*अभिनंदन लातूर BSNLEU टीम* ????????

22-12-22
1 Min Read
By BSNLEU MH
189
8A3FDA74-FE95-4F7D-94A4-DE340F79310E

 

दिनांक 21.12.22 रोजी लातूर जिल्ह्याचे 9 वे अधिवेशन कॉम चाटे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मुख्य अतिथी च्या रुपात श्री बनसोडे साहेब TDM यांनी उदघाटनपरी भाषण केले व संपूर्ण कामगार वर्गाला BSNL च्या प्रगतीसाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव यांनी BSNL मधील सद्यस्थिती बाबत माहीती दिली. तसेच 3rd PRC व 4G सेवेबाबत BSNL/DOT च्या भूमिकेचे कथन केले. कॉम युसूफ हुसेन, महासचिव यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र शिका - संघटित व्हा आणि संघर्ष हयाचा उपयोग आज प्रत्येक कामगार क्षेत्रात झाला पाहिजे ह्या वर भर दिला.

कॉम प्रकाश खंडागळे, कॉम समुदरे, कॉम जैन, कॉम जोशी यांनी जिल्हा अधिवेशनात प्रस्तावना करून आपली मते मांडली. लातूर जो BSNLEU महाराष्ट्रची स्थापना झाली त्या जिल्ह्यात प्रथम निवडून आल्या बद्दल कॉम खंडागळे यांनी सर्व मतदाराचे आभार व्यक्त केले.

हया कार्यक्रमात इतर संघटनेचे नेते सुद्धा उपस्थित राहिले व त्यांनी संघटित संघर्ष साठी सर्वाना मार्गदर्शन केले 

Com Balaji Chitlewad
D.S. NFTE

Com Yuvaraj Landge
D.S. SEWA BSNL

Com Vijaykumar Patil
D.S. SNEA

Com M.K.Tondare
President NFTE

कार्यक्रमाच्या शेवटी नूतन जिल्हा कार्यकारणीची एकमताने निवड झाली. *कॉम प्रकाश खंडागळे, अध्यक्ष व कॉम सुधाकर समुदरे, सचिव म्हणून निवड झाली. सर्व नुतन कार्यकारणी सद्स्य यांचे परिमंडळच्या वतीने हार्दिक अभिनंदन व लातूर BSNLEU टीम चे आभार* ????????