ऑल युनियन्स व असोसिएशन्स BSNL व MTNL, मुंबई च्या वतीने दिनांक 18.07.2013 रोजी " चलो सांताक्रूझ " हा आंदोलात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला.
जमीन मुद्रिकरण नावाखाली BSNL, MTNL, DoT मधील व सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाला पवई व दादर (प्रथमतः) येथील विभागीय निवासातुन बाहेर काढून देशोधडीला लावणाऱ्या मस्तवाल मॅनेजमेंटला इशारा देण्यासाठी मोठया संख्येने कर्मचारी व त्यांचा परिवार हया कार्यक्रमात सामील झाले.
हया कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून श्री अरविंद सावंत जीसन्मानीय खासदार व अध्यक्षमहानगर टेलिफोन निगम कामगार संघ यांनी संभोदीत केले. त्यांनी MTNL व BSNL नुकसान पोचविण्यासाठी सध्याच्या मोदी सरकारला जबाबदार धरले. BSNL व MTNL मध्ये देशी बनावटीचे टेलिकॉम तंत्रज्ञानच असले ह्या अट्टाहास मुळे कंपनी चे नुकसान झाले हे त्यांनी नमूद केले. जमीन मुद्रिकरण च्या नावाखाली कर्मचारी वर्गावर होणाऱ्या अन्याय ला संसदेत वाचा फोडू असे आश्वासन त्यांनी हया बैठकीत केले.
हया कार्यक्रमाला ऑल युनियन्स व असोसिएशन च्या वतीने कॉ गणेश हिंगेCS BSNLEU, कॉ के जी म्याथु CS AIGETOA,कॉ समीर खरे CS SNEA,कॉ लिनेश वळवी, CS SC/ST EWA,कॉ विकास गावकरDS AIBSNLEA यांनी संभोदीत केले. तसेच NFTE-BSNL तर्फे कॉम प्रदीप बाणे, सहायक जिल्हा सचिव व महानगर टेलिफोन निगम कर्मचारी संघ च्या वतीने कॉ प्रकाश शिरवाडकर, कार्यध्यक्ष MTNKS व कॉ दिलीप जाधव,महासचिव हे सुद्धा हजर होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ युसूफ हुसेन GS CCWF व कॉम यशवंत केकरे, संयोजक AUAB व त्यांच्या टीम ने विशेष सहकार्य केले.