महत्वपुर्ण - 3 रे वेतन रिविजन

11-06-22
1 Min Read
By BSNLEU MH
239
merge_from_ofoct(3)

काल वेतन रिविजन (3 rd PRC ) समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक दिल्ली येथे पार पडली. 5 % फिटमेंट सहित वेतन रिविजन हा एकच  महत्वाचा मुद्दा हा चर्चेचा मध्य बिंदू होता व सर्व स्टाफ साइड युनियन प्रतिनिधी यांनी BSNL कर्मचारी यांना 3rd PRC का मिळावे ❓ हया साठी  जोरदार बाजू मांडली. परंतु आपली ही न्यायोचित मागणी मुजोर  BSNL मानजमेंट ने मान्य केली नाही. BSNL कंपनी चे शीर्ष नेतृत्व स्वतः केंद्र सरकारच्या  7 वा वेतन आयोग चे फायदे BSNL च्या तिजोरीतुन घेत आहे जे BSNL कर्मचारी यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.

आता आपल्या सर्व कर्मचारी वर्गाला जो एक्सएकटिव्ह असो नॉन एक्सएकटिव्ह असो अशा सर्वांना AUAB च्या बॅनर खाली आरपार ची लढाई लढणे आता गरजेचे झाले आहे. त्यासाठी प्रत्येक युनियन/असोसिएशन प्रतिनिधी सोबत सर्व BSNL कर्मचारी एकत्र येणे ही काळा ची गरज आहे.

म्हणून आम्ही सर्वाना विनंती करतो की 14.06.2022 ट्विटर मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वानी संपूर्ण सहभाग घ्यावा. तसेच प्रत्येक पक्षाच्या खासदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करा. हया कार्यात पक्ष भेद न ठेवता सर्व पक्षीय यांची भेट घ्या. आपल्या जिल्ह्यात असलेला कार्यकर्त्याला सोबत घेऊन ही राजकीय लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागेल. सोबत वर्ड फाईल मध्ये मराठी व इंग्लिश मधे निवेदन आहेत ते AUAB च्या बॅनर वर व सर्व जिल्हा सचिव यांच्या सही ने खासदार साहेब यांना देणे गरजेचे आहे. आपल्या 3rd PRC चा मुद्दा निकाली काढण्यासाठी सर्व युनियन प्रतिनिधी व BSNL कर्मचारी यांनी जोरदार प्रयत्न करावे.????

AUAB जिंदाबादBSNLEU जिंदाबाद कर्मचारी एकता जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद

कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC