BSNL कार्यरत महिला समन्वय समितीचे (BSNLWWCC) अखिल भारतीय अधिवेशन कन्याकुमारी येथे 10.12.2022 रोजी यशस्वीरित्या पार पडले. अधिवेशनात सहभागी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये या अधिवेशनामुळे खूप प्रेरणा निर्माण झाली. या परिस्थितीत, 18.12.2022 रोजी ऑनलाइन झालेल्या अखिल भारतीय केंद्राच्या बैठकीत अधिवेशनाचा सखोल आढावा घेण्यात आला. शेवटी, अखिल भारतीय केंद्राच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, कन्याकुमारी अधिवेशनाने निर्माण केलेल्या प्रेरणेचा उपयोग BSNLWWCC च्या परीमंडळस्तरीय समित्या तात्काळ गठन करण्यासाठी केला जावा. या अनुषंगाने, अखिल भारतीय केंद्राने निर्णय घेतला आहे की, BSNLEU च्या खालील परिमंडळ संघटनांनी, त्यांच्या संबंधित परीमंडळांमध्ये, BSNLWWCC च्या परीमंडळस्तरीय समितीचे आयोजन करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत.
(१) कर्नाटक
(२) तेलंगणा
(३) आंध्र प्रदेश
(४) छत्तीसगड
(५) मध्य प्रदेश
(६) आसाम
(7) गुजरात
वर नमूद केलेल्या परीमंडळांच्या परिमंडळ सचिवांना विनंती आहे की त्यांनी कृपया अखिल भारतीय केंद्राच्या या निर्णयाची नोंद घ्यावी आणि 20-01-2023 पर्यंत BSNLWWCC च्या मंडळस्तरीय समित्यांच्या स्थापनेसाठी त्वरित पावले उचलावीत. वर नमूद केलेल्या परीमंडळांच्या परीमंडळ सचिवांना 25-01-2023 पर्यंत CHQ कडे कृती अहवाल पाठवण्याची विनंती केली जाते.
-पी.अभिमन्यू, जीएस.