कॉ.अनिमेश मित्रा, अध्यक्ष, कॉ.अभिमन्यू,जीएस आणि कॉ.जॉन वर्गीस,डी.जी.एस, यांनी आज श्री पी.के.पुरवार, सीएमडी बीएसएनएल यांची भेट घेतली आणि पुढील विषयावर चर्चा केली.
NEPP मध्ये, DoT मधून आलेल्या कर्मचार्यांना अनुक्रमे 4 आणि 7 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांचे 1ले आणि 2रे अपग्रेडेशन मिळतात, तर थेट भरती झालेल्या कर्मचार्यांना प्रत्येकी 8 वर्षे पूर्ण झाल्यावर 1ले आणि 2रे अपग्रेडेशन मिळतात. बीएसएनएलईयू सातत्याने मागणी करत आहे की, समागमित (Absorbed) कर्मचारी आणि डीआर (Direct Recruited) कर्मचारी यांच्यातील हा भेदभाव दूर करण्यात यावा. BSNLEU ची मागणी आहे की थेट भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 4 आणि 7 वर्षे पूर्ण झाल्यावर NEPP अंतर्गत 1ले आणि 2रे अपग्रेडेशन मिळायला हवे. BSNLEU ने या मुद्द्यावर आधीच CMD BSNL ला पत्र लिहिले आहे. या मुद्द्यावर आज सीएमडी बीएसएनएल यांच्याशी गंभीरपणे चर्चा केली आहे. चर्चेनंतर सीएमडी बीएसएनएल यांनी या समस्येकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले.
-पी.अभिमन्यू, जीएस.