववत करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

 -पी.अभिमन्यू, जीएस.